दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर!

    30-Apr-2024
Total Views |

Yamini Jadhav 
 
मुंबई : दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामिनी जाधव या महायूतीच्या अधिकृत उमेदवार राहणार आहेत. मंगळवार, ३० एप्रिल रोजी शिवसेनेच्या 'X' अकाऊंटवरुन यामिनी जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.
 
 
 
यामिनी जाधव या मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. तसेच यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान विधानसभेच्या सदस्या आहेत. दरम्यान, आता त्यांना लोकसेभेचे तिकीट देण्यात आले आहे.
 
 हे वाचलंत का? - काँग्रेसमध्ये धुसफुस? वर्षा गायकवाडांच्या रॅलीत बड्या नेत्यांची दांडी
 
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी उबाठा गटाचे अरविंद सावंत यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत शिवसेना आणि उबाठा गटात थेट सामना रंगणार आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईत कोण बाजी मारणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.