अभिनेत्री अश्विनी महांगडेचा शरद पवार गटात प्रवेश, साताऱ्याच्या सभेत हाती घेतली तुतारी

    30-Apr-2024
Total Views |

ashwini  
 
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून देशात दोन टप्प्यांमध्ये निवडणूका संपन्न झाल्या आहेत. या लोकसभा निवडणूकीत कलाकारांनी राजकारणाची वाट धरलेली देखील दिसून आली आहे. अशात मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
 

ashwini  
 
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहचलेली अश्विनी महागंडे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आलेच होते. पण नेमता पक्ष कोणता यावर शिक्का बसला नव्हता. मात्र, आता या चर्चांना पुर्णविराम लागला असून अश्विनीने अधिकृतरित्या शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.