अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणात कारवाई; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेकांना नोटीस

    30-Apr-2024
Total Views |
amit shaha
 
नवी दिल्ली : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा एक डीपफेक व्हीडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अनेकावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गुजरातमधून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष अजेंचा घेऊन अमित शहांचे डिपफेक विडीयो वायरल केले जात असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
 
काही मिडीयो रिपोर्टनुसार, अहमदाबाद सायबर क्राइम सेलने सतिश वनसोला आणि आर. बी. बारीया या दोघांनी अटक केली आहे. आरोपी सतिश वनसोला काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांचे कार्यालय सांभाळतो. जिग्नेश मेवाणी यांचे पीए म्हणुनही तो काम पाहत होता. तर दुसरा आरोपी आर. बी. बारीया. हा आम आदमी पार्टी दाहोद जिल्हाध्यक्ष म्हणुन काम पाहत होता. या दोघांनी गृहमंत्री अमित शहा यांचे एडिट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
 
अमित शहांनी निवडणुक जिंकल्यास आरक्षण संपुष्टात आणणार असल्याचं म्हटलं असल्याचा विडीयो सोशल मिडीयावर वायरल झाला होता. हा विडीयो काँग्रेसने दोन दिवसांपुर्वी एक्सवर पोस्ट केला होता. या प्रकरणी आसाम काँग्रेसचा कार्यकर्ता रितम सिंग याला अटक करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की अमित शहांचा खोटा विडीयो शेअर केल्याप्रकरणी रितम सिंगला अटक करण्यात आली आहे.
 
दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनाही समन्स पाठवले आहे. दिल्ली पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांना आपल्याकडील मोबाईल-लॅपटॉप सह १ मे ला आपली साक्ष नोंदवण्यासाठी बोलवले आहे. समाजातील विविध समुदायांमध्ये तेढ पसरवण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची आणि सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता आहे.