हिजाबला ‘हात’, जानव्याला गाठ

    21-Apr-2025   
Total Views | 13

Congress
 
“आम्ही सर्व धर्मांचा, त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या कृतींचा आदर करतो. संबंधितांवर कारवाई करणार आहोत,” असे कर्नाटक सरकारने म्हटले. तरीही प्रत्यक्षात मात्र हिंदूंची मुस्कटदाबी सुरूच आहे. ‘सीईटी’ परीक्षेसाठी केंद्रावर आलेल्या तीन विद्यार्थ्यांना हातात धागा आणि जानवे घातल्याने बाहेरच थांबवण्यात आले होते. त्यातील दोन मुलांनी जानवे आणि हातातला धागा काढला. मात्र, एका विद्यार्थ्याने जानवे काढण्यास नकार दिला. तेव्हा त्याला 15 मिनिटांपर्यंत बाहेरच थांबवण्यात आले.
 
तिकडे तामिळनाडूत स्टॅलिन सरकार आणि कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून होणारी हिंदूंची गळचेपी अद्याप थांबलेली नाही. मुळात ती थांबेल अशी आशा करणे व्यर्थच. स्टॅलिन पिता-पुत्रांचा सनातनविरोध तर जगजाहीर. परंतु, इकडे कर्नाटकातही काँग्रेसने हिंदूंचे जगणे मुश्किल केले आहे. कर्नाटकातील एका ‘सीईटी’ परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना जानवे आणि हातातील पवित्र धागा काढण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद उभा राहिला. “आम्ही सर्व धर्मांचा, त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या कृतींचा आदर करतो. संबंधितांवर कारवाई करणार आहोत,” असे कर्नाटक सरकारने म्हटले. तरीही प्रत्यक्षात मात्र हिंदूंची मुस्कटदाबी सुरूच आहे. ‘सीईटी’ परीक्षेसाठी केंद्रावर आलेल्या तीन विद्यार्थ्यांना हातात धागा आणि जानवे घातल्याने बाहेरच थांबवण्यात आले होते. त्यातील दोन मुलांनी जानवे आणि हातातला धागा काढला. मात्र, एका विद्यार्थ्याने जानवे काढण्यास नकार दिला. तेव्हा त्याला 15 मिनिटांपर्यंत बाहेरच थांबवण्यात आले. अखेर त्याच्या हातातील पवित्र धागा काढून तो त्या सुरक्षा रक्षकाने कचर्‍याच्या डब्यात टाकला आणि नंतर त्याला आत सोडले. या घटनेनंतर कर्नाटक सरकार मूकदर्शक बनून आहे. सरकारी कंत्राट देताना कर्नाटक सरकारला मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे, कर्नाटक सरकारला हिजाबदेखील हवा आहे, मात्र जानवे नको. जानवे काढायला लावणे, हादेखील धार्मिक स्वातंत्र्यावर हल्लाच. पण, हिजाब म्हटले की, काँग्रेस तत्काळ बचावात्मक स्वरूपात येते. मात्र, जानवे म्हटले की तिरस्कार ठरलेलाच. निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी खुशाल जानवे घालून मंदिरांमध्ये देवदर्शनाला जातात. तेव्हा कर्नाटक सरकार राहुल गांधी यांच्या जानव्याला विरोध करणार का? असा प्रश्न उद्भवतो. विरोध करणार नाही. कारण, ते जानवे राजकीय हव्यासासाठी बांधलेले असते. जानवे घालून राहुल कधीही हिंदू धर्माविषयी प्रेम असल्याचे दाखवून देऊ शकत नाही. संसदेत त्यांनी हिंदू हिंसा करतात, असे बोलून एकप्रकारचे वैचारिक हिंसेचे प्रदर्शन केले होते. विरोधी पक्षनेते असलेले राहुल संसदेत तर मूकदर्शक बनून असतात. मात्र, हिंदूविरोध करताना ते अग्रस्थानी असतात. कर्नाटकात जानव्याला झालेला विरोध हा काँग्रेसच्या दुटप्पीपणाचे आणि हिंदूविरोधाचे एक उदाहरण.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.
अग्रलेख
जरुर वाचा
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'आयटीआयच्या' हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121