काँग्रेसला पुण्यात धक्का! संग्राम थोपटे भाजपमध्ये दाखल
22-Apr-2025
Total Views | 32
मुंबई : भोर तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्राम थोपटे भाजपमध्ये दाखल झाले. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री जयकुमार गोरेदेखील उपस्थित होते.
संग्राम थोपटे यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रक्षप्रवेशाने पुण्यातील काँग्रेसचा गड ढासळल्याचे बोलले जात आहे. २००९ ते २०१९ असे सलग तीनवेळा संग्राम थोपटे भोरमधून निवडून आले. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला.
पुण्यासारख्या जिल्ह्यात सलग तीनवेळा निवडून येऊनही पक्षाकडून राजकीयदृष्ट्या ताकद दिली जात नाही. त्यामुळे या तालुक्यात विकासकामांना अधिकचे झुकते माप मिळावे यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे संग्राम थोपटे यांनी सांगितले आहे.