राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी राज्य सरकारच्या महत्वपूर्ण सूचना! यापुढे कोणत्याही...
22-Apr-2025
Total Views |
मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, २१ एप्रिल रोजी याबद्दलचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याद्वारे धर्मादाय रुग्णालयांना ८ महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
निर्धन रुग्ण निधी (IPF) शिल्लक नसल्याच्या कारणामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी आरोग्याशी संबंधित योजना लागू कराव्यात. धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी नियोजित उपचाराकरिता उपलब्ध करून देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे मंत्रालयातील धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची पूर्वमान्यता घ्यावी, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.
यासोबतच धर्मादाय रुग्णालयाने कोणत्याही रुग्णाकडून अवाजवी पद्धतीने अनामत रक्कम स्वीकारण्यावर निर्बंध टाकण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णावर प्राधान्याने उपचार करण्याच्या सूचनाही सरकारने धर्मादाय रुग्णालयाला दिल्या आहेत.