Burkina Faso West African country that has been experiencing instability in recent years due to terrorist attacks, non-state armed groups, ethnic conflicts बुर्किना फासो हा पश्चिम आफ्रिकेतील देश, जो गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी हल्ले, गैरसरकारी सशस्त्र गट आणि जातीय संघर्षांमुळे अस्थिरता अनुभवतोय.
Read More
terrorist attack in Kashmir, there was a firestorm of public anger in the country There was a unanimous voice in the country to teach a lesson to Pakistan काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशामध्ये जनक्षोभाचा आगडोंब उसळला. सातत्याने भारताच्या संयमाचा उपमर्द करणार्या पाकिस्तानला धडा शिकवण्याबाबत जनतेचा एकसूर देशात उमटला. मात्र, असे असले तरीही पहलगामसारखे हल्ले हे एका मोठ्या सापळ्याचा भाग असू शकतात. त्यामुळे, भारत सरकारला जनमताबरोबर देशहिताचा विचार करणे क्रमप्राप्त असते.
( Ban on LED fishing across the country Rajiv Ranjan ) “महाराष्ट्र राज्यात ‘एलईडी’ दिव्यांद्वारे मासेमारी करण्यावर बंदी आहे. ‘एलईडी’ दिवे किंवा विविध कलाकुसरीच्या दिव्यांद्वारे मासेमारी करण्यावर अन्य राज्यांनीही बंदी घालावी,” असे निर्देश केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री राजीव रंजन यांनी सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी दिले. देशातील मत्स्यव्यवसायातील संधी, आव्हाने आणि समस्या यांविषयी किनारपट्टीच्या राज्यांच्या मत्स्यव्यवसायमंत्र्यांची एकत्रित बैठक ‘हॉटेल ताज पॅलेस’ येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
Shivacharitrashri is being created in the country capital
( terrorist attack in Pahalgam is a black day for the country and Dombivli ) काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅली येथील दुर्दैवी आणि भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमेतील तीन मराठी रहिवासी मृत्युमुखी पडले.
country' first digital education portal in Maharashtra “डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून ‘महाज्ञानदीप’या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले आहे,” अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
Kerala केरळमधील श्री नारायण धर्म परिपालन या पक्षाचे सरचिटणीस वल्लापल्ली नटेसन यांनी मुस्लिम बहुसंख्य मलप्पुरम हा एक पूर्णपणे वेगळा देश असल्याचे वक्तव्याने केरळातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या जिभेला हाड नसल्यासारखे वक्तव्य केले आहे. केरळातील मुस्लिमबहुल असणारा भागाला विभक्त ठेवत दुसरा देश घोषित करा, असे वक्तव्य नटेसन यांनी केले होते.
आर्थिक असमानता ही केवळ भारताची चिंता नसून, संपूर्ण जगाला हा प्रश्न भेडसावत आहे. स्वित्झर्लंडसारख्या श्रीमंत देशातही, मूठभरांच्या हाती देशाची संपत्ती एकवटली आहे. भारतीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी, म्हणूनच केंद्र सरकार ठोस उपाययोजना राबवताना दिसून येते.
Geography of India म्हणजे काय? भारताच्या मुख्य भूमीमधून अनेकदा अनेक राष्ट्र वेगळी झाली. त्यामुळे देशाची भूमी संकुचित झालेली दिसते. मात्र, भारताच्या मुख्य भूमीपासून आक्रमकांनी वेगळे पाडलेले देश सांस्कृतिकदृष्ट्या आजही भारताशी दृढ आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भारत देशाच्या भौगोलिक, राजकीय इतिहासाबरोबरच सांस्कृतिक इतिहासदेखील अभ्यासणे आवश्यक आहे. भारताच्या संर्वसमावेशक इतिहासाचा घेतलेला हा धांडोळा...
देशाचा सर्वांगीण विकास ( Indias Development ) करण्यासाठी देशातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर केंद्र सरकार प्राधान्याने काम करत आहे. त्याचवेळी, ग्रामीण भागातील रोजगार वाढीसाठी विविध योजना आणण्याचे कामही केंद्र सरकारने केले आहे. त्यातूनच, ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळालेली दिसून येते.
आज २०२४ ( Year 2024 ) या वर्षाच्या मैफिलीची भैरवी! सरत्या वर्षातील घडामोडींचे सिंहावलोकन महत्वाचे ठरते. २०२४ या वर्षाने जगासाठी, आपल्या देशासाठी बरेच काही अनुभव दिले. यातील मोजक्या मह्त्वाच्या देश ते राज्य पातळीवरील घटनांचा घेतलेला हा मागोवा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, राज्यात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘कंट्री डेस्क’ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा विशेष कक्ष राज्यात विदेशी गुंतवणुकीला चालना देण्याचे काम करेलच. त्यासोबत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासालाही गतिमान करण्यात ‘कंट्री डेस्क’ महत्त्वाची भूमिका बजावेल, यात शंका नाही.
(CM Devendra Fadnavis) देश - विदेशातील गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुंतवणुकदारांच्या मदतीसाठी 'कंट्री डेस्क' या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक आणि प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार केले जाणार आहे.
भारत हा कृषिप्रधान देश असला, तरी देशातील शेती ही आजही पावसावरच अवलंबून आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायत पातळीवर हवामानाचे अचूक अंदाज उपलब्ध व्हावे आणि सरकारी यंत्रणेवरील शेतकर्यांचे अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने ग्रामपंचायत स्तरावरील हवामान अंदाज देणारा एक स्तुत्य उपक्रम नुकताच सुरू केला. त्यानिमित्ताने देशातील अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायतींना लाभदायी ठरणार्या पण तरीही चर्चेत नसलेला विषय समजून घ्यायलाच हवा.
सौदी अरेबियाने अमेरिकेसोबतचा ५० वर्षांपासून सुरू असलेला करार रद्द करत, अमेरिकेला चांगलाच दणका दिला आहे. ‘पेट्रोडॉलर करार’ असे त्याचे नाव असून, यामुळे सौदी अरेबिया कोणत्याही चलनात तेल विकू शकतो.
गेल्या 10 वर्षांचा विचार करता देशामध्ये कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. तसेच वन नेशन वन टॅक्स प्रणालीमुळे आज जीएसटीचे संकलन 2 लाख कोटींपर्यंत पोहोचले असून देशाच्या विकासामध्ये चार्टर्ड अकाऊंटंटस्चे योगदानही महत्त्वाचे असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
मागील वर्षीच्या सत्तांतरानंतरही आफ्रिकी देश नायजरची स्थिती पूर्वपदावर आलेली नाही. यातच आता नायजरने अमेरिकेसोबतचा सैन्य करार तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी केलेल्या नायजरच्या दौर्यानंतर हा निर्णय घेतला गेला. अमेरिकेकडून आमच्यावर अनेक विषयांवर दबाव टाकला जात होता म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचे नाजयरच्या सैन्य प्रमुखांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत नायजरने अमेरिकेन सैन्य करार रद्द का केला, हा करार नेमका काय आहे आणि अमेरिकेसाठी नायजर इतका महत्त्वाचा का आहे, हे जाणून घेणे क्रम
युरोपात वाढत्या संरक्षण समस्यांनंतर आता डेन्मार्कनेही सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. डेन्मार्क सैन्यामध्ये आता महिलांची देखील भरती करण्याचे सुतोवाच पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी केले. फ्रेडरिकसन यांनी पत्रकार परिषदेत आम्ही युद्ध हवे आहे म्हणून नाही, तर युद्ध टाळायचे आहे म्हणून स्वतःला सज्ज करत असल्याचे सांगितले. युरोपियन देश डेन्मार्क आपल्या सैन्यामध्ये महिलांचा समावेश करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. युरोपमधील बदलती परिस्थिती पाहता, डेन्मार्क सैन्य भरती करणार आहे. त्यासाठी दोन मोठे निर्णयदेखील घे
तिसर्या जागतिक महायुद्धाच्या झळा आजही जपानसारख्या देशांना सोसाव्या लागत आहे. या युद्धात ३० हून अधिक देशांची दहा कोटींहून अधिक लोकसंख्या भरडली गेली. ज्यापैकी या युद्धादरम्यान, सात कोटींहून अधिक जण मारले गेले. आतापर्यंच्या घातक नरसंहारापैकी एक म्हणून दुसर्या जागतिक महायुद्धाकडे पाहिले जाते. मात्र, खरा खेळ युद्धानंतर सुरू झाला. युद्धामुळे बरबाद झालेल्या युरोपियन देशांचे पुनर्निर्माण करण्याच्या उद्देशाने युद्धानंतर ‘याल्टा’ आणि ’पॉट्सडॅम’ संमेलने घेण्यात आली.
हिंदी मालिकेतून भूमिका साकारत चित्रपटात विविधांगी भूमिका साकारणी अभिनेत्री हिना खान हिने थेट ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. आपल्या अभिनयाची मोहोर परदेशात उमटवण्यासाठी हिना सज्ज झाली असून तिच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटाला २०२४ ऑस्करचे नामांकम मिळाले आहे.
“ ‘एक देश एक निवडणूक’ अर्थात ‘वन नेशन वन इलेक्शन’साठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल तयार केला असून तो लवकरच कायदा मंत्रालयायाला सादर केला जाणार आहे. २०२६ च्या परिसीमनानंतर ‘एक देश एक निवडणूक’ शक्य होऊ शकते,” असे विधी आयोगाचे म्हणणे आहे.
भय, बदला आणि वस्तूरूपात विकण्यासाठी, वापरण्यासाठी इथे महिलांवर बलात्कार केला जातो. बलात्कारीत महिलेने आजन्म भीती अनुभवावी म्हणून तिला प्रचंड यातना दिल्या जातात. जेणेकरून तिचे दुःखयातना वेदना पाहून इतरांना भय वाटेल. झुंडीच्या रूपात घरात घुसून ते लोक स्त्रीवर अत्याचार करतात.
भारत हा इतर २२ देशांशी द्विपक्षीय व्यवहार रूपयातून करेल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एनडीटीव्ही शी बोलताना सांगितले. '२२ देश आपल्याशी द्विपक्षीय रुपयांत करार होईल का यासाठी चर्चा करत आहेत.' असे त्या म्हणाल्या.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप नुकतेच वाजले असतानाही केंद्रातील मोदी सरकारने दि. १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय जाहीर केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. समान नागरी संहिता विधेयक सरकार संसदेत मांडू शकते, असेही भाकित करण्यात येत आहे; त्याबरोबरच ‘एक देश, एक निवडणूक’ या संबंधीचे विधेयकदेखील सरकार आणू शकते, असाही अंदाज व्यक्त होत आहे. सरकारकडून याविषयी अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नसली, तरी त्या दिशेने जाण्याची तयारी सुरू असल्याचे काही घडामोडींवरून सूचित होत
केंद्र सरकार एक देश, एक निवडणूक देशात राबवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या संकल्पनेवर विरोधकांची आगपाखड होताना दिसत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक देश एक निवडणूक महत्वाची असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. मोदींच्या नेतृत्वात देशाचा मोठा विकास झालाय. मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. लोकसभेची निवडणूक हे आमचं पहिलं टार्गेट असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.
चीनमधील बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्राला मंदीचा मोठा फटका बसला असून, तेथील दिग्गज कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. चीनमधील बांधकाम क्षेत्र जीडीपीच्या १३ टक्के इतके असल्याने, चिनी अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसतो आहे. त्याचवेळी उत्पादन क्षेत्रही पिछाडीवर दिसते. चिनी अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात सापडली, तर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर निश्चितच होणार आहे. तथापि, भारतीय उद्योगांना ही चिनी मंदी नवनव्या संधींची दारे खुली करणारी ठरणार आहे.
आफ्रिकन देश नायजरमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तेथील जनता रस्त्यावर आली आहे. राष्ट्राध्यक्षांना पदावरुन हटवत येथील लष्कराने आपल्या हातात सत्ता घेतली आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने भारतीय नागरिकांसाठी काही सुचना जारी केल्या आहेत.
'माझी माती माझा देश' आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाके बंद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. यावरुनच उपमुख्यमंत्र्यांनी असच पत्र त्यांनी स्वत:ला 25 वर्ष लिहायला हवं होतं, असं म्हणत टोला लगावला आहे.
सध्या पाश्चिमात्य देशांकडून धार्मिक असहिष्णुतेच्या मुद्द्यावर भारताला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचे प्रयत्न पाहता आखाती अरब देशांकडून भारताशी साधला जाणारा संवाद आश्वासक आहे.
जसं नावात काय आहे म्हणतात, अगदी तसंच वय हा तर केवळ एक आकडा आहे, असंही वयोमानापरत्वे उल्लेखनीय कामगिरी करणार्यांच्या बाबतीत कौतुकाने म्हंटलं जातं. पण, क्षणभर विचार करा की, व्यक्ती एकच, पण त्याची दोन वयं. म्हणजे आजही असे बरेच लोकं देशविदेशात आढळतात की, त्यांना त्यांची जन्मतारीखच ठाऊक नसते. मग अशावेळी सरसकट नवीन वर्षातील पहिला दिवस हाच काय तो आपला जन्मदिन मानण्याची प्रथा ही जगभरात दिसते.
मुंबई : “युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत असल्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर म्हणाले. तसेच, जर्मनीने सुद्धा याबाबत उत्सुकता दर्शविली असून त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्र पूर्ण करू शकेल”, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सावरकरांविरोधात गरळ ओकून त्यांचा अपमान करत आहेत. नुकतेच एका पत्रकार परिषदेत बोलत असताना राहुल गांधींनी सावरकरांना लक्ष करत, 'मी सावरकर नाही, गांधी आहे. मी माफी मागणार नाही.' असे संतापजनक विधान केले. सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींवर देशभरातून टीकेची झोड उठली आहे. देशातील एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना शब्द सांभाळून वापरले पाहिजेत. पण राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे उचलली जीभ लावली टाळ्याला केलं. मुख्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील महान क्रांतिकारक असून
आपल्या प्राचीन आदर्श संस्कारांची गुढी प्रत्येकाने आपल्या घरी, दारी व समाजात मोठ्या प्रमाणात उभारावी. कारण, याच 16 संस्कारांच्या माध्यमाने व्यक्ती, कुटुंब, समाज, देश व विश्वाची नवनिर्मिती होणार आहे. संस्कारच नसतील, तर आपले जीवन हे सर्व काही मिळूनदेखील शून्य ठरणारे आहे. यासाठीच 16 संस्काररुपी प्रखर नंदादीपाच्या प्रकाशाने आपण आपले व इतरांचे अंतर्बाह्य जीवन उजळूया.
भारतीय स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात म्हणजे २०४७ सालापर्यंत भारताला ‘इस्लामिक राष्ट्र’ म्हणून स्थापित करण्याचे ‘पीएफआय’ या दहशतवादी संघटनेचे जिहादी मनसुबे नुकतेच एका दस्तावेजाच्या माध्यमातून तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. तेव्हा, या दस्तावेजातून उघडा पडलेला जिहादी कट, त्याची कार्यपद्धती आणि खबरदारीचे उपाय यांचा आढावा घेणारा हा लेख...
नरेंद्र मोदी कोण आहेत? दामोदरदास यांचे पुत्र आहेत, हिराबेन यांचे पुत्र आहेत, गुजरातमध्ये जन्मले म्हणून गुजराती आहेत, त्याच्या पलीकडे कोट्यवधी भारतीयांचे ते आत्मरूप आहेत. ही व्यक्ती नाही, मोदी ही शक्ती आहे. मोदी ही व्यक्ती नाही, मोदी ही अस्मिता आहे. मोदी ही व्यक्ती नाही, हजारो वर्षे दाबलेल्या भारताचा आत्मोद्गार आहेत. मोदी हे जागृत भारताचे प्रतिनिधित्व करतात.
'वेदांता’-‘फॉक्सकॉन’ हा प्रकल्प महाराष्ट्रामधून गुजरातला गेला, यावरून सध्या बराच वादंग उठला आहे. परंतु, या प्रकरणाची मीमांसा वजा आत्मपरीक्षणसुद्धा झाले पाहिजे. कारण, नुसते आरोप-प्रत्यारोप होणे, हे सुदृढ राजकीय मानसिकतेचे लक्षण नक्कीच नाही. मुळात एक लक्षात घेतले पाहिजे की, हा फक्त राजकीय विषय नसून तो देशाच्या किंवा राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडित विषय आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने बघणे, त्यात लक्ष घालणे आणि जर काही ’मिसिंग डॉट्स’ असतील, तर ते तातडीने ‘कनेक्ट’ करणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारतात वनस्पतींचे आभासी हर्बेरियम (माहिती सहित साठवलेले विविध वनस्पतींच्या पानांचे नमुने) या वर्षी जुलै महिन्यात लॉन्चलौंच करण्यात आले. या संग्रहात सुमारे एक लाख फोटोंचा डेटाबेस आहे. फक्त भारतातच नाही, तर जग भारत या हर्बेरियमचा अभ्यास होत आहे. आता पर्यंत ५५ देशातून तब्बल दोन लाख लोकांनी ही वेबसाईट वापरली आहे. भारतातील एकूण एक वनस्पतींच्या नमुन्यांच्या छायाचित्रासहित माहितीचा संग्रह या व्हर्च्युअल हर्बेरियम'द्वारे केला जात आहे.
'आझादी का अमृत महोत्सव'चा भाग म्हणून, केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने बुधवारी दि. ३ ऑगस्ट रोजी दि. ५ ते १५ ऑगस्ट पर्यंत देशभरातील सर्व पुरातत्व सर्वेक्षण संरक्षित स्मारके/स्थळांना मोफत प्रवेश देण्याची घोषणा केली आहे . पुरातत्व सर्वेक्षण द्वारे भारतभर ३,५००हून अधिक स्मारके संरक्षित आहेत.
चीन आणि जपान नंतर परकीय गंगाजळी (फॉरेक्स रिझर्व्ह)च्या बाबतीत तिसर्या क्रमांकावर असलेला देश आहे स्वित्झर्लंड. पण, स्विझर्लंडचे वैशिष्ट्य असे आहे, स्विस बँकेत ठेवलेला पैसा पूर्णपणे गोपनीय आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडचे व्यवहार कळणं कठीण आहे. ‘फॉरेक्स रिझर्व्ह’ कसे गुंतवले गेले, हे ‘ट्रॅक’ करणं सोप्पं नाही. तसेच जपानच्या ‘येन कॅरी ट्रेड’प्रमाणे ‘स्विस फ्रँक’चा ही ‘कॅरी ट्रेड’ आहे. पण त्याची व्याप्ती कमी आहे. ‘फॉरेक्स रिझर्व्ह’मध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे, तर पाचव्या क्रमांकावर रशिया आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या अग्निपथ भरती योजनेच्या निषेधार्थ बिहार आणि इतर लगतच्या राज्यांमध्ये तरुणांकडून सुरू असलेल्या हिंसाचार सुरू आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपमानास्पद शिवीगाळ करणाऱ्या विरोधकांचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे.ज्यांना भारतीय संरक्षण दलात सामील होऊन देशाची सेवा आणि संरक्षण करायचे आहे, असा दावा करणारे हे तरुण भारताच्या पंतप्रधानांविरुद्ध अपमानास्पद घोषणाबाजी करताना दिसतात.
“बाळासाहेबांनी मुस्लिमांचा द्वेष कधी केला नाही. दुसर्या धर्मांचा आदर करणे, ही आम्हाला महाराजांनी दिलेली शिकवण आहे. प्रत्येकाने आपला धर्म हा घरात ठेवावा. घराबाहेर पडताना देश हाच आपल्या प्रत्येकाचा धर्म आहे,” असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथील सभेत केले.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर वाळूत पुरलेले मोठ्या प्रमाणात मृतदेह पुन्हा आढळून आले आहेत. हे दृश्य कोरोनाच्या काळाची आठवण करून देणारे आहे. यादरम्यान काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांनी आणि प्रचाराने राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला कोरोनामुळे मृत्यू असे संबोधून बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.
भारताचा एकूण प्रजनन दर २.२ वरून २.० वर आला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात वकील अश्विनी उपाध्याय यांनी १९९५ सालच्या वक्फ कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मक वैधतैस आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने त्याविषयी केंद्र सरकारला नोटील बजावली आहे.
महिला दिनाच्या औचित्यावर भाजपचे माजी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी श्रेयसी निशंक हिला कॅप्टन पदावरून मेजर पदावर बढती मिळाली आहे. आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या संबंधीतील माहिती रमेश पोखरियाल यांनी दिली.
भारत देश मूर्तिपूजेमुळे गरीब राहिला आहे. मूर्तिपूजेमुळे ईश्वर कृपा करत नाही, मूर्तिपूजेला वैश्यावृत्ति मानली जाते, अशी गरळ ईसाई उपदेशक एमजी लाजारूस याने ओकली आहे. ट्विटरवर एक यूजर @@HlKodo याने हा व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात लाजारुस म्हणतो की, “बायबलनुसार, आराधना आणि वैश्यावृत्तिमुळे प्रभू नाराज होतात.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ही माहिती देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, परमबीर सिंग यांच्या देशातून पळून जाण्याबाबत मिळालेल्या माहितीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
देशभरात काँग्रेसची अवस्था सध्या ‘गतं न शोच्यम्’ अशीच झालेली दिसते. अर्थात, एखाद्या गोष्टीचे महत्त्व संपल्यानंतर त्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी सारे व्यर्थच! त्याचप्रकारे नेतृत्वहीन काँग्रेसने पक्षांतर्गत विरोधी सूर झुगारून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना कितीही जवळ केले तरी काँग्रेसचा ‘हात’ मात्र रिताच राहील.
देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.५२ टक्के कायम असून तो मार्च २o२o पासून आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहे. देशात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण ३ कोटी, १४ लाख, ८५ हजार, ९२३, तर गेल्या २४ तासांत ३७ हजार,१६९ रुग्ण ‘कोविड-१९’ संसर्गातून बरे झाले आहेत. देशात गेल्या २४ तासांत ३५ हजार, १७८ नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग ५२ दिवस ५o हजारांपेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या गेल्या १४८ दिवसांतली सर्वात कमी म्हणजे ३ लाख, ६७ हजार, ४१५ इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या १.
गेल्या २४ तासांत ३९,१५७ रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) कोविडमधून बरे झालेल्यांची संख्या आता ३,१५,२५,०८० झाली आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर सध्या ९७.५३% म्हणजे मार्च २०२० पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर आहेगेले सलग त्रेपन्न दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या ५०,००० पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.