‘द कश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटांतुन समाजातील दाहक वास्तव जगासमोर मांडणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. नुकताच त्यांना ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर लागलीच त्यांनी त्यांच्या ‘महाभारता’वर आधारित आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
Read More
बॉलीवूड अभिनेत्री पल्लवी जोशीला 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा किताब मिळाला आहे. या चित्रपटात जोशीने राधिका मेनन या पत्रकाराची भूमिका साकारली आहे, जी काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची कहाणी उलगडण्याचा प्रयत्न करत आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द ‘व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट गुरुवार, दि. २८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. भार्गवा यांनी ‘कोव्हॅक्सिन’ लस कशी आणि कोणत्या स्थितीत विकसित केली, याबद्दलचे सत्य चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पल्लवी जोशी आणि नाना पाटेकर यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद...
करोनाच्या सावटातून जगाला वाचवण्यासाठी ‘कोवॅक्सीन’ ही भारतीय लस तयार करणारे डॉ. बलराम भार्गवा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या महिला शास्त्रज्ञांची गोष्ट ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून लवकरच आपल्यासमोर येणार आहे. ‘द काश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ असे सत्य घटनांवर आधारित यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केलेले विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा एक नवा विषय मांडण्याचा विडा उचलला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हिने पत्रकारांशी संवाद साधत चित्रप
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात करोना महामारीपासून देशालाच नव्हे तर संपुर्ण जगाला वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी कोवॅक्सिन लस तयार केली. असमान्य परिस्थितीतही डॉ. भार्गवा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शास्त्रज्ञांनी कोवॅक्सिन लस कशी तयार केली याची रंजक आणि थरारक कथा द वॅक्सिन वॉर या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री गिरीजा ओक हिने देखील एक महत्वपुर्ण भूमिका साकारली आहे. काही कलाकारांना पुढे-पुढे करण्याची सवय असते असं
बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी हिने कला क्षेत्रात फार मोठा पल्ला गाठला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माती म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यापासून मराठी मनोरंजसृष्टीत पुन्हा पल्लवी दिसलीच नाही. पुन्हा मराठी मनोरंजनसृष्टीत येणार का? असा प्रश्न विचारला असता कला दिग्दर्शक नितीन देसाईंसोबत मराठीत काम करणार होते, परंतु आता ते शक्य नाही असे म्हणत नितीन यांच्या आठवणीत पल्लवी जोशी भावूक झाली. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रप
करोनाच्या सावटातून लोकांना वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी पुढाकार घेत स्वत:ची कोवॅक्सिन लस तयार केली. डॉ. बलराम भार्गवा आणि त्यांच्या महिला शास्त्रज्ञांच्या चमुने ही करोनावरील लस कशी तयार केली याची सत्य कथा सांगणारा चित्रपट 'द वॅक्सिन वॉर' विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हिने बातचीत करताना डॉ. भार्गवा यांनी 'गोईंग वायरल' हे पुस्तक कोवॅक्सिन लसीवर लिहिले होते. या पुस्तकाचे मालकी हक्क 'द वॅक्सिन वॉर' चित्रपटासाठी त्यांनी केवळ १ रुप
बहुचर्चित ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात झाला. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावेळी नाना पाटेकरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि त्यांना या चित्रपटासाठी कसे कास्ट करण्यात आले याचा रंजक किस्सा विवेक अग्निहोत्री यांनी सांगितला.
‘द वॅक्सिन वॉर’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आगामी चित्रपटात डॉ. बलराम भार्गवा यांची भूमिका नाना पाटकेर यांनी साकारली आहे. मात्र, चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यापुर्वी नाना कधीच डॉ. भार्गवा यांना भेटले नसल्याचा खुलासा अभिनेते नाना पाटेकर यांनी केला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे विशेष कौतुक नानांनी केले. “संपुर्ण टीमने विषयाचे सखोल संशोधन केले आहे आणि मला डॉ. भार्गवांबद्दल जी माहिती दिली त्यावरुन मी त्यांची व्यक्तिरेखा साकारली असल्याची कबूली देखील नानांनी दिली. त्यामुळे च
बहुचर्चित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाने संपुर्ण चित्रपटसृष्टी आणि जनजीवन हादरवून टाकले होते. या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि करोना काळानंतर उत्तम कामगिरी करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचा आणखी एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्तव्य
'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाची प्रचंड घोडदौड सुरू आहे. पहिल्याच आठवड्यात जगभरात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने १०७.८० कोटींची कमाई केली आहे
साधारण ३० ते ३५ वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे, त्यांच्यावरील नृशंस नरसंहाराचे हृदयद्रावक वास्तव विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि पल्लवी जोशी निर्मित 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट दि. ११ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, त्यानिमित्ताने या चित्रपटाची निर्माती आणि कलाकार पल्लवी जोशी यांच्याशी ‘दै. मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचित...
आगामी काश्मीर फाईल्स चित्रपटामध्ये अभिनेत्री पल्लवी जोशींची महत्त्वाची भूमिका असणार आहे