(India Slams Bangladesh After Hindu Leader's Murder) बांगलादेशातील दिनाजपूर येथील एका हिंदू समुदायाच्या नेत्याचे त्यांच्या घरातून अपहरण करून त्यांना मारहाण करून त्यांची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध व्यक्त करत बांगलादेशात युनुस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
Read More
Muhammad Yunus यांना सत्तासूत्रे हाती येताच विसर पडला. त्यांनी बांगलादेशच्या इतिहासापासून ते परराष्ट्र संबंधांपर्यंत घड्याळाचे काटे उलटेच फिरवण्याचा जणू चंग बांधलेला दिसतो. म्हणूनच चीनच्या दौर्यावर असताना, “भारतातील सप्तभगिनींचा प्रदेश हा भूवेष्ठित असून, आम्हीच समुद्राचे संरक्षक आहोत,” असा मोठेपणा मिरवत, युनूस यांनी चीनला या भागात जणू घुसखोरीचे खुले आमंत्रणच दिले. एवढेच नाही, तर भारताला ईशान्येकडील राज्यांशी जोडणार्या सिलिगुडी कॉरिडोरनजीक बांगलादेशच्या सीमेवरील लालमोनिरहाट येथे चीनला हवाईतळ उभारणीसाठीही य
Bangladesh चे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उधळून लावल्यानंतर बांगलादेश सरकारची धुरा मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने घेतली. त्यानंतर आता त्यांनी बांगलादेशातील अभ्यासक्रमात बदल करण्यास सुरूवात केली.
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाने पंतप्रधान शेख हसीना यांच्या दीर्घकालीन सत्तेला संपुष्टात आणले. जगभरातील काही माध्यमांनी याला ‘ऐतिहासिक’ आणि ‘लोकशाहीचा विजय’ म्हणून सादरही केले. पण, खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे की, हा लोकशाहीचा विजय होता की सत्तांतराच्या प्रयोगाचा एक भाग? आणि हे विद्यार्थी नेते, ज्यांना आत्तापर्यंत ‘क्रांतीचे नायक’ म्हणून गौरवले जात होते, ते खरोखरच देश चालवण्याइतके सक्षम आहेत का? ‘नाहिद इस्लाम’ या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते, आता स्वतःचा पक्ष स्थापन करून सक्रिय राज
डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट निर्णय म्हणजे, बांगलादेशचे भविष्य आता पंतप्रधान मोदींच्याच हातात असल्याचं दिसतंय... #NarendraModi #DonaldTrump #MuhammadYunus #Bangladesh #USA #India #Hindu #News #MahaMTB
Bangladesh राजधानी ढाकामधील तुरागच्या एका मंदिरावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला आणि दोन मूर्तींची तोडफोड केली. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास सेक्टर १८ विभागात घडली आहे. सोलाहाटी सार्वजनिक दुर्गा मंदिरात असलेल्या मूर्तींची विटंबना करण्यात आल्याचे वृत्त आहे.
बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. मात्र, बांगलादेशची परिस्थिती अद्यापही ‘जैसे थे’च आहे. मोहम्मद युनूस स्वतः बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि महत्त्वाचे म्हणजे अर्थशास्त्रात ‘नोबेल’ पारितोषिक विजेते असतानाही, त्यांना आता बांगलादेश सांभाळणे कठीण जात आहे. बांगलादेशातील रेल्वे कर्मचारी संपावर गेल्याने येथील रेल्वे व्यवस्था ठप्प झाली असून, देशभरातील रेल्वेगाड्या बंद असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. एकीकडे हे, तर दुसरीकडे युनूस सरकारच्या विरोध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारताच, निर्णयांचा धडाका लावला आहे. अमेरिकेतील निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी, वेगवान निर्णय घेण्याची सुरुवात ट्रम्प प्रशासनाने केली आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेताच, अवैध घुसखोरांना बाहेर पडण्यास सांगितले होते. त्याचबरोबर अन्य काही लोकप्रिय निर्णयही त्याच दिवशी त्यांनी घेतले. असंख्य लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाका ट्रम्प यांनी कायम राखला आहे. ट्रम्प यांच्या या धडाक्यामध्ये अजून एका निर्णयाची भर पडली. ट्रम्प या
Bangladeshi देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमक्या देणाऱ्या बांगलादेशीस्थित असलेल्या एका कट्टरपंथी सरजीस आलमवर खटला दाखल केला आहे. विद्यार्थ्यांनी निदर्शने करत बांगालदेशच्या पंतप्रधानपदी शेख हसीना यांची हकालपट्टी केली होती. त्यावेळी आलम प्रसिद्धीझोतात आला होता. मात्र आता सरजीस आलमला अटक करण्यात आली आहे.
बांगलादेश मध्ये अल्पसंख्यांक हिंदू समाजावर सुरू असलेले अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. या अत्याचाराच्या विरोधात भारतात जागोजागी निदर्शनं सुरू आहेत. अशातच आता भारताने चर्चेच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी धाका येथे पोहोचले असून भारत आणि बांगलादेश यांच्या मध्ये द्विपक्षीय बैठक होणार असल्याची चर्चा आहे.
(Pakistan Embassy) बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंविरोधातील अमानवी हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले आहे. हिंदूंविरोधात हिंसाचाराच्या घटनांची गुन्हेगार बांगलादेशची कट्टरवादी धर्मांध संघटना जमात-ए-इस्लामीला पाकिस्तानची फूस असल्याचे समजते आहे.
बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार अद्याप थांबलेला नाही. बांगलादेशातील हिंदू त्यांच्याच मायभूमीत परका आणि पोरका झाला. का? तर केवळ ते मुस्लीम नाहीत म्हणून! मात्र, ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ म्हणत कुणीही पुरोगामी पुढे आला नाही, की कुणाही निधर्म्याने मेणबत्त्याही पेटवल्या नाहीत. दुःख झाले ते केवळ हिंदू म्हणून अस्मिता बाळगणार्या हिंदूंनाच! ‘ऑल आईज ऑन पॅलेस्टाईन’ म्हणत काही लोक कण्हत, कुंथत होते. पण, त्यांचे डोळे बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचाराबाबत फुटले आहेत. त्यांचे मौन बरेच काही सांगून जाते. बांगलादेशातील स
Muhammad Yunus बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर हिंदूंवरील अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे. काही दिवसांआधी इस्कॉनशी संलग्न असलेले धर्मगुरू चिन्मय कृष्णादास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता बांगलादेश सरकारने यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. अंतरिम सरकारचे मुहम्मद युनूस यांचे सचिव आलम यांनी माहिती दिली आहे. आलम म्हणाले, की त्यांच्या सरकारला भारताबाहेर चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या ढाका येथील दौऱ्याआधी
Bangladesh शेख हसीना यांचे ऑगस्ट महिन्यादरम्यान सरकार बरखास्त करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. तुरूंगातून पलायन झाल्याच्या घटनेनंतर बांगलादेशात तब्बल ७०० कैदी फरार झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये काही इस्लामिक आणि मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येणाऱ्या कैद्यांचा यामध्ये समावेश आहे. याप्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यानी दिली आहे. यामुळे शेख हसीना यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर बांगलादेशी लष्कर आरोपींना पकडण्यासाठी आणि कैद्यांना शिक्षा देण्यासाठी असमर्थ ठरले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने
‘नोबेल’ पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील सरकारने हिंदू समुदायाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना राबवलेल्या नाहीत. तेथील हिंदू तसेच अन्य अल्पसंख्याक अजूनही असुरक्षितच असून, कट्टरतावाद्यांच्या हातचे बाहुले ठरलेल्या युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशचे भवितव्य अंध:कारमयच!
(Syed Ahmed Bukhari) दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाला"निंदनीय" म्हटले आहे. तसेच बांगलादेशाच्या युनुस सरकारला ही कृत्ये थांबविण्यासाठी विनंती करत त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले.
बांगलादेश मध्ये युनुस सररकारच्या राज्यात अल्पसंख्यांक हिंदू समाजाला यातना भोगाव्या लागता आहेत. धर्मांध आणि कट्टरपंथीय यांच्याकडून हिंदू समाजावर होणारे अत्याचार शमण्याचे नाव घेत नाहीये. अशातच आता, हिंदू पत्रकार मुन्नी शाह यांना ३० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. धाका इथल्या कारवान बाजार इथून मुन्नी शाह यांना अटक करण्यात आली.
बांगलादेश मधील युनुस सराकारचा हिंदू विरोधी अजेंडा आता लपून राहिलेला नाही. या अजेंडाचा गंभीर परिणाम आता भारत - बांगलादेश संबंधांवर आणि त्याहून विशेष म्हणजे सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसतो आहे. बांगलादेशमध्ये वाढत्या भारतविरोधी आणि हिंदूविरोधी भावनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्रिपुराहून पश्चिम बंगालला जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अल्पसंख्यांक हिंदू समाजावरील अत्याचाराने आता कळस गाठल्याची चिन्हं आहेत. कोलकाता मध्ये निवास करणाऱ्या सयान घोष जेव्हा काही कामानिमित्त धाकाला गेला होता, त्या वेळेस त्याला त्याचा धर्म कोणता हे विचारून काही कट्टरपंथीयांनी मारायाला सुरूवात केली.
नवी दिल्ली : मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार बांगलादेशातील नागरिकांसह अल्पसंख्याकांचे संरक्षण ( Protect Hindus ) करण्यासाठी जबाबदार आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी संसदेत केले आहे.
बांगलादेशच्या युनूस सरकारने उच्च न्यायालयात इस्कॉन या हिंदू संघटनेचे 'मूलतत्त्ववादी' असे वर्णन केले आहे. इस्कॉनवर बंदी घालण्याची कारवाई आधीच सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे. इस्कॉनच्या एका संताच्या अटकेनंतर युनूस सरकार ने कारवाईचा बडगा उगारला आहे. इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका एका मुस्लिम वकिलाने हायकोर्टात दाखल केली आहे.
बांगलादेश मध्ये महम्मद युनुस यांचे सरकार आल्यानंतर सुद्धा तेथील अस्थिरता कमी व्हायचं नाव घेत नाहीये. अल्पसंख्यांक आणि त्यातही हिंदू समाजाच्या लोकांवर होणारे अन्याय अत्याचार दिवसागणिक वाढतच चालले आहेत. अशातच आता बांगलादेश मधील शहिद स्मृती डिग्री कॉलेजच्या हिंदू प्राध्यपकांना तसेच प्राचार्यांना बळजबरी करत राजीनामा देण्यास सांगितले आहे. इस्लामी मूलत्तववादी आणि बांगलादेशी सैन्याच्या आदेशावर हा राजीनामा घेण्याता आली आहे. माध्यमांवर या संदर्भातील फोटो सुद्धा व्हायरल झाला आहे.
बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेल्या मोहम्मद युनूस यांच्याविरोधात अमेरिकेतील बांगलादेशी नागरिकांनी नुकतीच जोरदार निदर्शने केली आहेत.
देशातील मोठा उद्योग समूह अदानी ग्रुपने बांगलादेशच्या अंतरिम सरकारला वीज प्रकल्पाला इशारा दिला आहे. बांगलादेशमधील राजकीय स्थित्यंतरानंतर नव्याने स्थापित झालेले युनुस सरकारला वादग्रस्त उर्जा प्रकल्पाची थकबाकी भरल्यास मोठे आर्थिक संकटास सामोरे जावे लागेल, असा इशारा अदानी समूहाने दिला आहे.
बांगलादेशात हिंदूंवर जो रक्तरंजित अत्याचार झाला, त्याची अखेरीस दखल संयुक्त राष्ट्रसंघाला घ्यावीच लागली. आपल्या ताज्या अहवालात तेथे 650 जणांचा हिंसाचारात मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्राने मान्य केले आहे. त्याचवेळी प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षाही जास्त असू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. बांगलादेशातील परिस्थिती जेव्हा चिघळली, तेव्हाच त्वरेने संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करत, त्यावर नियंत्रण मिळवले असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे ही संयुक्त राष्ट्राला उशिरा आलेली जागच!
बांगलादेशातील सत्तापालटानंतर शेख हसीनांनी देश सोडला. सध्या नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे हंगामी प्रमुख म्हणून कारभार पाहत आहे. युनूस यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतरही बांगलादेशातील हिंदूंवर अतोनात अत्याचार सुरू आहेत.
Muhammad Yunus बांगलादेशातील मोठ्या राजकीय उलथापलथीनंतर नव्याने अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या अंतरिम सरकारची सूत्रे ही नोबेस पारितोषिक विजेते मोहम्मद सुनूस यांच्या हाती सोपवण्यात येणार आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच बांगलादेशात काही दिवसांपासून बांगलादेशी विद्यार्थ्यी आंदोलन करत होते. मात्र आता त्याच विद्यार्थ्यांनी मोहम्मद युनूस यांच्या हाती अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.