"ब्राह्मणत्वाला गालबोट लावण्याची तुझी औकात नाही" मनोज मुंतशीर यांचा अनुराग कश्यपला इशारा!

    20-Apr-2025   
Total Views |
 



you don
 
 
मुंबई : मनोज मुंतशीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत अनुराग कश्यप यांनी ‘फुले’ या चित्रपटाविषयी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी हिंदीत म्हटलं, “कमाई कमी असेल तर खर्च रोखा, आणि माहिती कमी असेल तर शब्द रोखा  अनुराग कश्यप, तुमचं ना ज्ञान आहे ना कमाई. ब्राह्मणांच्या परंपरेला तुम्ही एक इंचही गालबोट लावू शकत नाही.”
 
पुढे ते म्हणाले, “तुमचं मन आहे म्हणून मी तुम्हाला काही छायाचित्रं पाठवणार आहे  मग ठरवा, कोणावर घाण ओतायची आहे.”
 
एकवीस तेजस्वी ब्राह्मणांचे उल्लेख
मनोज यांनी त्यानंतर २१ ब्राह्मण व्यक्तिमत्त्वांची नावं घेतली, ज्यात थोर विचारवंत, साहित्यिक, शूरवीर, पुरस्कारविजेते आणि माजी पंतप्रधानांचाही समावेश होता. “तुझ्यासारखे असंख्य द्वेष्टे संपतील, पण ब्राह्मणांचा इतिहास अमर राहील,” असं म्हणत त्यांनी अनुराग कश्यपला थेट खुलं आव्हान दिलं, “या यादीतून एक नाव निवड — मी फोटो पाठवतो. आणि जर हिम्मत नसेल, तर भविष्यात मर्यादेत राहायला शीक.”
 
वादग्रस्त विधानावरून वाद
 
‘फुले’ चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांविषयी सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यानंतर अनुराग कश्यप यांनी नाराजी व्यक्त केली. ब्राह्मण समाजाविरोधात टीका करताना एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी अत्यंत अश्लील भाषेत म्हटलं, “ब्राह्मण पे मैं मूतता हूं… कोई प्रॉब्लेम?”
 
यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर अनुरागने माफीनामा दिला, मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “मी माझं विधान मागे घेत नाही, पण ज्या एका वाक्यावरून प्रचंड टीका झाली त्यासाठी मी क्षमायाचना करतो.” त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबातील महिलांना बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
 
‘फुले’ चित्रपटाची पार्श्वभूमी
प्रतिक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फुले’ हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. दिग्दर्शक आनंद महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जातीय विषमता आणि लिंगभेदाविरुद्ध फुलेंनी दिलेल्या लढ्याची कहाणी सांगणारा हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, पण वादामुळे तो लांबणीवर गेला आहे.
 
 
 
 
 
 

अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.