झाडांचे ‘कॅल्शियम चॅनेल’

    21-Apr-2025
Total Views | 20
CNGC channel in plant


प्रत्येक सजीव जीवाची बाह्य किंवा अंतर्गत अशी संरक्षणप्रणाली विकसित झाली आहे. झाडांमध्येही संरक्षणप्रणाली विकसित झालेली आहे. त्यामुळे संकटावेळी वनस्पती आपले स्वसंरक्षण कसे करतात आणि यामध्ये त्यांना कोणते घटक मदत करतात, याविषयी ऊहापोह करणारा लेख...


सुरक्षितता ही सगळ्या देशांना प्रिय असते. प्रत्येक देशाने जशी स्वतःची संरक्षणप्रणाली तयार केली आहे, तशी सर्व प्राणीमात्रांचीदेखील संरक्षणप्रणाली विकसित झालेली आहे (CNGC channel in plant). काळानुरुप ती अजूनही होत आहे (CNGC channel in plant) . व्हायरल ताप आला की घसा सुजतो, कारण टॉन्सिल्सचे पांढर्‍या पेशी बनवण्याचे काम वाढू लागते (CNGC channel in plant) . या पांढर्‍या पेशी माणसाच्या अंतर्गत प्रतिकार प्रणालीतले सैनिक आहेत (CNGC channel in plant) . त्या संसर्गासोबत लढतात. अशीच प्रत्येक प्राणी आणि पक्ष्याला त्यांच्या ठेवणीप्रमाणे संरक्षणप्रणाली दिलेली आहे (CNGC channel in plant) . अशा परिस्थितीत वनस्पतीच्याबाबतीत निसर्ग आप-पर भाव कसा राखेल? त्यादेखील निसर्गाच्याच लेकुरवाळ्या. मग निसर्गाने त्यांनाही काहीतरी संरक्षणप्रणालीची जनुके दिली असतीलच. (CNGC channel in plant)

वनस्पतींना भावना असतात, कारण तिथेही जनुके असतात. जिथे जनुके, तिथे भावना, प्रेम, अलिप्तता, कठोरता यांसारख्या गोष्टी आपोआप येतात. वनस्पतीही याला अपवाद कशा असतील? झाडे हलू शकत नाहीत; बोलू शकत नाहीत. मात्र, ज्यांना झाडांची भाषा कळते, ते त्यांच्याशी सहज संवाद साधू शकतात. हा संवाद झाडांना समजून घेण्यात मोलाचा ठरतो. काहीजण झाडाची बाह्य भाषा समजतात; तर काहींना त्यांच्या आतील भाषा समजून घेण्याचा छंद असतो. अशा व्यक्ती 'Molecular Biologist' असतात किंवा 'Biochemist' माणूस किंवा प्राण्यांमध्ये असणारी मज्जासंस्था झाडांमध्ये नसते. तरी झाडांना स्पर्श कळतो. पान तुटलेले, घाव घातलेला, साल सोललेली, फळे तोडलेली या सगळ्या गोष्टी त्यांना कळतात. त्यांना पानगळ कधी करायची, हे कळते. फळ पिकलेल्या झाडाला फळ खाली पाडायचे, हेही कळते. देठ जिथे फळाला जोडलेले आहे, त्या ठिकाणच्या पेशी कधी कमकुवत करायच्या, म्हणजे पिकलेले फळ पडेल, हेही झाडाला समजते. इतके सगळे झाडाला वेळोवेळी समजत असेल, तर निश्चित त्याला विचारही आहेत आणि भावनाही. या सगळ्या प्रकारात झाड स्वसंरक्षण करू शकते, असा प्रश्न ‘राष्ट्रीय वनस्पती जनुक संशोधन संस्था’ नवी दिल्लीच्या शास्त्रज्ञ डॉ. ज्योतीलक्ष्मी वडासेरी यांना पडला. त्यांनी Arabidospis या वनस्पतीच्या आधारे झाडांची संरक्षणप्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न केला. Arabidospis हे मोहरीवर्गातले झाड. याचा जिनोम हा सर्व झाडांत कमी लांबीचा आहे. म्हणजे अभ्यासाला सोपा. जसे प्राणीशास्त्रात ड्रॉसोफीला या किड्याचा जिनोम कमी लांबीचा म्हणून त्याला संशोधनात वापरतात, तसा Arabidospis चा वापर वनस्पती जनुक संशोधनात होतो. या झाडाच्या आधारे संशोधन केल्यावर संशोधकांना असे समजले की, कॅल्शियम नावाचा परिचित घटक झाडाच्या संरक्षणप्रणालीला जागे करतो. ते कसे, हे थोडे उलगडून पाहूया.
 
एक किडा आपले पान खातोय, असे जेव्हा त्या वनस्पतीला समजते, तेव्हा त्या पानात असणार्‍या कॅल्शियमच्या सुट्या आयनची संख्या पेशीत वाढू लागते. फक्त दहा सेकंदात हा संदेश कॅल्शियम पूर्ण पानात पोहोचवतो. पानातून तो पुढे देठ, फांदी, खोडात याच कॅल्शियमच्या माध्यमातून पसरतो. या माध्यमाला किंवा या रस्त्याला शास्त्रज्ञांनी नाव दिले ‘CNGC चॅनेल.’ सोप्या भाषेत ‘कॅल्शियम चॅनेल.’ जेव्हा हे चॅनेल किंवा हा रस्ता जागा होतो, तेव्हा झाडाच्या विविध भागांतले सैनिक जागे होतात. याला ‘दुय्यम फौज’ म्हणतात. हे राखीव दल विविध रसायनांच्या स्वरुपात निवांत पहुडलेले असते. जेव्हा संदेश ‘कॅल्शियम चॅनेल’च्या माध्यमातून या दुय्यम फौजेला मिळतो, तेव्हा हे सगळे खडबडून जागे होतात. झटपट ड्रेस घालतात, बंदुका घेतात आणि पानांच्या दिशेने पळतात. पानात पसरून जिथे कीड असेल, तिथले भाग ही रसायने जाड, चिवट बनवू लागतात. काही वेळा पानाची चवही बदलून टाकतात. मनसोक्त पान खाणार्‍या किड्याला अचानक पान आंबट लागू लागते. चव नकोशी होते आणि कीड झाड सोडते. या राखीव फौजेत जास्मोनिक आम्ल, ग्लुकोसेनुलेट इ. रसायने असतात. ही रसायने पान जाड करणे किंवा चव बदलण्याचे काम करतात.
 
संशोधन फक्त Arabidospis या झाडावर झाले असले, तरी प्रत्येक झाडात कॅल्शियम संरक्षणप्रणाली असते; अगदी पिकांमध्येदेखील. तसेच काही पिकांत असे अधिक चांगले CNGC चॅनेल जैवतंत्राने घुसवणे शक्य आहे का, यावरदेखील संशोधन चालू आहे. तरी असंतुलित कारणांनी काही वेळा कीड निश्चचित झाडाचा ताबा घेते. मात्र, झाडांना तगडी संरक्षणप्रणाली असते, हे सत्य आहे. आजकालच्या हायब्रीड बियांण्यातून निपजणारी पिके मात्र का बळी पडतात, हा संशोधनाचा विषय असेल. बीज कंपन्या असे संशोधन करू देतील का, हाही प्रश्न उरतो. झाडात कॅल्शियमची कमतरता असेल, तर झाडे किडीला लवकर बळी पडतात. याचमुळे शेतकर्‍यांना पिकातील कॅल्शियमची कमतरता भरून काढावी, असे सांगितले जाते.
 
चांगला सेंद्रीय कर्ब असलेल्या आणि कॅल्शियम व्यवस्थित असलेल्या झाडांना कीड लागत नाही. लागली तर टिकत नाही. नुसत्या पालापाचोळ्यात - कंपोस्टमध्ये जर योग्य पद्धतीने झाड लावले आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढली, तर त्या झाडांना कीड - बुरशी आजिबात लागत नाही, हे संशोधन आणि अनुभवाअंती सिद्ध झालेले आहे. निसर्ग अगाध आहे. त्यातही झाडे ही प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आपली पालनकर्ती आहेत. त्यांची ही अंतर्गत जडणघडण विकसित व्हायला त्यांच्या कित्येक पिढ्या खर्ची पडल्या असतील.
 
 
‘कॅल्शियम चॅनेल’ कसे काम करते?
CNGC चॅनेल म्हणजेच कॅल्शियम चॅनेल हे एखाद्या पाईपला लावलेल्या ‘व्हॉल्व गेट’सारखे काम करते किंवा धरणाचे उघडझाप करणारे गेट समजा. किड्याचा हल्ला झाला आहे, हे काही प्रथिन आम्ले आणि प्रथिने यांना समजते. ते या CNHC चॅनेलला डिवचतात. कीड खातेय आम्हाला, आता दरवाजा उघडा, असा संदेश आल्यावर CNGC चॅनेल दार उघडतो. दार उघडले की, कॅल्शियम आयर्न भराभर बाहेर येतात आणि त्यांची एक लाट तयार होते. हळूहळू ही लाट झाडभर पसरते. याचा अर्थ विविध रसायने जागी करण्यासोबत कॅल्शियम चॅनेल झाडाला सावध करायचेदेखील काम करते. म्हणजे जिथे किडीचा हल्ला अजून झालेला नाही, तो झाडाचा भागही बदलायला चालू होतो.
 
 

कॅल्शियम चॅनेलच काम करतात, हे कसे ओळखले?
डॉ. वडासेरी यांनी बंगळुरुच्या ‘राष्ट्रीय जैवविज्ञान संस्थे’च्या एम. के. मॅथ्यू यांची मदत घेऊन एक संशोधन केले. यात एका झाडातील CNGC चॅनेल काढून टाकले आणि एका झाडात तसेच ठेवले. ज्या झाडातील कॅल्शियम चॅनेल काढले, ते झाड किडीला लवकर बळी पडले, तर दुसर्‍या झाडाने लगेच पानांमध्ये बदल घडवून किडीला विरोध करायला सुरुवात केली. याच संशोधनात CNGC हे झाडांमध्ये संदेश कसा पोहोचवते, हेही संशोधन करून सिद्ध केले.
- रोहन पाटील
(लेखक वनस्पतीअभ्यासक आहेत)
7387641201
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121