मोदींनी ज्यांचे कौतुक केले ते प्रोफेसर वोंग आहेत तरी कोण?
13-Apr-2025
Total Views | 11
नवी दिल्ली : चीन सोबत असलेले भारताचे सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी चीनमध्ये अनेक ठिकाणी योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. शांघई सारख्या शहरात १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. परंतु भारताचा हा समृद्ध वारसा जतन करण्यात महत्वाचा हातभार लावला आहे झेजियांग विद्यापीठाचे प्राध्यापक वांग झिचेंग यांनी. नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्र लिहून त्यांच्या याच कार्याचे कौतुक केले.
चीनमधील भारताचे कॉन्सुल जनरल प्रतिक मथुर यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहीलेले पत्र प्राध्यापक वांग झिचेंग यांना दिले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय परंपरा व योगसाधना यांचा चीन मध्ये प्रसर केल्याबद्दल वांग झिचेंग यांचे कौतुक केले आहे. प्राध्यपक वांग यांनी योगा या विषयावरील अनेक पुस्तकांचे चीनमध्ये संपादन केले आहे. भगवद गीता, योगसूत्रे, पतंजलि आदि ग्रंथांचे भाषांतर सुद्धा वांग यांनी केले. चीनमध्ये अनेक ठिकाणी या विषयावर त्यांनी व्याख्याने सुद्धा दिली आहे. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जी २० परिषदेसाठी चीनमध्ये आले होते त्यावेळेस प्राध्यापाक वांग यांनी भाषांतरीत केलेली प्रत मोदींना भेट म्हणून दिली.
प्राध्यापक वांग यांनी भारतीय परंपरांमध्ये तरुणांचा वाढता रस नोंदवला आहे. या परंपरा सजगता, संतुलन आणि आंतरिक शांती आणि चीनच्या स्वतःच्या सांस्कृतिक वारशाशी जुळणारी मूल्ये यावर भर देतात. त्यांच्या कार्याने या प्राचीन संस्कृतींना जोडून परस्पर आदर आणि समजूतदारपणा वाढवला आहे. कॉन्सुल जनरल माथुर यांनी प्राध्यापक वांग यांच्या 'भारतीय संस्कृती लोकप्रिय करण्याच्या अथक प्रयत्नांची' प्रशंसा केली. चीनमध्ये योगाची लोकप्रियता त्याच्या सार्वत्रिक आकर्षणाचा आणि आपल्या लोकांना जवळ आणण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे.