मुंबई : महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम कीर्तनकारांचा शोध घेणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय शो ची भुरळ अगदी सेलेब्रिटीनांही पडली आहे. प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी नुकतीच या मंचावर उपस्थिती लावली. महेश मांजरेकर यांनी या शोसाठी खास धोतर-कुर्ता असा पोशाख परिधान केला होता. अशा प्रकारचा शो करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून, सोनीने आणलेल्या अनोख्या संकल्पनेला त्यांनी मनापासून दाद दिली.
यावेळी महेश मांजरेकर यांनी विठ्ठलाचं सुरेख गाणं सादर केलं. या कीर्तनकारांचे सादरीकरण बघून मला ही गाणं सादर करण्याचा मोह आवरला नाही, असं महेश मांजरेकर यांनी यावेळी सांगितले. ‘विठूचं नाव मनी जोडलं' असं म्हणत त्यांनी विठुरायाला घातलेली साद परीक्षकांसह उपस्थितांनाही भावली. महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना भेटता आल्याचा आनंद स्पर्धकांनी व्यक्त केला.
सोनी मराठी वाहिनीवर लवकरच हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' हा रिअॅलिटी शो सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार यादीत जेष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सिनेक्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान केला जातो. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २५ एप्रिल २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, वरळी, मुंबई येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.