२०२४ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली. अवघ्या काही दिवसांनी २०२४ हे वर्ष संपेल आणि २०२५ हे वर्ष नव्याने मनोरंजनासाठी सज्ज होईल. जाणून घेऊयात २०२४ या वर्षात कोणत्या टॉप १० चित्रपटांनी तुफान कमाईसह प्रेक्षकांची मने जिंकली. ‘सॅकलिंक’ने २०२४ वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमांची यादी दिली आहे. यात हिंदीतील ४ तर आणि ६ दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे.
Read More
अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट 'पुष्पा २' सध्या चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: पैशांचा पाऊस पाडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत ‘बाहुबली २’, ‘आरआरआर’, ‘जवान’, ‘पठाण’ अशा अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांमध्ये देशभरात ६०० कोटींचा आकडा पार केला असून जगभरात ९०० कोटींचा पल्ला गाठला आहे.
सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ : द रुल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अनेक चित्रपटांच्या कमाईचे त्याने रेकॉर्ड मोॉले असून प्रदर्शनानांतरच्या पहिल्या सोमवारी कलेक्शनच्या परीक्षेत पुष्पा २ पास झाला आहे की फेल हे जाणून घ्यायला हवं. ५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट देशभरात तेलुगु भाषेसह हिंदी, तमिळ,कन्नडा, मल्याळम आणि बंगालीत प्रदर्शित झाला. पुष्पा २ या चित्रपटाने जगभरात पाच दिवसांत ९०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरहिट चित्रपट पुष्पा २ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनापुर्वीच रेकॉर्ड मोडला होता. आणि आता ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाल्यानंतर 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांमध्येच ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २ या हॉर-कॉमेडी चित्रपटाची जादू प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतरही कायम आहे. दररोज बॉक्स ऑफिसवर स्त्री २ चित्रपट नवे इतिहास रचताना दिसत आहे. स्त्री २ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून चित्रपटाने जगभरातही भरपूर कमाई केली आहे. 'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ४३ दिवस झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर कमाईची गाडी थांबतच नाही आहे. विशेष म्हणजे स्त्री २ हा चित्रपट केवळ या वर्षातीलच सर्वात मोठा हिट ठरला नसून हिंदी चित्रपट
अमर कौशिक दिग्दर्शित बहुचर्चित स्त्री २ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापुर्वी देखील तिकीट बूकिंगच्या बाबतीत इतिहास रचला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘स्त्री’ २०१८ मध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी ‘स्त्री २’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आला आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित झाला. कोकणातील जुन्या परंपरेवर आधारित या चित्रपटाचे कथानक असून हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई केली असून २० कोटींचा टप्पा पार केला आहे.
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘मुंज्या’च्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता पहिल्या दिवशी हा चित्रपट १-२ कोटी कमावेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
स्त्री प्रधान चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे खेचून घेतले आहे. झिम्मा, बाईपण भारी देवा आणि आता अलीकडे प्रदर्शित झालेल्या नाच गं घुमा या चित्रपटानेही स्त्री वर्ग पुन्हा एकदा चित्रपटगृहाकडे आणला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) या चित्रपटात मोलकरीण आणि वर्किंग वुमन यांच्यातील नातेसंबंध, त्यांच्या अडचणींवर भाष्य करण्यात आले आहे. ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) चित्रपट बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई करताना दिसत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ८.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उलचून धरले आहे. दरम्यान, या चित्रपटाने प्रदर्शनापासून आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उलचून धरले आहे. अनेक मराठी कलाकारांनी देखील आवर्जून प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा म्हणून आग्रह केले आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटांनी सध्या प्रेक्षकांना भलतीच भूरळ घातली आहे. २०२४ मधील प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस आलेला चित्रपट म्हणजे ‘हनुमान’ (Hanuman). अभिनेता तेजा सज्जा (Teja Sajja) याची प्रमुख भूमिका असलेला हा 'हनुमान' (Hanuman) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शिवाय जिओ आणि झी५ या ओटीटी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असूनही तिथेही या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहेत. आता आणखी एका ओटीटी वाहिनीवर हनुमान चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांनी पहिल्यांदाच एकत्रित काम केलेल्या 'शैतान' (Shaitaan) चित्रपटाला चांगलेच यश मिळृताना दिसत आहे. ८ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा अधिक कमाई केली आहे. इतकेच नव्हे तर, या (Shaitaan) चित्रपटाची प्रदर्शनापुर्वी देखील अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १.७६ लाखांहून अधिक तिकिटे विकून ४.१४ कोटी रुपयांची कमाई केली होती.
आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल ३७० ( Article 370) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे वास्तव या चित्रपटात तंतोतंत दाखवण्यात आले आहे. जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० चा स्वातंत्र्यापासूनचा ७५ वर्षांचा इतिहास अतिशय उत्कृष्टपणे मोठ्या पडद्यावर मांडण्यात संपुर्ण टीमला यश आले आहे. नुकतीच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याचे आकडे समोर आले आहेत. आनंदाची बाब म्हणजे ६ दिवसांत या चित्रपटा
जम्मू-काश्मिरमधून ‘कलम३७० हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सर्व सत्य घटनांची बांधणी आर्टिकल ३७० या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी मांडली आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी तर या चित्रपटाचे कौतुक केलेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विशेष कौतुक केले होते. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने द कश्मिर फाईल्स चित्रपटाचा देखील रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
यंदाचे वर्ष मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी फार चांगले गेले. प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोटींच्या घरात कमाई केली. नुकताच शाहरुख खान याचा २०२३ मधील शेवटचा चित्रपट डंकी आणि प्रभासचा सलार चित्रपट प्रदर्शित झाला. पण अनपेक्षितपणे प्रभासच्या सलारने शाहरुखच्या डंकीला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली.
हिंदी चित्रपटांचा यंदाचे वर्ष कमाईच्या बाबतीत फारच आनंदित गेले असे म्हणण्यास हरकत नाही. २०२३ या वर्षाची सुरुवात शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने दमदार केली. बॉक्स ऑफिसवर १००० कोटींच्या घरात या चित्रपटाने कमाई केली. त्यानंतर वर्षाच्या मध्यांतरात ‘जवान’ चित्रपटाने बाजी मारली. परंतु, वर्षाचा शेवट जरी शाहरुखच्याच ‘डंकी’ने झाली असली तर या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कमाई केली आहे. २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला डंकी चित्रपट पहिल्याच दिवशी ‘अॅनिमल’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ला मागे टाकू शकला नाही.
चित्रपटांचा आशय-विषय प्रेक्षकांच्या पसंतीस आला तर नक्कीच त्या चित्रपटांना गर्दी होतेच. १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाचा विषय हा प्रत्येक देशप्रेमीसाठी अभिमानाने छाती फुलवणाराच होता. देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाने नुकतेच १०० कोटी क्लबमध्ये आपले नाव नोंदवले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु न शकणाऱ्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाने मात्र तिसऱ्या आठवड्यात चांगलीच झेप घेतली असून आता १००
विकी कौशल आणि रणबीर कपूर यांचे सुपरिहट चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘सॅम बहादुर’ आणि ‘अॅनिमल’ या दोन्ही चित्रपटांचा आमना सामना बॉक्स ऑफिसवर झाला असून यात ‘अॅनिमल’ चित्रपट वरचढ ठरला आहे. दरम्यान, दोन्ही चित्रपटांनी पहिल्याच दिवशी कोटींच्या घरात कमाई केली असली तरी ‘अॅनिमल’ चित्रपटाने ‘सॅम बहादुर’ चित्रपटाला भरपूर मागे टाकले आहे.
प्रवासाचा मनमुराद आनंद घेणाऱ्या ७ अनोळखी महिला, एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी होतात आणि त्यांचा जीवनप्रवास सुरु होतो, हे दाखवणारा चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’. २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात तर घर केले आहेच पण बॉक्स ऑफिसवर देखील उत्कृष्ट कमाई केली आहे या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. ‘झिम्मा २’ ने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.
सिंगल स्क्रीन व खासकरून बॉलिवूडच्या व्यवसाय मंदीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.कोरोना काळापासूनच चित्रपट विश्वाला मोठा आर्थिक फटका बसला होता.परंतु आता अचानक चित्र बदलले आहे.आर्थिक वर्ष २०२३ च्या तिमाहीतच मागील वर्षीच्या एकूण आर्थिक उत्पन्नाच्या सुमारे ७५ टक्के गल्ला जमवला आहे.यशस्वी चित्रपटांबरोबर अनेक चित्रपटांनी तुलनात्मक दृष्ट्या चांगला नफा कमावला आहे.'मिंट' ने याविषयी अहवाल प्रसिद्ध केला आहे.
कोरोना काळानंतर मनोरंजनसृष्टीही आपली मरगळ झटकून पुन्हा एकदा टवटवीत झाली. विविध आशय, विषय, नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकांची मांदियाळी प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिका, चित्रपट, नाटक, वेब मालिका अशा विविध माध्यमांतून मनोरंजनाचा प्रवाह जोरात आहे. मात्र, कोरोनाच्या आधीपासूनच हिंदी चित्रपटसृष्टीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असल्याचे काही अंशी दिसून आले.
गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिसवर बॅकफुटला गेलेल्या हिंदी चित्रपटांना पुन्हा उभारी आली आहे असे चित्र दिसून येत आहे. नुकताच गदर २ या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ४०० कोटींच्या पुढे कमाई नाव कोरले. याशिवाय ओएमजी २ या चित्रपटानेही अनेक चढ उतारांचा सामना करत चांगली कमाई केली आहे. यानंतर आता २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल २ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’चा हा सीक्वेल आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाच्या या विनोदी चित्रपटाने प्रेक
अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या ‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱा चित्रपट म्हणून मान मिळवला आहे. 'गदर २' या चित्रपटाने पाचव्या दिवशी ५५.४० कोटींची कमाई केली आहे.
मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतर भाषिक चित्रपटांसोबत भरघोस कमाई करताना दिसत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटाने तर अनेक काळानंतर मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केली आहे. मात्र आता या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख याच्या 'वेड' या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. सोबतच कमाईच्या बाबतीत हा चित्रपट चक्क मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणारा सैराट चित्रपटानंतर दुसरा चित्रपट ठरला आहे.
मनोरंजनाचा पाया घातला गेला तो मराठी माणसाकडूनच. दादासाहेब फाळके यांनी चित्रपटांची ओळख समाजाला करुन दिली. आणि त्यानंतर मराठीसह इतर भाषांमधील चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित होऊ लागले. गेल्या काही वर्षांपासूनही मराठी चित्रपटसृष्टीला चांगला काळ आला आहे असेच दिसून येत आहे. मराठी चित्रपटांची आशय निर्मिती ही खरचं पार वाखाण्याजोगी असते यात वादच नाही. विनोदी, सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर परखडपणे भाष्य करणारे अनेक मराठी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. अशातच २०१६ पासून तिकीट बारीवर आणि चित्र
“मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये खरे यश हे मायबाप प्रेक्षकच मिळवून देतात”, अशी आनंदी प्रतिक्रिया ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. १६ जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेल्य़ा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ६.४५ कोटींची कमाई केली आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत किंवा प्रेक्षक चित्रपटाकडे पाठ फिरवतात या परिस्थितीला या चित्रपटाने सडेतोड उत्तर दिले आहे असेच म्हणावे लागेल.
Pathan movie review 'पठाण' पाहण्याचा काल दुर्दैवी योग आला. चित्रपट पाहिल्यावर आम्ही तिघेही अगदी भिन्न विचारसरणी असणाऱ्या मित्रांची प्रतिक्रिया एकच होती- "ये क्या था भाई ,मतलब कुछ भी....." "पठाण तगडा चित्रपट आहे", "बॉलिवूडला तारणारा आहे ,जबरदस्त मास चित्रपट आहे", अशा अनेक थोर लोकांच्या पोस्टी इथं वाचल्या होत्या.
बॉक्स ऑफिसवर आमीरचा लाल सिंह चड्ढा सपाटून आपटलाय. एकीकडे हा चित्रपट बॉयकॉट करा अशी जोरदार मोहिम सुरु असताना दुसरीकडे लाल सिंह चड्ढा कितीही वाईट असला तरी आम्ही तो पाहणारच असे म्हणत काही मंडळी आमीरच्या या चित्रपटाला आपले समर्थन दर्शवत होते. लाल सिंह चड्ढाला बॉयकॉटचा फटका बसला हे जरी खरे असले तरी त्या चित्रपटात अनेक तांत्रिक चुका होत्या.
आमिर खानसाठी अक्षय कुमारची माघार
बॉक्स ऑफीसवर 'तानाजी- द अनसंग वॉरिअर' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली असताना आता गुगल ट्रेंडमध्येही तानाजी सर्वात पुढे असल्याचे निष्पन्न झाले आहे. 'तानाजी' हा 'दीपिका' आणि 'छपाक' या दोन्ही शब्दांपेक्षा जास्त सर्च केल्याचे गुगल आकडेवारी सांगते.
पहिल्याच दिवशी सुमारे १८ कोटींचा गल्ला
हॉलिवूडपटांची सर्वात उत्कंठा वाढवणारी गोष्ट म्हणजे त्यांचे प्रिक्वेल. प्रिक्वेल म्हणजे चित्रपटातील गूढ अशा उकल न होणाऱ्या पात्रांची आणि घटनांच्या आधीचीही पार्श्वभूमी उलगडून दाखवणारे चित्रपट. ज्याला मराठीमध्ये पुर्वरंग असं म्हणलं जातं. तसा हा जोकरचा पुर्वरंग आहे.
'मिशन मंगल' ने आत्तापर्यंत २००.१६ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'छिछोर' आणि सुजीथ दिग्दर्शित 'साहो' हे दोन्ही चित्रपट अनुक्रमे ६ सप्टेंबर आणि २९ ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित झाले. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट सरशी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
अक्षय कुमारच्या मिशन मंगल हा चित्रपट बॉक्स ऑफिसावर जोरदार कमाई करत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'जबरिया जोडी' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. तत्पूर्वी काल सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने चित्रपटामध्ये ९ बदल सुचवले.
'अर्जुन पटियाला' आणि 'जजमेंटल है क्या' हे दोन्ही चित्रपट काल देशभर प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांची पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिसवरील कमाई तितकीशी वाखाणण्याजोगी झाली नाही.
शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी यांच्या 'कबीर सिंह' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी इतिहास घडवला. आत्तापर्यंत आपण २०० कोटींची कमाई केलेले भारत,दबंग, उरी असे अनेक चित्रपट पाहिले मात्र 'कबीर सिंह' ने या सगळ्यांना मागे सारत तब्बल २३५ कोटींची कमाई केली.
कबीर सिंग या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धूम उडवली. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आज याविषयी सोशल मीडियावरून प्रेक्षकांना माहिती दिली. कबीर सिंग या चित्रपटाच्या प्रदर्शनाला साधारण २ आठवडे पूर्ण झाले असून चित्रपटाने आत्तापर्यंत १९० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा आणि स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला श्राबणी देवधर दिग्दर्शित'मोगरा फुलला' हा चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. तीन दिवसांत या चित्रपटाने एकुण १ कोटी ४५ लाखांचा गल्ला जमवला होता.
पहिल्या काही दिवसातच बॉक्स ऑफिसवर आपली जादू पसरवणाऱ्या अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' या चित्रपटाने आज १३ व्या दिवसानंतर २०० कोटींची कमाई करून आणखी एक विक्रम रचला. ५ जूनला ईदीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
'भारत' हा चित्रपट ५ जून ला म्हणजेच ईदीच्या दिवशी प्रदर्शित झाला. त्यानंतर पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाने ९५ कोटींचा आकडा पार केला. लवकरच हा चित्रपट २०० कोटींची कमाई करून एक नवा विक्रम रुचेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी चित्रपटाने ४२.३ कोटींची कामे करत बॉक्स ऑफिसवर धूम माजवली आहे.
हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ जिनीची भूमिका साकारत असलेल्या अल्लादिन चित्रपटाने बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीत वर्चस्व मिळवले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इंडियाज मोस्ट वॉन्टेड आणि पीएम मोदी या चित्रपटांना मागे सारत 'अल्लादिन' ने सरशी केली आहे.
हॉलीवूडमधील मार्व्हल स्टुडिओजची एक जगप्रसिद्ध असलेली सिरीज म्हणजे अव्हेंजर्स. भारतात पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत ५० कोटींपेक्षाही जास्त गल्ला जमवला आहे.
महावीर जयंतीच्या शुभमूर्तवार प्रदर्शित झालेल्या 'कलंक' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. कलंकने पहिल्याच दिवशी साधारण २१ कोटींचे संकलन केले.