mystery of death नासदीय सूक्तात सृष्ट्यारंभीचे सुंदर शब्दातीत, परंतु प्रत्यक्ष अनुभूतीला धरून केलेले वर्णन वैदिक ऋषिंशिवाय कोण करणार? अवस्थारहित अवस्थेत, म्हणजेच ब्रह्मावस्थेकडे घेऊन जाणारी व त्यातच साधकाला ठेवणारी अवस्था म्हणजे ब्रह्मास्त्र होय. अस्त्र या शब्दात रक्षण करणे, असा भावार्थ आहे. असे असता ब्रह्मास्त्र म्हणजे विद्ध्वंसक अस्त्र अशी कल्पना करून, ब्रह्मास्त्रामुळे सर्व सृष्टीचा नाश होतो, अशी कल्पना करणे चुकीचे आहे. भौतिक अर्थाने मात्र खरे आहे. कारण ब्रह्मास्त्र लागलेला साधक म्हणजे, ब्रह्ममय झालेल्या
Read More
अपसव्य गतीचे विज्ञान सर्व दृश्यमान वस्तू ओतप्रोतांच्या सापेक्ष संघात गतीमुळे उत्पन्न होतात, हे आपण पाहिले आहे. सर्व वस्तूजाताचे मूळ, अवस्तू वा अजड असणार्या ओतात आहे. ओताच्या असल्या संघातामुळे वस्तूधारणा उत्पन्न होऊन पलीकडे अशीच धारणा जर सतत कायम राहिली, तर त्या वस्तूजातात चैतन्याची जाणीव उत्पन्न होऊन प्राणशक्ती उत्पन्न होते. प्राणशक्तीचा व्यापार सुरू झाला, की कर्मबंधनाने भारित जीव त्या प्राणशक्तीला त्या जडदेहाद्वारे राबवून घेतो. अशा तर्हेने जडात चैतन्य व चैतन्यात जीवभाव उत्पन्न होतो. जीवाची अशी उत्पत्ती,