भुवनेश्वर : ओडिशातील प्रख्यात कवी चारुदत्त पाणिग्रही यांना त्यांच्या ' स्वल अँड स्टील' या कवितासंग्रहासाठी एमिली डिकिन्सन पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या कवितासंग्रहाचा आशय दोन संस्कृतींना जोडणारा असून यातील कवितेला भौगोलिक सीमांचे बंधन नसल्याचे मत पुरस्कार समितीने नोंदवले आहे.
१९ व्या शतकातील प्रतिभावंत कवयित्री एमिली डिकिन्सन यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ दर वर्षी पोअेट्री सोसायटी ऑफ अमेरीकेच्या एका सदस्याला हा पुरस्कार दिला जातो. ओडिशातील साहित्य वर्तुळात स्व:ताचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या चारुदत्त पाणिग्रही हा पुरस्कार दिला जाणार आहे. मुंबईच्या डॉ समुद्रीका पाटील, उत्कर्ष सौरभ, अभिषेक मुखोपाध्याय, श्रुती आलोक आणि मनिषा केशव या भारतीय लेखकांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.