नौदलाच्या ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे कोचीन येथे जलावतरण झाले आहे. नौदल दिनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मालवण या युद्धनौकेचे जलावतरण झाले आहे. ‘आयएनएस मालवण’ अशी ओळख असणारी ही पाणबुडीविरोधी युद्धपद्धतीची युद्धनौका असेल.
Read More
भारतीय नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर मालवणात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ४ हजार पोलीस, ४०० पोलीस अधिकाऱ्यांसह ५०० होमगार्ड तैनात आहेत.
नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार तर नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा असणार, अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारतीय नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
४ डिसेंबर २०२३ हा दिवस भारतीय नौदलाच्या, महाराष्ट्राच्या, कोेकण किनारपट्टीच्या इतिहासातला एक संस्मरणीय दिवस ठरणार आहे. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण शहराला भेट देऊन, छत्रपती शिवरायांच्या ४३ फूट उंच ब्राँझ पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. शिवाय ते सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन, भारतीय नौदलाचा ’आरमार दिन’ तिथे साजरा करणार आहेत.
आज भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.