जोधपूर : (Jodhpur Love Jihad Case) राजस्थान येथील जोधपूरमधून लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली निष्पाप हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटना एकामागून एक उघडकीस येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी २० एप्रिल रोजी जोधपूरच्या खांडा फालसा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' हे नाव वापरत हिंदू असल्याचे भासवत एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती.
माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील इंदूर येथे राहणारा एक मुस्लिम तरुण जोधपूरमधील एका अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी आला होता. त्याभेटीदरम्यान तिथल्या स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी त्या तरुणाची चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र, आधारकार्ड दाखवण्यास सांगितले तेव्हा त्याची खरी ओळख समोर आली. स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' या हिंदू नावाने ओळख सांगणारा तरुण मुस्लिम असल्याचे उघड झाले. त्यानंतर स्थानिकांनी त्याला खांडा फालसा पोलिस स्टेशन नेऊन झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या तरुणाविरोधात पोक्सो कायदा (POCSO ACT) आणि इतर गुन्हेगारी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जोधपूरमध्ये, हिंदू संघटनांनी शनिवारी न्यायालयात लग्न करण्यासाठी आलेल्या एका प्रेमी जोडप्यालाही पकडले होते. त्यातही तो मुलगा एका विशिष्ट समुदायाचा निघाला. त्याच रविवारी, सूरसागर पोलिस ठाण्यात लव्ह जिहादचा आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी सूरसागर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\