महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज ध्वजवंदन करण्यात आले.
Read More
: ( MHADA documents at one click ) ‘म्हाडा’चे स्कॅन केलेले सुमारे १५ कोटी कागदपत्रे (काही संवेदनशील कागदपत्रे वगळून) सार्वजनिक केले जाणार असून ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळावर येत्या आठ दिवसांत अपलोड केली जाणार आहेत.
म्हाडाचे स्कॅन केलेले सुमारे १५ कोटी कागदपत्रे, नस्त्या (संवेदनशील वगळून) सार्वजनिक केले जाणार असून 'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळावर येत्या आठ दिवसात अपलोड केली जाणार आहेत. यामुळे 'म्हाडा'शी संबंधित विविध माहिती व दस्तऐवज नागरिकांना अधिक सुलभतेने एका क्लिकवर केवळ बघण्यासाठी वर्गवारीनुसार उपलब्ध होणार आहेत. याद्वारे 'म्हाडा' पारदर्शक कारभाराच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पाऊल टाकत असल्याचे 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
( draw for 105 residents on the MHADA master list has been completed ) ‘म्हाडा’च्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या बृहतसूचीवरील पात्र मूळ भाडेकरू, रहिवासी यांना देण्यात येणार्या जुन्या निवासी गाळ्याच्या मूळ अनुज्ञेय क्षेत्रफळाव्यतिरिक्त जास्त क्षेत्रफळाकरिता आकारण्यात येणार्या 110 टक्के रकमेऐवजी 100 टक्के रकमेची आकारणी करण्याबाबतचा निर्णय ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’चे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी गुरुवार, दि. 24 रोजी जाहीर केला.
शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका म्हाडाच्या माध्यमातून बांधून देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी घेतला.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे म्हाडामार्फत दोन हजार ५०० आणि महादुला येथे एनएमआरडीए मार्फत एक हजार २०० घरकुलांच्या उभारणीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचे आणि प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. या प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता आणि अन्य मागण्यांवर आज मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
मोतीलाल नगरचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना घराच्या बदल्यात थेट घर मिळणार आहे. त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये न पाठवता त्यांचे थेट पुनर्वसन करण्यात येणार आहे.
( MHADA CEO Sanjeev Jaiswal ) “मुंबईत जमिनीची उपलब्धता कायमस्वरूपी आव्हान आहे. म्हाडाला रखडलेले प्रकल्प ताब्यात घेण्यास सक्षम बनवणार्या कलम ९१ अ मध्ये अलिकडेच सुधारणा करण्यात आली. सेस बिल्डिंग पुनर्विकासात दीर्घकाळ अडथळा असलेल्या जमीन मालकांना भरपाई देण्याचे काम आता कलम७९ अ अंतर्गत न्याय्य तरतुदींसह केले जात आहे. पुनर्विकास म्हणजे केवळ नवीन इमारती बांधण्याबद्दल नाही तर व्यवहार्यता, पारदर्शकता आणि वेळेवर वितरण करणे ही यात अध्याहृत आहे. यातील भाडेकरूंचे हक्क आणि प्रकल्प व्यवहार्यता दोन्ही सुरक्षित करण्यासाठी
( MHADA to launch Affordable healthcare initiative ) म्हाडाच्या रहिवाशांसाठी मह्त्त्वाची माहिती समोर आली आहे. म्हाडाच्या ३४ वसाहतीमधील रहिवाशांना अवघ्या एक रुपयात वैद्यकीय उपचार मिळणार आहे. म्हाडाच्या ३४ वसाहतींमध्ये स्वस्त दरातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी म्हाडा मुंबई मंडळाने मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल या खासगी संस्थेच्या वन रुपी क्लिनिकसोबत सामंजस्य करार केला आहे.
( MHADA budget presented ) ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण’ (म्हाडा)च्या वर्ष 2025-2026च्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण 19 हजार, 497 घरांच्या उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 9,202.76 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
( MHADA ) “कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने विविध प्रकरणांवर अपील अंतर्गत ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’चे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात घेतल्या जाणार्या सुनावण्यांमध्ये निर्णय झाल्यानंतर संबंधित आदेश सात दिवसांच्या आत निर्गमित करावेत,” असे स्पष्ट निर्देश ’म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
( Sanjay Upadhyay on MHADA land ) “मुंबई शहर आणि उपनगरात ‘म्हाडा’सह शासकीय जमिनींवर मोठ्या प्रमाणात ‘हिरवी’ अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यात अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे मानखुर्दमध्ये २०० फूट उंचावर एक मजार बांधण्यात आली आहे. जमिनीवर मजार असते, पण येथे तिसर्या माळ्यावर मजार थाटण्यात आली आहे. हे जगातील आठवे आश्चर्य आहे. वाढती अतिक्रमणे मुंबईच्या सुरक्षेसाठी घातक असल्याने ती तत्काळ हटवण्यात यावी,” अशी मागणी भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी मंगळवार, दि. २५ मार्च रोजी विधानसभेत क
३६ दोषी मालक विकासकांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी दि. २० मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकं
शिरढोण व खोणी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध; इच्छुकांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
( MHADA Konkan Mandal ) ‘म्हाडा’च्या ‘कोकण व गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळा’तर्फे मौजे शिरढोण व मौजे खोणी (ता. कल्याण जि. ठाणे) येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना’ (शहरी) अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत शाळा व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडांच्या विक्रीसाठी मंडळातर्फे निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
(Devendra Fadnavis) स्वयंपुनर्विकास नाही, हा तर आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण ‘श्वेतांबरा’चे उद्घाटन केले आहे. श्वेतांबरा चे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितले, तेव्हा खर्या अर्थाने स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते, हे माझ्या लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकते. तसेच सगळ्यात महत्त्वाचे जर काही असेल, तर आत्मनिर्भरता आली,” असा विश्वास मु
समूह पुनर्विकासाबाबत कृती आराखडा तयार करा ; दादर, प्रभादेवीमधील प्रस्तावित समूह पुनर्विकासासंदर्भात बैठक
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मुंबईतील जुहू-अंधेरी येथील ८ एकर (३२,९१३ चौरस मीटर) जमीनवरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवून ही जागा यशस्वीरित्या परत मिळवली आहे.
पुनर्विकासात खोडा घालणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची मागणी; डीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारावीकर देणार निवेदन
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालय घराचा ताबा घेण्यासह विविध कामांसाठी तान्ह्या बाळाला सोबत घेऊन येणाऱ्या महिलांची अनेकदा अडचण होते. स्तनपान वा बाळाच्या आरामासाठी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होते. आता मात्र त्यांची ही गैरसोय आता दूर झाली आहे. वांद्रे येथील म्हाडा भवनात सुसज्ज असे हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहे.
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही ४९३ घरे २० टक्के सर्वसमावेश योजनेतील असून या घरांच्या सोडतीची साठीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता सुरुवात झाली.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण विभागाची सोडत बुधवार दि.५ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) आठव्या 'लोकशाही दिनाचे' आयोजन दि. १३ जानेवारी रोजी म्हाडा मुख्यालयात दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २२६४ सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
भारत सरकारच्या नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाची (एमएमआर) गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड केली असून या भागात सन २०३० पर्यंत सुमारे ३० लाख परवडणारी घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी आठ लाख घरे उभारणीची जबाबदारी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) घेतली असून सदर उद्दिष्टपूर्तीसाठी विकासक, बांधकाम व्यावसायिक यांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले.
म्हाडा कोकण मंडळाच्या २,२६४ घरांच्या सोडतीची अर्ज विक्री प्रक्रिया मंगळवारी संपुष्टात येत असून अर्ज विक्री-स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत २,२६४ घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ ४९८९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेर अर्ज विक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार आता १० डिसेंबरऐवजी २५ डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य’ तत्वावरील ११ हजार १७६ घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळाने २ डिसेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत इच्छुक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २९ ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले.
म्हाडाच्या मुंबई विभागाच्या यंदाच्या सोडतीत विविध कारणांमुळे ४४२ घरे विजेत्यांनी आपली घरे सरेंडर केली आहेत. यापैकी प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या ४०६ अर्जदारांना म्हाडाने सोमवारी स्वीकृती पत्रे पाठवली आहेत. या अर्जदारांना घर स्वीकारण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विरार-बोळींज, खोणी-कल्याण, शिरढोण-कल्याण, गोठेघर-ठाणे, भंडार्ली-ठाणे येथे ही घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरांच्या विक्रीत वाढ व्हावी व या गृहनिर्माण प्रकल्पांतील सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी दि. ०२ ते ११ डिसेंबरया कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती कोंकण मंडळाच्या मुख्य अ
राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ होत असतानाच महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणा(महारेरा)ने मोठा निर्णय घेतला आहे. महारेराने नुकतेच एक परिपत्रक जारी करून रिअल इस्टेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. नव्या निर्णयाच्या माध्यमातून ब्रोकरेज दस्तऐवजीकरण, वेळेवर पेमेंट सुनिश्चिती आणि कमिशनवरील विवाद कमी करण्यास मदत होणार आहे.
राज्यातील विविध गृहनिर्माण योजना सक्षमपणे राबविण्याकरिता व परवडणार्या किंमतीत घरे उपलब्ध होण्याकरिता सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, वास्तुशास्त्रज्ञ, विकासक व इतर सर्व संबंधित नागरिकांनी आपल्या सूचना गृहनिर्माण विभागाचे सल्लागार यांचे म्हाडा गृहनिर्माण भवनातील कार्यालय येथे पाठविण्याचे आवाहन गृहनिर्माण विभागाचे सल्लागार राजेंद्र मिरगणे यांनी केले आहे.
म्हाडा कोंकण मंडळाच्या विरार बोळींज वसाहतीतील टप्पा क्रमांक १,२ व ३ मधील अल्प, मध्यम उत्पन्न गटातील ९४०९ सदनिकाधारकांकडून आकारण्यात येणारे मासिक सेवाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवाशुल्क कमी करण्याबाबत वसाहतीतील रहिवाशांकडून व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. त्याबाबत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सदर प्रकल्पामध्ये आजतागायत प्रत्यक्ष ताबा घेतलेल्या व यापुढे
अभ्युदय नगरच्या समूह पुनर्विकासासाठी निविदा
मुंबई पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात म्हाडाला २५०० घरे म्हाडा बांधेल. या २५०० घरांच्या उभारणीसाठी नुकत्याच निविदा अंतिम करून राज्य सरकाराला पाठविण्यात आल्या. या निविदांना राज्य सरकारने मंजुरी दिली अजून येत्या २ दिवसात पत्रा चाळीतील घरांचे काम सुरु होईल. या इमारती उंच असल्याने या बांधण्यासाठी साधारण अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. २०२४मध्ये हे काम सुरु होऊन २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे मंगळवार दि.८ रोजी २०३० सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात आली. ज्यासाठी १ लाख १३ हजार ८११ अर्ज प्राप्त झाले होते. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घर मिळण्याची प्रक्रिया आणि जिंकल्यास आनंदाची अनुभूती घेण्यासाठी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील अर्जदार नागरिक या कार्यक्रमाला हजर होते.
(MHADA)‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून १ लाख, ३४ हजार, ३५० अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत. यापैकी १ लाख, १३ हजार, ८११ अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. दरम्यान, शुक्रवार, दि. २७ रोजी म्हाडाची प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रारूपयादी प्रसिद्ध झाल्यापासून
:'म्हाडा' मुंबई मंडळाच्या २ हजार ३० घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया गुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी संपुष्टात आली.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने विविध गृहनिर्माण प्रकल्पातील २,०३० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत.
(Pravin Darekar) गेल्या २४ वर्षांपासून पुनर्विकासासाठी संघर्ष करणार्या अभ्युदय नगरवासीयांना अखेर न्याय मिळाला आहे. अभ्युदय नगर ‘म्हाडा’ वसाहतींच्या पुनर्विकास जलदगतीने पूर्ण करताना, ६३५ चौ. फुटांचे घर देण्याचा क्रांतिकारी निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच घेतला. १५ हजार मराठी कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. हा प्रश्न तडीस नेण्यासाठी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. त्यानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ने
(Abhyudaya Nagar) गेल्या २५ वर्षांपासून पुनर्विकासासाठी संघर्ष करणार्या अभ्युदयनगरवासीयांना अखेर न्याय मिळाला आहे. अभ्युदयनगर ‘म्हाडा’ वसाहतींच्या पुनर्विकासाची निविदाप्रक्रिया गतिमानतेने पूर्ण करताना आणि ६३५ चौ. फुटांचे घर देण्याचा क्रांतिकारी निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर रोजी घेतला. भाजपचे विधान परिषदेतील गटनेते यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या निर्णयाचा अभ्युदयनगर वसाहतीतील १५ हजार मराठी, मध्यमवर्गीय आणि कामगारवर्गाला फायदा होणार आहे.
मुंबईतील डबेवाले (Mumbai dabbawala) आणि चर्मकार समाजाबांधवांसाठी १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी आज विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे ६० वर्षांपासूनचे स्वप्न येत्या ३ वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
म्हाडा (Mhada) मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी आता केवळ ५ दिवस बाकी आहेत. या सोडतीत २०३० घरांसाठी आत्तापर्यंत ७५,५७१ अर्ज प्राप्त झाले असून सुमारे ५५,००० अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. या संगणकीय सोडतीकरिता दि. १९ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. तर दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा अर्जदारांना भरणा करता येणार आहे. दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे
म्हाडाच्या लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना तक्रार निवारणाचे हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. 'म्हाडा'मध्ये आयोजित सहाव्या लोकशाही दिनात नऊ अर्जांवर सुनावणी पार पडली. या लोकशाही दिनात आलेल्या नऊ अर्जापैकी चार अर्ज मुंबई मंडळाशी संबंधित होते तर पाच अर्ज मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाशी संबंधित होते.
म्हाडाच्या मुंबई मंडळ सोडतीतील ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीसाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
देशभरातील अनेक शहरांमधील गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत. ४२ शहरांमधील सुमारे २ हजार गृहनिर्माण प्रकल्प रखडले असून यात एकूण ५.०८ लाख सदनिकांचा समावेश आहे. हे प्रकल्प मुख्यतः विकासकांच्या पैशांचा गैरवापर आणि काम पूर्ण करण्याची त्यांची क्षमता नसल्यामुळे रखडले आहेत, असे 'PropEquity' या डेटा ॲनालिटिक्स कंपनीने म्हटले आहे.
Mhada Lottery 2024 Mumbai महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारे बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आले असून या माध्यमातून काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले असल्याने म्हाडा प्रशासनातर्फे सदर बनावट संकेतस्थळ निर्माण करणार्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) पाचवा लोकशाही दिन 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्साहात पार पडला.
Mhada Lottery 2024 Mumbai म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते आज 'गो लाईव्ह' समारंभाद्वारे प्रारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.