राहुल गांधी यांना त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते हे माहित आहे का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केला. त्याचप्रमाणे भविष्यात स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध वादग्रस्त विधान करू नका, अन्यथा ‘परिणामांना सामोरे जावे लागेल’ असा इशाराही दिला.
Read More
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. महात्मा गांधींनी स्वतः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आदर केला होता. उद्या तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणाल!, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींची कानउघडणी केली. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने खंत व्यक्त केली. डिसेंबर २०२४ मध्ये राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rahul Gandhi उत्तर प्रदेशातील लखनऊच्या एका न्यायालयाने काँग्रेस खासदार विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना फटकारण्यात आले आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एका खटल्यानुसार सुनावणी करण्यात आली की, ते सतत खटल्यादरम्यानच्या तारीखेला गैरहजर होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने आता त्यांना १४ एप्रिल र२०२५ रोजी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.
यावर्षी महाशिवरात्र स्वा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी साजरी होत आहे. महाशिवरात्री हा शिव आणि शक्ती यांच्या संगमाचा क्षण! शिव म्हणजे उपशम आणि शक्ती म्हणजे व्युत्थान! अशा या दोन अनादी तत्त्वांचा विवेक जे आयुष्यभर वैयक्तिक आणि राष्ट्रीय जीवनात करीत राहिले आणि आपले कार्य झाल्यावर, त्या परब्रह्माशी ऐक्य पावून जे कृतार्थ झाले, ते तीर्थरूप, शिवस्वरूप म्हणजे विनायक दामोदर सावरकर!
(Savarkar) कवी मनाचे महान योद्धे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून ‘महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार’ दिला जाणार आहे. हा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादि मी अनंत मी’ या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्रकिनार्यावरून केली.
आज, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेते आणि दिग्दर्शक रणदीप हुडा त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. रणदीपने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत सावरकरांच्या विचारधारेचे स्मरण केले आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Swatantryaveer Savarkar हे शतपैलू होते, असे अनेकदा आपण ऐकतो, वाचतो. पण, सर्वार्थाने सावरकरांच्या जीवनातील शतपैलू ह. त्र्यं. देसाई यांनी याच नावाच्या पुस्तकातून 40 वर्षांपूर्वी शब्दबद्ध केले होते. या पुस्तकाची नवीन आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली असून, दि. 26 फेब्रुवारीच्या सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त या पुस्तकाचे परीक्षण...
"आपण ज्या वेळेस मराठीचा विचार करतो, त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय मराठीचा विचार होऊ शकत नाही, कारण सावरकारांनी मराठीला शब्दांचा खजिना दिला तो अमूल्य आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Rahul Gandhi पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी १० जानेवारी २०२५ रोजी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात टीप्पणीवरून जामीन मंजूर केला. सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्यावर फौजीदारी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यास सांगितला. सुनावणीदरम्यान, राहुल गांधी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते. याप्रकरणी आता त्याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलकावर दंड भरण्यास सांगितला आहे.
येसूवहिनी या कुणी सामान्य का होत्या? हा काळ आहे 1909च्या सुमाराचा. 1909 सालच्या जून महिन्यात गणेशपंत सावरकरांना काळेपाण्याची शिक्षा झाली नि लवकरच पुढे त्यांचे धाकटे बंधू ‘बाळ’ (डॉ. नारायण सावरकर) यांनाही अटक झाली. या दोन्ही बातम्या गणेशपंतांच्या पत्नी यशोदाबाई यांनी विनायकराव सावरकरांना विलायतेला कळविल्या. तेव्हा व्यथित झालेल्या आपल्या दुःखी वाहिनीला त्यांनी घाईघाईने हे उत्तर लिहून टाकले.
(PM Narendra Modi) देशाची राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या ‘वीर सावरकर महाविद्यालया’चे भूमीपूजन करणार आहेत.
नागपूर : अकोला विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवणाऱ्या आमदार रणधीर सावरकर ( Randhir Sawarkar ) यांची भाजपच्या मुख्य प्रतोद पदी निवड करण्यात आली आहे.
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ( Veer Savarkar ) यांच्याविषयी खोटे आरोप करण्यासाठी संसदेचा उपयोग केला आहे. ही विधाने त्यांनी संसदेच्या बाहेर केली, तर आम्ही त्यांच्या विरोध तक्रार करू. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून संसदेचा चुकीचा उपयोग करण्यात आला, असा आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी रविवार, दि. १५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत केला.
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शनिवारी लोकसभेत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी आज लोकसभेत चर्चेत भाग घेतला. राहुल गांधी यांनी लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना केंद्र सरकारवर राज्यघटनेवर हल्ला केल्याचा आरोप केला.
नवी दिल्ली : भारतीय संविधान हे एका विशिष्ट पक्षाची देणगी असल्याचे ठसविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, भारतीय संविधान ( Constitution ) हे नागरिकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असून सरदार भगतसिंग, पं. मदनमोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी संविधानाची भावना बळकट होते, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत शुक्रवारी केले.
नाशिक : आयाम, नाशिक आयोजित ‘गोदावरी ( Godavari ) संवाद २०२४’ गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड येथे रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. कर्णिक यांनी त्यांच्या मनोगतात डीप स्टेट आणि इतर विषय किती महत्त्वाचे आहेत, हे सांगितले. ते म्हणाले, “आपला समाज, संस्कृती, आर्थिक व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आयाम नाशिक असे कार्यक्रम घेऊन हा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. यानंतर ‘डीप स्टेट अॅण्ड वर्ल्ड ऑर्डर’
Swatantryaveer Savarkar कर्नाटकात काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणार असल्याचे ट्विट महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेअर केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अहवेलना करण्याचा डाव काँग्रेसचा असल्याचे ते म्हणाले.
(Rahul Gandhi) सावरकरांचा विचार हिंसक असून त्यामुळेच संविधानात त्यांचा विचार नाही, अशी मुक्ताफळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी उधळली आहेत.
मुंबई : महायुतीतर्फे रविवारी दि. १० नोव्हेंबर रोजी ‘संकल्पपत्र’ आणि मविआकडून ( MVA ) ‘महाराष्ट्रनामा’ नावाखाली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, मविआच्या जाहीरनाम्यातील महापुरुषांच्या छायाचित्रांमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे छायाचित्र वगळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जाहीरनामा जरी मविआचा असला, तरी त्यावर वरचष्मा हा काँग्रेसचाच असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबई : “सावरकरांचे हिंदुत्व हे व्यापक राष्ट्रहितासाठी दिशादर्शक होते. आजच्या पिढीला ते आजच्या भाषेत समजावून सांगितले पाहिजे,” असे प्रतिपादन संशोधक, अभ्यासक, वक्ते अक्षय जोग ( Akshay Jog ) यांनी केले. नवी मुंबईतील वाशी येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिभवन येथे ते बोलत होते.
मुंबई : ‘सावरकर विचार मंच’, नवी मुंबईच्यावतीने रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. प्रसिद्ध लेखक, स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक, संशोधक अक्षय जोग ( Akshay Jog ) यांचे ‘सावरकर आणि गांधी’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यासोबतच ‘सावरकर-आक्षेप आणि वास्तव’ या विषयावर मुक्त चर्चासत्रदेखील होणार आहे. हा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिभवन, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय इमारत, पहिला माळा, सेक्टर-३, वाशी, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होईल.
(Swatantryaveer Savarkar Statue) भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या संकल्पनेतून क्रांतिकारक, हिंदुत्वाचे ध्वजवाहक, देशभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते वीर सावरकर चौक, मालाड महानगरपालिका समोर, लिबर्टी गार्डन, मालाड पश्चिम येथे संपन्न झाले. या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने माजी खा. गोपाळ शेट्टी, श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाचे, कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, स्
काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा द्वेष, अवहेलना, मत्सरच केला, असा घणाघात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसला विचारसरणी सुधारण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
जाहीर सभेत स्वा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील भगूर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान.
यंदाचा ऑस्कर २०२५ हा पुरस्कार सोहळा भारतासाठी फार महत्वाचा असणार आहे. नुकताच किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडिज' हा चित्रपट भारताकडून ऑस्करला पाठवण्यात आला. त्यापाठोपाठ रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटानेही बाजी मारली. आणि आता 'संतोष' या भारतीय चित्रपटाचीही ऑस्कर २०२५ मध्ये वर्णी लागली आहे. 'लापता लेडीज'नंतर भारतीय कलाकारांचा आणखी एक दमदार चित्रपट 'ऑस्कर'च्या शर्यतीत आला असून याचे नाव आहे 'संतोष'.
विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट ऑस्कर २०२५ साठी भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची जबाबदारी रणदीप हुड्डा यांनी आपल्या खांद्यांवर घेतली होती. सावरकरांचे संपूर्ण जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा हा चित्रपट ऑस्करला पोहोचल्यामुळे चित्रपटसृष्टीतून टीमवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना मंगळवार, दि. २४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते योगेश सोमण यांनी आजवर आपल्या लिखाण आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्याचा हाच कलाप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न दै. मुंबई तरुण भारतने केला आहे. यावेळी त्यांनी अभिनयाबद्दल त्यांचे स्पष्ट मत देखील मांडले.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण यांनी आरआरआर चित्रपटामुळे संपूर्ण जगाला वेड लावलं. आता मात्र ते अभिनेता नव्हे तर निर्मिगणती क्षेत्रात नशीब आजमावताना दिसत असून त्यांची पहिली निर्मिती असलेला द इंडिया हाऊस या चित्रपटाचे शुटींग सुरु झाले असून त्यापुर्वी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने गणरायाचा आर्शिवाद घेतला आहे. हम्पीच्या विरुपक्ष मंदिरात टीमने देवाची पुजा करत हत्तीचा आर्शिवाद घेतला आहे.
अभिनेते, गायक, निर्माते सुनील बर्वे सध्या स्वरगंधर्व सुधीर फडके या चरित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजवर नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेच. शिवाय सध्या सुनील बर्वे संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष म्हणून कामकाज पाहात आहेत. ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered गप्पा With कलाकार’ या कार्यक्रमात सुनील बर्वे यांनी हजेरी लावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते कसे जोडले गेले याबद्दल त्यांनी सांगितलं.
अभिनेते, गायक, निर्माते सुनील बर्वे सध्या स्वरगंधर्व सुधीर फडके या चरित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजवर नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेच. ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered गप्पा With कलाकार’ या कार्यक्रमात सुनील बर्वे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुधीर फडके यांच्याशी झालेली वैयक्तिक भेट कधी आणि कशासाठी होती याचा खुलासा करत आठवणींना उजाळा दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे सावरकरांना दूषणे देणाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठी सर्वांनी सावरकर वाचून त्यांना समजून घ्यावे, असे आवाहन सावरकर अभ्यासक अक्षता देशपांडे यांनी केले. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘कालजयी सावरकर’ विशेषांक प्रकाशन सोहळा आणि व्याख्यान वसईतील समाज उन्नती मंडळ सभागृह, माणिकपूर येथे मंगळवार, दि. २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न झाला. यावेळी सावरकर अभ्यासक अक्षता देशपांडे यांचे स्वातंत्र्यव
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त झी५ वर प्रदर्शित झालेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाच्या यशामुळे सध्या अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा भारावला आहे. नुकताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ जयंतीनिमित्त मुंबईतील दादर भागात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर आणि विनायक दामोदर सावरकर यांचे निकटवर्तीय रणजीत सावरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात रणदीपला 'स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला. क्रांतिकारी नेत्याच्या ज
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज (२८ मे) १४१ वी जयंती. आणि याच निमित्ताने अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने सेल्युलर जेलला भेट दिऊन सावरकरांना वंदन केले. सध्या रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत असून प्रेक्षकांनीही त्याच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहु
"हिंदुत्ववादी शब्दाला कट्टर शब्द जोडण्याची गरज नाही. हिंदू हा आपल्या हिंदुत्वाशी एकनिष्ठ असतोच. परंतु भूमातेशी एकनिष्ठ राहण्याची खरी गरज आहे.", असे प्रतिपादन स्वा. सावरकर अभ्यासक डॉ. धनश्री लेले यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि.२८ मे रोजी ब्राह्मण सभा, ठाणे तर्फे डॉ.धनश्री लेले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरच म्हणतात, ‘तू धैर्याची अससी मूर्ती। माझे वहिनी माझी स्फूर्ती॥’ अशा या खुद्द स्वातंत्र्यवीरांची स्फूर्तिदेवता होत्या, त्या त्यांच्या वहिनी, येसूवहिनी... येसूवहिनींचे कार्य, त्यांचे धैर्य, शौर्य, त्याग, मातृभूमीनिष्ठा सादर करणारे सांगीतिक अभिवाचन म्हणजे ‘मी...येसूवहिनी’. सुमारे ११० मिनिटांचा हा सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम ‘समिधा-पुणे’तर्फे सादर केला जातो. त्याविषयी...
नरवीर श्रेष्ठ ते किती। झाले भारती। तयांची न गणती। तयांची गणती। खरोखर भारतवर्षात होऊन गेलेल्या नरवीरांची आणि रणरागिणींची गणती करणे अशक्यच आहे. परंतु, तरीही माझ्या मनात सखोल रुजलेले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन जन्माला आलेले क्रांतिकारक म्हणजेच स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्यावर रचलेल्या पोवाड्याची माहिती देण्यासाठी या लेखाचं प्रयोजन!
शाहिरी कला ही वीररसाची जननी! आणि स्वातंत्र्यवीरांच्या काव्यात वीररस नाही, असे होणे नाही. सावरकरांची अज्ञात काव्यसंपदा जगासमोर आणण्याचा प्रयत्न त्यांची नात, महिला शाहीर विनता जोशी करीत आहेत. सावरकरांच्या या काव्यसंपदेला मायबाप रसिकांच्या समोर घेऊन जाताना, त्या शाहीर होतात. सावरकरांच्या या ठेव्याचा प्रसार करतानाच्या अनुभवांची ही शब्दसुमनांजली...
सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. पुस्तके, नाटक, अभिवाचन अशा विविध माध्यमांतून सावरकरांचे विचार बहुश्रुत झाले. पण, आधुनिक पिढीपर्यंत पारंपरिक पद्धतीने सावरकरांचे जाज्वल्य विचार मांडण्याऐवजी, त्यांना आवडेल त्याच प्रकारात ते सादर करण्याचा प्रयत्न करणार्या सावरकरप्रेमी कलाकार प्रांजल अक्कलकोटकर यांचे हे अनुभवचित्रण...
२०२२ साली ‘विवेक समूह’ निर्मित ‘कालजयी सावरकर’ हा माहितीपट प्रदर्शित झाला. पुढे शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागांतील शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमांतून हा माहितीपट हजारो विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचला. अवघ्या दीड तासात सावरकरांचा संघर्षमयी जीवनपट पडद्यावर साकारण्याचे आव्हान संपूर्ण टीमने यशस्वीरित्या पेलले. त्यापैकी या माहितीपटाच्या पटकथा-संवादलेखनाचे शिवधनुष्य पेलणार्या डॉ. समिरा गुजर यांनी ‘कालजयी सावरकर’ माहितीपटाच्या निर्मितीचा शब्दबद्ध केलेला हा प्रवास...
माझे आणि राजेश्रीचे गेल्या काही वर्षांचे स्वप्न म्हणजे ‘त्रिवेणी.’ स्वा. सावरकरांच्या घराण्यातील स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित, स्वा. सावरकरांच्या साहित्यावर बेतलेला नृत्य, नाट्य, काव्य व निवेदनात्मक प्रयोग. खरेतर किती प्रयोग करायचे, कोठे करायचे, असे काहीच ठरलेले नव्हते, पण प्रयोग होत गेले. छत्रपती संभाजीनगरामध्ये आणि इतर ठिकाणीसुद्धा...
केवळ एक तासाच्या ‘मृत्युंजय सावरकर’ या नाटकात सावरकरांच्या जीवनातील सारे महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे मनोहारी दर्शन घडविण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच, त्यांचे हिंदुत्वाचे तत्वज्ञान, त्यांची विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी भूमिका, सुभाषचंद्र बोसांना त्यांनी केलेले मार्गदर्शन आदी गोष्टींचाही प्रभावीपणे वेध घेण्याचा प्रयास केलेला आहे. संपूर्ण नाटकभर प्रेक्षक ज्या तन्मयतेने हे नाटक बघतात, ते पाहून खरोखरेच जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
तात्यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचा घेतलेला वसा टाकायचा नव्हता. मग मी एक तोडगा काढला. त्यांच्या अर्थपूर्ण गीतांचे व्हिडिओ बनविले, नाट्यप्रसंग चित्रित केले. आर्थिक वाटा मी पूर्णपणे उचलला. नव्या तंत्रज्ञानामुळे हा संच अगदी दोनावर आला. निवेदिका मी आणि तांत्रिक बाजू मजबूतपणे माझे पती डॉ. सतीश यांनी सांभाळायचे ठरले आणि प्रयोग करणे सोपे झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध कवितेत उल्लेखल्याप्रमाणे, ‘जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे’ याचा साधा अर्थ आहे की, जर कोणी दिव्य कार्य करण्याचे व्रत घेत असेल, तर ते दाहक असणारच! त्याचे चटकेसुद्धा बसतीलच. पण, ‘सतीचं वाण’ घेतल्यासारखे आम्ही स्वतःहूनच हे व्रत घेतले आहे आणि त्यातून होणारे परिणाम काय असतील, याचीदेखील आम्हाला पूर्ण कल्पना आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वतःच्या जीवनाची आहुती देण्याची सिद्धता ज्यांनी अंगीकारली, त्या ‘नराग्रणीस’ जनतेसमोर मांडायचे, तर त्यासाठी आपल्याकडे असलेली प्रभावी शक्ती म्ह
असे म्हणतात की, ‘जे काम हजार व्याख्यानांनी होत नाही, ते एका चांगल्या नाटकाने होते.’ तेव्हा मनाने निश्चय केला की, सावरकरांचे कार्य, प्रखर राष्ट्रवाद, भाषा प्रभुत्व, त्यांनी भोगलेले कष्ट, कारावास यातील जे जमेल ते तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपण निश्चित करू शकतो. आपल्या हातात हक्काचे माध्यम आहे रंगमंच! ‘संगीत उत्तरक्रिया’, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’, ‘सहा सोनेरी पाने’ ही पुस्तके पुन्हा एकदा सादरीकरणाच्या दृष्टीने वाचू लागलो.
‘ने मजसी ने, परत मातृभूमीला। सागरा प्राण तळमळला’ या काव्यपंक्ती जेव्हा जेव्हा ऐकल्या, तेव्हा तेव्हा वाटले ज्या महापुरुषाने ही मातृप्रेमाची उत्कट भावना शब्दबद्ध केली, त्यासाठी, त्यावर काहीतरी मोठे लिहावे, करावे, लिहिले जावे, केले जावे. एक कलाकार म्हणून अनेकदा एखादे काम जेव्हा आपल्या पदरी पडते, त्यावेळी अनेक प्रश्न मनात स्फुरतात. रणदीप हुड्डा दिग्दर्शित, अभिनीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चरित्रपट मनातील अशाच सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जातो. समुद्र ओलांडून किनार्यावर पोहोचणे अजून कठीण, तरीपण म्हणावे लागेल की
सावरकर हे जसे महान देशभक्त होते, तसेच ते महान साहित्यिकदेखील होते. त्यांनी राष्ट्रकार्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी स्वतःकडील सर्व साहित्यिक पैलूंचा किंवा फॉर्मेट्चा उपयोग करून घेतला होता. त्यांनी जशी देशभक्तीपर गीते लिहिली, तशीच विरहकाव्ये, महाकाव्ये लिहिली. त्याचबरोबर लावणी, फटका, पोवाडा, नाट्यसंगीत असे काव्यप्रकारदेखील हाताळले होते. त्याप्रमाणेच कादंबरी, निबंध, ललित, ऐतिहासिक अशा साहित्य प्रकारांतदेखील लेखन केले. त्यामुळे सावरकरांच्या देशभक्तीप्रमाणे अनेक कलाप्रेमींना सावरकरांच्या साहित्यानेदेखील भुरळ घातल