भोजशाळेच्या इमारतीमागचे नेमके गूढ काय?

    24-Apr-2024
Total Views |
bhojshala
 
भोजशाला म्हणजे एक कोडेच झाले आहे. ज्ञानवापी मंदिरानंतर आता नजरा वळल्या आहेत त्या भोजशाळेकडे. खरे भांडण आहे ते काळाचे. एकच वस्तू काही काळासाठी भोजशाला असते आणि काही काळासाठी मस्जिद असते. तेव्हा त्या वस्तूला काय अधिकार द्यावेत असा प्रश्न पडणे साहजिक आहे. अर्थात कायद्याची याबाबत एक वेगळी बाजू आहे. परंतु या वादात न पडता आज मी या वस्तूचा काळाप्रमाणे बदलत गेलेला इतिहास आणि त्याविषयी झालेला अभ्यास कथन करणार आहे.
 
मुळात मंदिर आणि भोजशाला यांचा अर्थ एकच होतो का? मंदिर कोण्या एक संप्रदायाचे असते, आणि शाळा? याच पार्श्वभूमीवर मस्जिदीचे उद्दिष्ट काय असते? आपण सुरुवातीपासून पाहूया. एक थोडक्यात १०३४ पासून २००३ पर्यंतचा आलेख देते आणि मग आपण या वास्तूच्या खोलात जाऊ. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांआधारे असे समजते, १०३० साली राजा भोजने ही शाळा काव्य शास्त्र विनोद व इतर ज्ञानार्जनासाठी बांधवून घेतली. त्यानंतर १३०३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने धरवर स्वारी करून हे सरस्वतीचे गृह समजले जाणारे मंदिर उध्वस्त केले आणि महालकदेवाचा पाडाव केला. १४५९ मध्ये भारतावर मुस्लिम आक्रमणांचीच नाही तर सत्तेचीही छाया होती. त्यावेळी मौलाना कामालुद्दीनचा दर्गा या स्थानावर बांधला गेला. पुन्हा १८७५ मध्ये वाग्देवीचे म्हणजे वाक वाचेच्या देवतेचे, सरस्वतीचे मंदिर भोजशाळेजवळ सापडले. १९०३ मध्ये या इमारतीचा भोजशाला असा जाहीर उच्चर अधिकृत झाला. वादाला सुरुवात झाली ती इथे. साधारण याच काळात हिंदुस्थानात हिंदू मुस्लिमांच्या तेढ निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. १९३४ मध्ये या वास्तूजवळचा भोजशाला असा लिहिलेला बोर्ड काढून टाकला जातो आणि ती मशीद आहे म्हणू दर शुक्रवारी मुस्लिम पंथीयांना नमाज पढण्याची अनुमती मिळते. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्था भोजशाळेस संरक्षित स्मारक म्हणून मान्यता देते. १९९७ मध्ये हिंदूंना वर्षातून एकदाच वसंत पंचमीच्या दिवशी भोजशाळेत जाण्याची परवानगी मिळते. अगदी अलीकडे २००३ एप्रिल मध्ये पुन्हा मंगळवार आणि शुक्रवारी या इमारतीचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातात मंगळवारी हिंदूंना प्रार्थना जाण्यासाठी तर शुक्रवारी मुस्लिमांना नमाज पढण्यासाठी अनुमती दिली जाते. इतर दिवशी ही इमारत बंद असते.
 
या इमारतीच्या सर्वेक्षणास सुरुवात होऊन आज १ महिना पूर्ण झाला आहे. या इमारतीत अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत ज्यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. सरस्वतीची प्रतिमा, भग्न शिवालय, घडीव खांब, गोमुख अशी अनेक हिंदूंची प्रतीके सापडली आहेत. देवाची पूजा करताना येणारे पाणी गोमुखातूनच यावे, तो विनादुष्ट जिवंत पाण्याचा झरा असावा यासाठी गोमुखाची रचना मंदिराजवळ केलेली असते.
 
धार येथील देवी अंबिका, जिच्या शिलालेखात वाग्देवीचा उल्लेख आहे. हे शिल्प सिटी पॅलेस, धार येथे सापडले. या शिलालेखात काही लिहिले आहे, अंबिका मातेच्या लेखात अभ्यासकाने दिलेला या शिलालेखाचा स्वैर अनुवाद असा, 'वररुची , राजा भोजाचे चंद्रनगरीचे धार्मिक अधीक्षक ( धर्माधि ) आणि विद्याधारी [जैन धर्माच्या शाखा], अप्सरा [अज्ञानाच्या] सहजतेने दूर व्हाव्यात म्हणून? द्वारे...?], त्या वररुचीने, प्रथम वाग्देवी मातेची रचना करून [आणि] नंतर जिनांच्या त्रयीने, अंबाची ही सुंदर प्रतिमा बनवली, जी सदैव फळांनी भरलेली होती. आशीर्वाद! सूत्रधार साहिराचा मुलगा मानथला याने तो अंमलात आणला . हे शिवदेव प्रवीण यांनी लिहिले होते. वर्ष 1091.'
 
अंबिका पुतळ्यावरील शिलालेखावरून असे दिसून येते की धार येथील वाग्देवी सरस्वतीच्या जैन स्वरूपाला समर्पित होती. तथापि, उल्लेख केलेली वाग्देवी अद्याप सापडलेली नाही किंवा अस्तित्वात नाही. मेरुतुंगा , चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहितात, धनपाल या प्रख्यात जैन लेखकाने सरस्वती मंदिरात भोज स्तुतिपर गोळ्या दाखवल्या होत्या ज्यात पहिल्या जैन तीर्थकर आदिनाथाला समर्पित केलेल्या त्याच्या कवितेसह कोरलेल्या होत्या . षभपंचाशिका ही कविता जतन केली गेली असली तरी प्रतिमेप्रमाणे गोळ्या सापडल्या नाहीत.
 
चौलुक्य आणि वाघेला राजघराण्यांनी धारबाबत आक्रमक वृत्ती बाळगली आणि परमार राजवटीच्या मरणासन्न दिवसांत शहर वारंवार बरखास्त केले. त्यांनी पश्चिम भारतातील ग्रंथालये काढून टाकली जिथे परमार ग्रंथ कॉपी आणि जतन केले गेले होते, त्यापैकी शंभपंचाशिका . 1271 च्या कोडिनार येथील विशालदेवाच्या शिलालेखात सरस्वतीसाठी पवित्र आनंद उद्यान ( केतन ) आणि महाविद्यालय ( सदस ) तयार केल्याची नोंद आहे , ग्रंथांव्यतिरिक्त, गुजरातच्या राजांनी सरस्वतीची पवित्र प्रतिमा देखील काढून टाकली आणि नवीन मंदिर बांधले. तिच्यासाठी, सोमनाथपासून फार दूर नाही.
 
पुरातत्व सर्वेक्षणाचा काय अहवाल येतोय याकडे आपण आता लक्ष केंद्रित करायला हवे. याविषयी प्राथमिक अहवाल या महिन्याच्या २८ तारखेस प्रकाशित होणार आहे.