व्हॅटिकन सिटी : (Indian Cardinals eligible to vote for New Pope) सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर नवे ख्रिश्चन धर्मगुरू निवडण्यासाठी व्हॅटिकन सिटीमध्ये साधारणतः १५ ते २० दिवसांनी 'व्हॅटिकन कॉन्क्लेव्ह' नावाने -ओळखली जाणारी ही अत्यंत गुप्त पद्धतीने निवडणूक पार पडणार आहे. जगभरातून आलेल्या ८० वर्षांखालील कार्डिनलमधून एक जणाची नवीन पोप म्हणून निवड केली जाईल.
नवीन पोपच्या निवडीसाठी मत देणारे ४ भारतीय कार्डिनल कोण?
नवे पोप निवडण्यासाठी होणाऱ्या 'कॉन्क्लेव्ह' मधील मतदानासाठी भारतातील चार कार्डिनल पात्र ठरले आहेत. गोवा आणि दमणचे आर्चबिशप कार्डिनल फिलिपे नेरी फेराओ (७२), त्रिवेंद्रमच्या सायरो-मालांकारा कॅथोलिक चर्चचे मेजर आर्चबिशप कार्डिनल बॅसेलिओस क्लीमिस (६२), हैदराबादचे आर्चबिशप कार्डिनल अँथोनी पूला (६३) हे तिघे ८० वर्षांपक्षा कमी वयाचे भारतीय कार्डिनल आहेत. याखेरीज केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात जन्मलेले भारतीय-कॅनेडियन वंशाचे कार्डिन जॉर्ज जेकब कूवकड (५१) हे सध्या व्हॅटिकनच्या 'डीकास्ट्री फॉर इंटररिलिजियस डायलॉग' या विभागाचे प्रमुख आहेत.
पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर नवे ख्रिश्चन धर्मगुरू निवडण्यासाठी लवकरच निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, नवीन पोप पदासाठी काही नावे चर्चेत आहेत. यांमध्ये इटालियन कार्डिनल पिएत्रो पॅरोलिन (७०), कार्डिनल मार्क औलेट (८०) जे मूळचे कॅनडाचे असून २०१० ते २०२३ या काळात ते व्हॅटिकनच्या बिशन कार्यालयाचे प्रमुख होते. कार्डिनल ख्रिस्तोफ शॉएनबॉर्न (८०) हे ऑस्ट्रियन आहेत. पोप बेनेडिक्ट यांचे शिष्य असल्याने पुराणमतवाद्यांची त्यांना पसंती मिळू शकेल. फिलिपिन्सचे कार्डिनल लुईस टँगल (६७) हे फ्रान्सिस यांच्या काळात व्हॅटिकनच्या मिशनरी कार्यालयाचे प्रमुख होते. त्यांच निवड झाल्यास आशियातून आलेले ते पहिले पोप ठरतील. कार्डिनल मॅटिओ झुपी (६९) हे इटालियन बिशप कार्यालयाचे प्रमुख असून ते फ्रान्सिस यांचे पट्टशिष्य मानले जातात. आता नवीन पोप कोण होणार, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\