"देशातील कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सीएए कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरु होईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्याला आश्वस्त केले असल्याचे पश्चिम बंगालचे विरोधीपक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी जाहीर केले
Read More
संसदेत एनआरसी म्हणजेच आसाम येथील "नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन" यावरुन गदारोळ झाला आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे वातावरण आणखीनच पेटले. गदारोळामुळे आपले वक्तव्य पूर्ण न करु शकल्याने अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त केले आहे. एनआरसीमध्ये ज्यांची नावे नाहीत ते घुसखोर आहेत, असे वक्तव्य आज अमित शहा यांनी केले आहे. असा एकही भारतीय नाही ज्यांचे नाव एनआरसी मध्ये नाही. त्यामुळे या प्रश्नाला चुकीचे वळण देण्यात येत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.