स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंचे जीवनकार्य आजच्या काळातील स्त्रीशक्तीला देखील प्रेरणा देणारे - रविराज पराडकर

    29-Apr-2024
Total Views |

swarajyajanani 
 
मुंबई : हिन्दुस्थानच्या इतिहासात राजमाता जिजाऊसाहेबांचे चरित्र वीरकन्या, वीरभगिनी, वीरपत्नी, वीरमाता आणि वीरांगना अशा सर्वांगीण स्त्रीत्वाच्या शक्तिस्वरूपात साकारले गेले आहे आणि ते युगायुगांतील स्त्रीशक्तीला मार्गदर्शक ठरते आहे, अशा शब्दांत जिजाऊसाहेबांची महती इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांनी बोरीवली येथे सांगितली.
 
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, बोरीवली भाग आणि बोरीवली सांस्कृतिक केन्द्र यांच्या वतीने एक्सर, बोरीवली येथील वनविहार उद्यानात आयोजित इतिहास कट्टयावर दि . २१ एप्रिल २०२४, संध्या. ५.३० वाजता गोष्ट 'ती'ची या दुसऱ्या पर्वातील, शिवकाळातील राजस्त्रियांवरील पहिल्या भागात स्वराज्यजननी राजमाता जिजाऊसाहेब ही गोष्ट मांडताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, "जिजाऊंचे संपूर्ण जीवन संघर्षाने भरलेले होते . समोर आलेल्या सर्व प्रतिकूल परिस्थितीला त्यांनी धैर्याने तोंड दिले . काळाची आव्हाने ओळखून त्याच्याशी झुंज देणाऱ्या आपल्या पतीला शहाजीराजांना आणि पुत्र शिवरायांना त्यांनी खंबीर साथ दिली."
समितीच्या बोरीवली भागाचे अध्यक्ष सुरेन्द्र तन्ना यांनी मान्यवरांचे आणि उपस्थित सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. इतिहास कट्टा या उपक्रमाचे प्रायोजक आहेत.