रणसंग्राम पाच राज्यांचा
मुंबई
जळगाव
नागपूर

अर्थव्यवहार : भूमिगत पाण्याचा उपसा करणार्‍यांवर लागणार निर्बंध ?

कोणत्याही मार्गाने भूमिगत पाण्याचा उपसा करण्यावर लवकरच निर्बंध लागणार आहेत. सध्याच्या व आगामी निवडणुकांच्या धामधूमीचा काळ संपल्यानंतर बहुधा जमिनीतील पाणी उपसण्या संदर्भात नवीन नियम लागू केले जाण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा

चाळीसगाव पालिका मुख्य जलवाहिनीला लिकेज

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गिरणा धरणावरून आलेल्या नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनीला मोठा लिकेज झाल्याने पाण्याचे पाट वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा या पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुढे वाचा

जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड यांचा स्टार फाउंडेशनतर्फे गौरव

येथील स्टार फाउंडेशनच्या वतीने जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक राजेंद्र राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अध्यक्ष डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुढे वाचा

बोदवड ग्रामन्यायाधीश डी.एम.शिंदे पदारूढ

येथे दर आठवड्यात प्रत्येक बुधवारी सुरू असणार्‍या ग्राम न्यायालयाच्या ग्राम न्यायाधीशपदाचा पदभार नवनियुक्त न्यायाधीश डी. एम. शिंदे यांनी स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले.

पुढे वाचा

वरणगाव शहरात पाणीपुरवठा विस्कळीत

गेल्या काही दिवसांपासून तापी नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे तापी नदीतील वरणगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीवरील बॉल अडकल्याने मंगळवारपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. परंतु धरणातील पाण्याचे आवर्तन आल्याने दिलासा मिळाला आहे.

पुढे वाचा

सावदा न.पा.वर दिव्यांग सेनेचा धडक मोर्चा

दिव्यांग सेनेतर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या उपस्थितीत आणि सावदा शहराध्यक्ष विशाल कासार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

पुढे वाचा

डांभुर्णीत यळकोट यळकोट जय मल्हार

येथे चंपाशष्टी निमित्ताने काही समाजबांधवांकडे खंडेराव दैवताचे पूजन करण्यात आले. यात अगोदर घट बसवून रात्री तळी उचलून गावातून मशाली पेटवून वाजत गाजत हळदीचे टिळे कपाळी लावून हळद धुळवीत यळकोट यळकोट जय मल्हार या नावाचा उदो उदो करत गावातून मिरवणूक काढण्यात आली.

पुढे वाचा

गरुड महाविद्यालयात लेखन, काव्य अन् संगीत कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाची लेखन -काव्य अन् संगीत कार्यशाळा विविध सत्रांमध्ये तीन स्वतंत्र सभागृहात झाली. यात 300 प्रशिक्षणार्थी नवोदित साहित्यिक कलावंतांनी सहभाग नोंदवला.

पुढे वाचा

बहुमतावर मंजूर केलेल्या विषयांसाठी विशेष सभा

10 फेब्रुवारीला पाच मिनिटांत सभा आटोपली व सर्व विषय मंजूर करून घेतले. यामुळे नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या सभेतील काही विषयांसाठी पुन्हा शनिवारी विशेष सभा घेण्यात येणार आहे

पुढे वाचा

लेख माला
क्रीडा आणि मनोरंजन