संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारक आणि आदिवासींचे पुनवर्सन हे आरे दुग्ध वसाहत आणि इतरत्र अन्य ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवार दि. ११ मार्च रोजी विधानपरिषदेत बोलताना दिली (sgnp resettlement in aarey). दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसन हे म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले (sgnp resettlement in aarey). मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यात राष्ट्रीय उद्यानाच्या अतिक्रमणाबाबत राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. (sgnp resettlement in aarey)
Read More
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील सिंह सफारीमध्ये काही दिवसांपूर्वी पाळणा हलल्यानंतर आता गुजरातवरुन सिंहाच्या जोडीचे आगमन झाले आहे (sgnp brought new lion pair).
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त केलेल्या पक्षीगणनेमध्ये ७२ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे (BNHS SGNP Bird Count). सकाळच्या सत्रात केवळ काही तासांसाठी पार पडलेल्या पक्षीनिरीक्षणाद्वारे ७२ प्रजातींची नोंद होणे ही राष्ट्रीय उद्यानाची जैवविविधता अधोरेखित करते. (BNHS SGNP Bird Count)
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या (sgnp bird) पक्ष्यांच्या यादीत दोन प्रजातींची भर पडली आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) उद्यानामध्ये (sgnp bird) केलेल्या पक्षी सर्वेक्षणात दोन नवीन पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या 'बीएनएचएस'कडून उद्यानामध्ये दिर्घकालीन पक्षी गणनेचे काम सुरू आहे. ( sgnp bird )
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा एकदा दोन वाघांचे आगमन होणार आहे. राष्ट्रीय उद्यानाची टीम चंद्रपुरवरून वाघाची एक जोडी घेऊन निघाली असून गुरूवारी सकाळी ती मुंबईत दाखल होईल.
गुजरात मधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दि. २६ सप्टेंबर रोजीच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या परवानगीची प्रतीक्षा संपली असून आता गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जो
आरे दुग्ध वसाहतीतून दोन संशयित बिबट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका दीड वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू झाला होता. या नंतर आरे कॉलनीतील युनिट १५ मध्ये ट्रॅप कॅमेरा आणि पिंजरे लावण्यात आले होते. आरे दूध वसाहतीमध्ये आणि आरेमधील युनिट क्रमांक 15 च्या परिसरात मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांसाठी दोन संशयित नर बिबट्या जबाबदार असू शकत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते. युनिट १५ मध्ये वावर असलेले दोन संशयित बिबटे या पिंजऱ्यांमध्ये अडकले. बुधवार दि. २६ ऑगस्ट
बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दोन सिन्हांपैकी एका सिंहाचा सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला आहे. 'रवींद्र' नावाचा हा सिंह गेल्या दोन वर्षांपासून आजारी होता. या सिंहाचा अखेर मृत्यू झाला आहे. हा नर सिंह १७ वर्षांचा होता. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकच मादी सिंह उरला आहे. ही मादी देखील वृद्धापकाळाशी झुंज देत आहे.
नाशिकमध्ये मार्च महिन्यात सापडलेली बिबट्याच्या (Leopard) तीन पिल्लांपैकी २ पिल्लांचा मृत्यू झाला आहे. ही पिल्ले जून रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली होती. पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्भेटीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांना पुढील देखलभालीकरिता मुंबईत पाठवण्यात आले होते. या पिल्लांमध्ये दोन मादी आणि एक नर पिल्लाचा समावेश होता. गेल्या पाच महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक प्राण्यांचा मृत्यू जाहला आहे.
दीड महिन्यांपूर्वी शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकलेल्या नर बिबट्याचा वन विभागाने विरारहून बचाव केला होता. या अपघातामुळे बिबट्याला आपला पाय गमवावा लागला होता. परंतु, आता हा बिबट्या ठणठणीत झाला असून सक्षमपणे आपल्या तीन पायांवर चालू लागला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील साई बांगोडा परिसरात शुक्रवार दि. २० रोजी वन विभागाच्या राखीव वनातील २५.50 हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमणावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. वन विभाग, पोलीस विभाग व राज्य राखीव पोलीस बल यांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली आहे. अवैध रित्या अतिक्रमण केलेल्या ठिकाणी भूमिगत दारूसाठा देखील सापडला होता.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारीत कर्करोगाशी झुंज देणाऱ्या 'यश' नामक वाघाचा अखेर मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला.
दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या या प्रजातीच्या वाढीसाठी उद्यानातर्फे प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हे मांजर इथे आणण्यात आले होते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तरेकडील परिक्षेत्रात प्रस्तावित असलेल्या रस्ते आणि रेल्वे विकास प्रकल्पांचे बांधकाम उन्नत स्वरुपाचे करण्याच्या सूचना उद्यान प्रशासनाने संबंधित प्राधिकरणांना दिल्या आहेत. विकास प्रकल्पांमुळे वन्यजीवांच्या स्थलांतर मार्गाला निर्माण झालेला धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून अशी सूचना देण्यात आली आहे.