मागील सहा वर्षांपासून काम सुरु असणारा सध्याचा मुंबईतील पूल म्हणजे हँकॉक पूल. माझगाव आणि डोंगरी परिसराला जोडणारा हँकॉक पूल बांधून १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र सहा वर्षानंतर हा पूल अद्याप पूर्ण झालेला नाही. या चार पदरी असणाऱ्या हँकॉक पुलाच्या दोन मार्गिका न्यायालयाच्या आदेशामुळे १ ऑगस्ट रोजी खुली करण्यात आली आहे. मात्र या पुलाचे आतापर्यंत झालेले काम हे देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे येथील स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना सांगितले.
Read More
मुंबई महानगपालीकेने २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात विविध पुलांच्या बांधकामांसाठी १५७६. ६६ कोटी निधींची तरतूद केली आहे.यात २१ पुलांचे निष्कासन करून पुनर्बांधणी करण्याचे काम, ४७ पुलांच्या मोठ्या संरचनात्मक दुरुस्त्या आणि १४४ पुलांच्या किरकोळ दुरुस्त्या करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु पुलांच्या बांधकामात होणारा भ्रष्टाचार हा चिंताजनक आहे. उदाहरणादाखल काही पुलांविषयी जाणून घेऊयात ज्यांचे विशेष वर्णन या अर्थसंकल्पात केले गेलेलं आहे.
माझगांव व डोंगरी यांना जोडणाऱ्या हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीतील महत्त्वाचा टप्पा असलेला दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत काल (दिनांक ६ जून २०२१) पूर्ण करण्यात आले. हा आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने या पुलाच्या पुनर्बांधणीला आणखी वेग येणार आहे.