केंद्र सरकारने सुरू केलेला नक्षलवादाच्या विरोधातील लढ्याला आता यश मिळत असल्याचे बघायला मिळते आहे. २१ जानेवारी रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्यामध्ये झालेल्या चकमकीच एकूण १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. नक्षलवादी गटाचा म्होरक्या चलापथी याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दल यशस्वी झाले आहे. चलापथी हा श्रीकालुलम-कोरापुट विभागातील दहशतवादी गटाचा नेता होता. चलापथी याच्यावर पोलिसांनी १ कोटी रूपयांचा इनाम जाहीर केला होता.
Read More
केंद्र सरकारने नक्षलवादाच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईला वेग आला असून, १६ जानेवारी रोजी सुरक्षा दलाने बिजापूर येथे १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. बिजापूरच्या दक्षिण भागातील जंगलामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार माओवादी गटाचे अनेक म्होरके या परिसरात तैनात असल्याची माहिती त्यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. गुरूवारी सकाळी ९ वाजता सुरक्षा दलाने या कारवाईला सुरूवात केली.
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात सोमवार दिनांक ६ जानेवारीच्या दुपारी नक्षलवाद्यांचा एका गटाने पोलिसांच्या गाडीला लक्ष्य केलं. दांतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर इथली नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाई पूर्ण करून परतत असताना बेदरे कुटरू रस्त्यावर पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य केलं गेलं. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आयईडी स्फोटकांचा वापर करत हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे.
केंद्र सरकारने सत्तेत आल्यावर नक्षलवादाच्या विरोधात आघाडी उघडत समाजकंटकांना जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशातच आता छत्तीसगडच्या बस्तर येथील नारायणपूर आणि दंतेवाडा भागातील सीमांजवळ ४ जानेवारीच्या रात्री सुरक्षा रक्षकांना ४ नक्षलवाद्यांना संपवण्यात यश आले आहे. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका सुरक्षा अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
(Chhattisgarh High Court ) छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्यायमूर्ती संजय जयस्वाल यांच्या खंडपीठाने घटस्फोटाच्या खटल्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, जर पत्नीने पतीच्या धार्मिक श्रद्धांची खिल्ली उडवली तर पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार पतीला आहे. तसेच निकाल देताना पती-पत्नीच्या नातेसंबंधावर धार्मिक ग्रंथ, रामायण आणि महाभारतात नमूद केलेल्या समजुतींचा हवाला दिला आहे. या आधारे न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला असून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. कौटुंबिक न्याय
छत्तीसगड राज्यातील विजापूर येथील वंदे भारत (Vande Bharat) येथे दगडफेक करण्यात आली होती. यामुळे ३ डब्यांच्या काचा फोडण्यात आल्याची धक्कादायक बाबा आढळून आली आहे. याप्रकरणात सुरू असणाऱ्या वंदे भारत रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात महासमुंदमध्ये वंदे भारत ट्रेनच्या ट्रायल सुरू होती. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणात काँग्रेस नेत्याच्या एका निकटवर्तीयाचा समावेश आहे.
छत्तीसगढ हे नक्षलवादासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य आहे. नुकत्याच छत्तीसगढच्या कांकेर येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे २ जवान शहीद झाले असून ३ जखमी झाले आहेत. बीएसएफचे जवान टेहळणी साठी निघाले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. सुरुक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात अद्याप चकमक सुरु आहे. मुख्तियार सिंह आणि लोकेंद्र असे शहीद झालेल्या जवानांचे नाव आहे.
दंतेवाडा येथे चोलनर गावात नक्षलवाद्यांनी पोलीस दलाच्या वाहनावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ६ जवान शहीद झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर १ जवान जखमी झाला आहे, जखमी जवानांना उपचारासाठी त्वरित राजधानी रायपुर येथे पाठविण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी उद्योजपतींचे कर्ज माफ केले, मात्र ते छत्तीसगढ येथील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास तयार का नाहीत ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा मी हा प्रश्न विचारुन देखील त्यांनी माझ्या या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. असे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. आज छत्तीसगढ येथील सुरगुजा येथे एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. २०१९ मध्ये आम्ही सत्तेत आल्यावर छत्तीसगढ येथील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.