गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून यावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, आता यावर पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवार, ३० एप्रिल रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More
केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत निषेध व्यक्त केला.
राज्यभरात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत राज ठाकरेंना मोलाचा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत प्रतिपालिका सभागृह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आदित्य ठाकरेंना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबतच कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनादेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, मनसेतील दुसऱ्या फळीतील काही नेत्यांचा या यूतीला विरोध असल्याचे दिसते. या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत न जाण्यासाठी पक्षनेतृत्वाला विनवणी केल्याचीही चर्चा आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे, अशी मागणी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. दरम्यान, आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज्यभरात सध्या मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत जाण्याची तयारी दाखवत एक अटदेखील ठेवली आहे. महाराष्ट्राचे हित ही एकच माझी शर्त असल्याचे ते म्हणाले.
राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. यातच आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी याबद्दल एक सूचक ट्विट केले आहे.
सध्या ज्यांना उद्योग नाहीत ते भाषेवरून वाद घालतात आणि त्यातच ते वेळ घालतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आले. परंतू, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवला आहे. यावर अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मंगळवार, १५ एप्रिल रोजी भेट घेतली. त्यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. यावर आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपण मराठी म्हणून एकत्र येणे, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणे आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे योग्य स्मरण ठरेल, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
(MNS News) मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मनसैनिक आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरात सध्या वाद सुरु असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे एक बॅनर झळकले आहे. एकीकडे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होतीये तर दुसरीकडे, औरंगजेब इथे गाडला गेला, अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले आहे.
(Raj Thackeray on Aurangzeb Tomb Controversy) दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे रविवार दि. ३० मार्च रोजी पार पडला. यावेळी राज्यभरातून आलेल्या मनसैनिकांना मार्गदर्शन करताना मनसेअध्यक्ष राज ठाकरे विविध विषयांवर भाष्य केले. सध्या राज्यात सुरु असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर त्यांनी परखड मत मांडून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करतात. यावर्षीदेखील रविवार, ३० मार्च रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी मैदान सज्ज आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले असून संदीप देशपांडेंवर मुंबई शहराध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रविवार, २३ मार्च रोजी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मनसेच्या बैठकीत विविध नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाकुंभातील गंगा मातेच्या केलेल्या वक्तव्यावरून त्यांना अनेक टीकांना सामोरे जावं लागत आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राज ठाकरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जगभरातील ६० कोटींहून अधिक हिंदूंनी गंगेत डुबकी लावली. त्यावर आता राज ठाकरे यांनी गंगेत मिसळलेल्या हाडांचे पाणी मी पिणार नसल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये उपस्थितांना संबोधित करत म्हणाले आहेत.
Marathi Bhasha Gaurav Din मराठी विषयात एम.ए. करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवहेलना केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच एम.ए मराठी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट पालिका मुख्यालयात जाऊन याबाबत पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी थेट पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन हे परिपत्रक त
(Uday Samant Meet Raj Thackeray) राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी शनिवारी दि. २२ फेब्रुवारीला सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, याविषय़ी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र मंत्री उदय सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क मैदानावर भव्य अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार असून अनेक दिग्गज मंडळी कविता वाचन करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.
महापालिकेच्या जमिनीत केबल्सचे जाळे टाकून भरघोस उत्पन्न मिळवणाऱ्या सर्व खाजगी कंपन्यांकडून कर आकारावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना केली आहे. शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर त्यांच्यात चर्चा झाली असून ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही माझी वैयक्तिक भेट असून यात कुठलीही राजकीय चर्चा नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिले. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
" पूर्वीच्या काळी साहित्यिक वेगवेगळ्या विषयावर बोलायचे, आपले मत मांडायचे. आताच्या साहित्यिकांनी सुद्धा भूमिका घेतली पाहिजे, समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे " असे मत व्यक्त केले आहे राज ठाकरे यांनी. पुण्यात आयोजित केलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार स
निवडणूकीत नक्की काय घडलं यावर माझे मंथन सुरु असून लवकरच यावर सविस्तर बोलेन, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जे घडले ते विसरून जा आणि कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी मनसैनिकांना केले आहे.
मनमोहन सिंगांनी न बोलता जे करून दाखवलं ते अनेकांना बोलूनही करता आलं नाही, अशा भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांच्या आठवणी जागवल्या.
मुंबई : राजकीय वर्तुळात कधीही एकत्र न येणारे दोन भाऊ भाचाच्या लग्नात शेजारी शेजारी उभे असलेली व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Thackeray ) व उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे राजकीय विरोधक असणारे चक्क एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले आणि संवादही साधल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचे लग्न २२ डिसेंबर २०२४ रोजी पार पडले. या लग्नात दोन्ही मामांनी पुढाकार घेऊन जबाबदारीही सांभाळली. या कौटुंबिक भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
(Ustad Zakir Hussain) जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेतच वास्तव्यास होते. त्यांच्या निधनानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही समाजमाध्यमांवर एक खास पोस्ट लिहून झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "त्यांच्या
नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत फडणवीसांचे अभिनंदन केले.
(Avinash Jadhav) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे दिला. परंतु, राज ठाकरे यांनी तो स्वीकारलेला नाही. तसेच अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेत राजीनामा मागे घेतला आहे. या भेटीची सविस्तर माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
Avinash Jadhav महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणाच्या माहितीचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे मनसे पक्षासाठी ही धक्कादायक घटना आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. अविनाश जाधव हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सच्चे साथीदार आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीला स्वबळावर सामोरे गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांच्या झंझावातापुढे महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांचा धुव्वा उडाला आहे. मनसेच्या पक्ष मान्यतेबरोबरच कायमस्वरुपी मिळालेले रेल्वे इंजिनही यार्डात जमा करण्याची वेळ राज ठाकरेंवर येण्याची शक्यता आहे.
मुंबई : दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ( Amit Thacheray ) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो,” असे अमित यांनी म्हटले आहे.
वसई-विरार परिसरातील प्रस्थापित बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकुर आणि त्यांचे सुपुत्र क्षितिज ठाकुर यांचा दोन्ही जागांवर भाजपने पराभव ( Assembly result ) केला आहे.
Raj Thackeray Tweet महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळाले आहे. २८८ पैकी २३० जागांवर महायुतीने दमदार विजय मिळवला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्याचे चित्र आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन शब्दातच आपल्या भावना ट्विट करत व्यक्त केल्या आहेत.
जे लोक निघून गेलेत त्यांना उद्धव ठाकरे गद्दार म्हणतात. पण तर घरात बसले आहेत. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आणि अख्ख्या पक्षाची वाट लावली, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपले बंधू उद्धव ठाकरेंवर केली आहे. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
(Eknath Shinde) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त २ दिवस उरले आहेत. राज्यात २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पुढील काही तासात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या सगळ्या रणसंग्रामात काही गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. राज ठाकरेंसोबतचे संबंध चांगले असताना बिनसलं कुठे, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मौन सोडले आहे.
(MNS Manifesto) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील पक्ष प्रचारसभा, दौरे, जाहीरनामे प्रसिध्दी या सगळ्यांमध्ये व्यस्त आहेत. आजमितीस महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले जाहीरनामे प्रसिध्द केले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यावेळी त्यांनी 'आम्ही हे करू' या शीर्षकाने हा जाहीरनामा प्रकाशित करत आपली भूमिका मांडली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील MIG क्लब येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत
(Raj Thackeray) विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून आपला विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करत आपली भूमिका मांडली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील MIG क्लब येथे हा कार्यक्रम पार पडला.
( Raj Thackeray ) दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये दि. ११ नोव्हेंबर रोजी उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवडणूक चिन्हासकट शिंदेंकडे गेली. आज उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय आणि फक्त खान उरले आहेत", अशा शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. तसेच वर्सोव्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हारून खान यांच्या उमेदवारीवरही त्यांनी टीका केली आहे.
( Raj Thackeray )राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच टीसचा एक धक्कादायक अहवाल सध्या खूप चर्चेत आहे. या अहवालाची राजकीय वर्तुळातही बरीच चर्चा झाली. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागाठाणे मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना या अहवालावर भाष्य केले.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय राजन शिरोडकर ( Rajan Shirodkar ) यांचे मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते राजकारणापासून दूर होते.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भांडूपमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेन, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी आपल्या नियमित पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलणार, असा जोरदार पलटवार केला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मुस्लीम मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत. सर्व मुस्लीमांनी एकत्र यावे आणि मतदान करावे, अशी मागणी करत तुमच्या नाकावर टीच्चून व्हिडिओ काढत आहेत. जर मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत ना तर आज राज ठाकरे फतवे काढतो आहे.
संपूर्ण मराठवाडा हा आधी हिंदुत्वाने भारावलेला होता. पण महान संत शरदचंद्रजी पवार यांनी लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी जातीचं राजकारण आणलं, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. बुधवारी लातूरच्या रेणापूरमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ठाणे : ( MNS ) विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी प्रचारासाठी दंड थोपटले असुन नेतेमंडळीनीही आता कंबर कसली आहे. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विधानसभेसाठी पहिली जाहिर प्रचार सभा सोमवारी (ता. ०४ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ५ वा. ठाण्यातील ब्रम्हांड सर्कल येथे होत आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय्यत तयारी केली असून मनसे नेते अभिजीत पानसे, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सैनिक सज्ज झाले आहेत.
Amit Thackeray महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. अमित ठाकरेविरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानाच उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. काही दिवसांआधी अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते आता प्राचारासाठी लोकांच्या घरोघरी जात प्
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी सिंघम अगेन चित्रपटाची टीम उपस्थित होती. दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगण आणि अगेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता अखेर अर्जुननेच ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं आहे.