हॅशटॅग तदेव लग्नम् लग्नाची आजच्या पिढीतील ‘युनिक’ कहाणी
Hashtag Tadev Lagnam ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ ही म्हण पूर्ण करणारा आनंद गोखले दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट. लग्नसंस्था ही आजच्या 21व्या शतकातील तरुण पिढीला काहीशी ‘ओल्ड फॅशन्ड’ वगैरे वाटते. तरीही लग्नाची वयोमानापरत्वे वेगवेगळी कारणं उलगडणारा हा चित्रपट. शिवाय, आजच्या सोशल मीडियाच्या काळात तरुण प्रेक्षकांना आपलंसं करण्यासाठी ‘हॅशटॅग’ हा सर्वात महत्त्वाचा शब्द का आहे, याचं उत्तरही नकळत हा चित्रपट देऊन जातो.