मे महिना प्रेक्षकांसाठी असणार खास, घरबसल्या पाहा ‘शैतान’ ते ‘हिरामंडी’ अशा भन्नाट कलाकृती

    30-Apr-2024
Total Views |

shaitaan 
 
 
मुंबई : सध्या बाहेर सुरु असणारा उकाडा हा सहनशक्तीपलीकडे जात चालला आहे. पण आता गरमीने हैरान झालेल्या प्रेक्षंकाना घरबसल्या एसीमध्ये त्यांच्या आवडीचे चित्रपट आणि वेब सीरीज पाहता येणार आहे. खास करुन मे महिन्यासाठी ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी असणार असून नेटफ्लिक्स, हॉटस्टार, डिज्नी प्लस हॉटस्टार, झी 5 आणि जिओ सिनेमासारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होणार आहेत. यात शैतान (Shaitaan) ते हिरामंडीचा (Heeramandi) देखील समावेश आहे. जाणून घेऊयात...
 
हिरामंडी: द डायमंड बाजार
 
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित ‘हिरामंडी’ ही वेब सीरिज १ मे पासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, संजीदा शेख, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शेखर सुमन, फरदीन खान, अध्यायन सुमन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.
 

heeramandi  
 
द ब्रोकन न्यूज सीझन २
 
झी ५ वरील द ब्रोकन न्यूज या वेब सीरीजचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. न्यूज रूम व त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना यावर आधारित कथानक असलेल्या द ब्रोकन न्यूज सीझन २ मध्ये सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावेळी अमिना कुरेशी, दीपांकर सान्याल आणि राधा भार्गव यांच्या प्रमुख भूमिका असून ३ मे रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. 
 

broken news  
 
शैतान
 
अंधश्रद्धेवर आधारित शैतान चित्रपट आता ओटीटी गाजवण्यास सज्ज झाला आहे. अजय देवगण व आर. माधवन यांचा ‘शैतान’ ३ मे पासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
 

shaitaan  
 
मंजुम्मेल बॉईज
 
बहुचर्चित मल्याळम चित्रपट ‘मंजुम्मेल बॉईज’ २२ फेब्रुवारी २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने २२५ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट आता ५ मे पासून डिझ्नी प्लस हॉटस्टारवर तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्येही पाहता येणार आहे.
 
 

manjumel