अरुण दाते कलासन्मान पुरस्कर जाहीर

श्रीधर फडके व रवींद्र साठे पुरस्काराने सन्मानित

    29-Apr-2024
Total Views |
 
date puraskar
 
मुंबई : सांगितला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे अरुण दाते यांच्या जयंतीनिमित्त अरुण दाते पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदाच्या त्यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त गायक श्रीधर फडके व रवींद्र साठे यांना दाते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण मुंबई तसेच पुण्यातही होणार आहे. श्रीधर फडके यांना रविवारी दि. ५ मी रोजी मुंबईत पुरस्कार वितरित केला जाणार आहे. सकाळी ठीक ११ वाजता दादर येथील सावरकर स्मारकात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्कार वितरणानंतर भावसंगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे.
 
त्यानंतर, ९ मी रोजी पुण्यात रवींद्र साठे यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह तसेच मानपत्र असे आहे. यंदाचे हे पुरस्काराचे तिसरे वर्ष असून यापूर्वी प्रवीण दवणे, अशोक पत्की, अनुराधा पौडवाल आणि अनुराधा मराठे यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार अशोक पत्की यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. मुंबईतील सावरकर स्मारक येथे पुरस्कार वितरणाचा सोहळा कार्यक्रमात विनामूल्य प्रवेश उपलब्ध आहे.