नवी दिल्ली : (Pope Francis Death) सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या दीर्घ आजारानंतर सोमवार दि. २१ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्रक जारी केले असून त्याद्वारे पोप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
"पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल. मंगळवार दि. २२ एप्रिल आणि बुधवार दि. २३ एप्रिल हे दोन दिवस तसेच पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराच्या दिवशीही राष्ट्रीय दुखवटा असेल. हे तीन दिवस देशभरातील सर्व इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात येतील, तसेच कोणतेही अधिकृत मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाही" असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\