(Sanjay Raut) 'वेगळा गट म्हणून राहिल्यास अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री होता येणार नाही', असे विधान उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेसंदर्भातील वक्तव्याबाबत मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Read More
मलाही अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावे वाटते, पण कुठे जतमंय? अशी मिश्कील टिपण्णी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार, ३ मे रोजी केली. मुंबईत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ या कार्यक्रमात ते बोलत होते.
जळगावमधील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांनी शनिवार, दि. ३ मे रोजी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या असंख्य पदाधिकार्यांनी के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला.
जातनिहाय जनगणनेचा निर्णय समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणारा ठरेल. तसेच भविष्यात जातीव्यवस्था संपूर्णतः संपुष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. केंद्र सरकारने आगामी जनगणनेमध्येच जातनिहाय निर्णय घेतला आहे.
माळशेज घाटातील स्कायवॉकचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या ठिकाणचे पर्यटन दृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा. सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी एक महिन्यात एकत्रित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिले.
सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार, २५ एप्रिल रोजी दिली.
राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिल
शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेलेच आहेत, असा दावा उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना रोहित पवारांनी एक सूचक ट्विट केले होते. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
सध्या ज्यांना उद्योग नाहीत ते भाषेवरून वाद घालतात आणि त्यातच ते वेळ घालतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आले. परंतू, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवला आहे. यावर अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पूर्ण पगार मिळाला नसल्याने एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान, याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे उत्पन्न वाढवण्याबाबत प्लॅन सांगितला. शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बनेश्वरच्या रस्त्याचे काम करण्याच्या मागणीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण केले होते. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बनेश्वर रस्त्याच्या कामासाठी योग्य तो निधी देणार असून माझ्या बहिणीला पुन्हा उपोषण करावे लागणार नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यभरातील अनेक महिलांनी लाभ घेतला. परंतू, लाडक्या बहिणींना २१०० रुपये लाभ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे.
fake cheese case बनावट पनीर प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत काय घडलं
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. परंतू, यावरुन संजय राऊतांना पोटशूळ उठल्याचे दिसले. त्यामुळेच त्यांचे उत्तम चालले असते, असे वक्तव्य राऊतांनी केले.
( Chief Minister Majhi Ladki Bahin scheme will be amended ajit pawar ) महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांत बदल करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी दिले. “आर्थिक स्थिती चांगली असलेल्या काहीजणींनी या योजनेचा लाभ घेतला. आम्ही कुणाचे पैसे परत घेणार नाही. मात्र यामध्ये दुरुस्ती करावी लागेल,” असे पवार म्हणाले.
(Bhaskarrao Khatgaonkar Patil) माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर (Meenal Khatgaonkar)काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दोघांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या २३ मार्च रोजी नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत.
लाडकी बहिण योजना बंद करणार नसून त्यात काही दुरुस्ती करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली. सोमवार, १७ मार्च रोजी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
( Special priority to communication facilities in the state Deputy Chief Minister Ajit Pawar ) रस्त्यांचे जाळे वाढले, तर कंपन्यांच्या उत्पादकतेत वाढ होते, शेतकऱ्यांचा वाहतुकीवरचा खर्च कमी होतो, इंधनावरील राज्याच्या, देशाच्या परकीय चलनात बचत होते आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होते. यासाठी अर्थसंकल्पात रस्ते बांधणीसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी दिली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शुक्रवार, १४ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. मात्र, यावर विजय वडेट्टीवार यांनी वेगळेच मत व्यक्त केले. नाना पटोलेंनी घाई केली असल्याचे ते म्हणाले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात त्याचे चांगलेच पडसाद उमटले. मात्र, आता नाना पटोलेंनी आपल्या या वक्तव्यावरून युटर्न घेतला आहे. मी हा विषय गमतीत घेतला असल्याचे ते म्हणाले आहे.
Nana Patole उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून चर्चाही झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकीय परिस्थितीत उलथापालथ होई
महाराष्ट्रात भेसळयुक्त पनीर विक्रीवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असून अशा पनीर विक्रीला आळा बसणार आहे. बुधवार, १२ मार्च रोजी आमदार विक्रम पाचपूते यांनी लक्षवेधीमार्फत विधानसभेत हा प्रश्न विचारला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कारवाईचे आश्वासन दिले.
( Navi Mumbai will be of international standard city Ganesh Naik ) राज्याचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राची विकासाची गती वाढविणारा आहे. अर्थसंकल्पात ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग आणि नवी मुंबई व खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र निर्माण करण्याच्या घोषणेमुळे नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली.
(NOC mandatory for Liquor Shops) राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. महापालिका वार्डमध्ये मद्यविक्रीचे दुकान बंद करायचे असेल नियमानुसार आलेल्या प्रस्तावावर झालेल्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने
( state budget ajit pawar ) उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे आज सोमवार, दि. 10 मार्च रोजी राज्याचा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे.
Maharashtra Budget 2025 आपल्या सर्वांचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षि शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी वंदन करतो. शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर यांच्या हौतात्म्याचे हे ३५० वे वर्ष आहे. त्यांनाही मी अभिवादन करतो.
Maharashtra Budget 2025 राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. “सर्वांसाठी घरे” हे उद्दीष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यातील बेघरांसाठी कायमचा पक्का निवारा उपलब्ध यावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याने राज्य सरकारने हे महत्वकांशी धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Budget 2025 राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी शंभर दिवसांचा कृती आराखड्याबद्दल माहिती दिली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला. या कृती आराखड्यात संकेतस्थळांचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमामुळे प्रशासन क
राज्याचा अर्थसंकल्प २०२५ नुकताच पार पडला आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुतीच्या सत्तेने जनतेला दिलेले हे एक मोठे गिफ्ट आहे. महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांना सर्वाधिक राज्य सरकारने विकासाठी आर्थिक लाभ दिला आहे तो पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
Maharashtra Budget 2025 नुकताच पार पडला आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुतीच्या सत्तेने जनतेला दिलेले हे एक मोठे गिफ्ट आहे. महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांना सर्वाधिक राज्य सरकारने विकासाठी आर्थिक लाभ दिला आहे तो पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
Maharashtra Budget 2025 जगभरात आर्थिक तणावाची स्थिती असताना, महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटू न देता, अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. १० मार्च रोजी ७ लाख २० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. शेती, शेतीपुरक क्षेत्रे, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास आदी क्षेत्रांसाठी भरीव तरतूद त्यात करण्यात आली आहे. त्यामुळे ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प, असे त्याचे वर्ण करावे लागेल.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्च रोजी सुरू झाले आहे. दरम्यान, अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात राज्यपालांचे अभिभाषण पार पडले. त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील घरे, कृषी पंपांना वीजेच्या दरात सवलत व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.
महाराष्ट्र सरकारने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, महिला आणि मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरण करण्याचा विचार सुरू केला आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या लसीकरणासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची भूमिका जाहीर केली असून, या निर्णयामुळे राज्यातील महिला आरोग्याच्या संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
: " पु.ल. देशपांडे यांचा विनोद अतिशय चपखल होता. त्यांनी मर्मावर बोट ठेवून, कुणालाही न दुखावता लिखाण केले. पु.ल. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे हॅपीनेस इंडेक्स होते " असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृत
(Maharashtra Budget Session 2025) विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्चपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी ६ हजार ४८६ कोटींच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर केल्या.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्चपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी ६ हजार ४८६ कोटींच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर केल्या.
बालकांचे आरोग्य एखाद्या कुटुंबापुरते मर्यादित नसून ते समाज आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याकरीता महत्वाचे असते. त्यामुळे राज्यातील बालके सदृढ असली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील " असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिम्मित आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
बहुप्रतिक्षीत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाच्या उद्घाटन समारंभ दि. २ मार्च रोजी पार पडणार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. बदलत्या काळासोबत, कलेचे वेगवेगळे प्रवाह आत्मसात करून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी अद्यावत सोयी सुविधांसहीत सज्ज झाली आहे.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून यात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
बीड हत्या प्रकरणानंतर सर्वत्र मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रविवार, १६ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी संवाद साधला.
केंद्रीय अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी, प्रत्येक समाजघटकाला बळ मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
कुणीही कुणाला खंडणी मागितल्याचे कानावर आल्यास त्याच्यावर मकोका लावण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका अधिकृत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गुरुवार, ३० जानेवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी दिले.
बीड हत्या प्रकरणात तपासात कुणाचेही नाव आढळल्यास कारवाई होणार. पण कुणाचा संबंध नसल्यास कारवाई करण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मंगळवार, २८ जानेवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री.अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. परिवहन प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची माहिती दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र, यामुळे खासदार संजय राऊतांना पोटशुळ उठला असल्याचे बोलले जात आहे.