“ते डिप्रेशनमध्ये नव्हते त्यांना...”, सोढी बेपत्ता झाल्यानंतर ऑनस्क्रिन मुलाने सोडले मौन

    30-Apr-2024
Total Views |

sodhi  
 
मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सोढी भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या काही दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले असून दिल्ली पोलिस त्यांच्या शोधात आहेत. दरम्यान, गुरुचरण (Gurucharan Singh) यांच्या ऑन-स्क्रीन मुलाने म्हणजेच गोगी अर्थात समय शाह याने एक महत्वपुर्ण खुलासा केला आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत समय शाह म्हणाला, 'मी त्यांच्याशी चार ते पाच महिन्यांपूर्वी फोनवर बोललो होतो. आम्ही जवळपास एक तास किंवा त्याहून अधिक वेळ बोललो असू आणि त्या संपुर्ण संवादात अतिशय सकारात्मक गोष्टींवर चर्चा करत होतो.
 
गुरुचरण सिंह डिप्रेशनमध्ये असल्याच्या वृत्तावर समय म्हणाला, 'आम्ही बोललो तेव्हा ते खूश होते. मला अजूनही विश्वास बसत नाही की लोकं म्हणत आहेत की ते डिप्रेशनमध्ये होते. ते अशा प्रकारचे व्यक्ती नाही, परंतु तरीही आपण सांगू शकत नाही. पण त्यांच्यासोबत बोलल्नंतर ते उदास होते असे मला वाटत नाही. खरं तर ते त्यांच्या पालकांशी किंवा मित्रांसोबत ज्या प्रकारे बोलायचे त्याप्रकारे आम्ही कधीही बोललो नाही. मी त्याच्यासाठी मुलासारखा होतो”.
 
त्यामुळे आता बेपत्ता गुरुचरण सिंग नेमके कुठे आहेत? याचा शोध सुरु असून लवकर ते सापडावे यासाठी त्यांच्या घरचे आणि त्यांचे सहकलाकार प्रार्थना करत आहेत.