ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव तर मी FB म्हणजे फेवरेट ब्रदर आहे, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सांगोला येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण व लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
Read More
(Akashwani Amdar Nivas) मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ६१ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेश्वर, गंगोबा आणि श्री स्वयंभू मंदिर देवराईमधून गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (sacred groves in kolhapur). देवराईमधील अधिवासामुळे या प्रजातीचे नामकरण 'डाईक्रॅक्स देवराईवासी', असे करण्यात आले आहे (sacred groves in kolhapur). नव्याने शोध लागलेल्या गोगलगायीच्या या प्रजातीमुळे देवरायांनी जपलेली जैवविविधता अधोरेखित झाली आहे. (sacred groves in kolhapur)
(Jaykumar Gore) माझ्या बाबतीतही बीड सारखं घडविण्याचा कट होता. पण मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे मी यातून वाचू शकलो, असे धक्कादायक विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
(Hearing on Prashant Koratkar's Bail Application) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात कोल्हापूर सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात झाली आहे. प्रशांत कोरटकरला व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने मागील सुनावणीत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती. यानंतर आज प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पा
वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात आपले सगळ्यांचे लाडके लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार वपु. ‘पार्टनर’, ‘वपुर्झा’, ‘ही वाट एकटीची’, ‘ठिकरी’ यांसारख्या कित्येक पुस्तकांतून वपुंच्या विचारधनाचे गारुढ आजही कायम आहे. पण, लेखक, कथाकथनकार म्हणून सर्वज्ञात असलेले वपु, वडील म्हणून कसे होते? आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुकन्या स्वाती चांदोरकर यांनी वपुंच्या अर्थात त्यांच्या बापूंच्या आठवणींच्या शिदोरीतील उलगडलेले हे एक पान...
(Prashant Koratkar News) प्राथमिक चौकशीनंतर आज दि. २५ मार्च रोजी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. जुनागड पोलीस ठाण्याबाहेर शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली, परिस्थिती गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना पोलीस ठाण्याच्या समोरच्या बाजूस बंदोबस्त लावून मागील दाराने कोरटकरला बाहेर काढून कोल्हापूर न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि त्यांचे वकील असीम सरोदे हे आधीच कोल्हापूर न्यायालयात हजर झाले होते.
(Prashant Koratkar Hearing) शिवछत्रपती अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकरला आज दि. २५ मार्च रोजी सुनावणासाठी कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि त्यांचे वकील असीम सरोदे हे कोल्हापूर न्यायालयात हजर झाले आहेत. या प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली असून आरोपीच्या वकीलांनी युक्तिवाद करताना कोरटकरच्या अटकेची गरज नसल्याचे म्हटले आहे.
कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ची कामे हाती घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने हालचाली सुरू केल्या आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीएकडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे. त्यामुळे चालू वर्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बिग बॉस मराठी सिझन ५ च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाण ने आपलं नाव कोरलं आहे. सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आणि आता पुन्हा एकदा तो आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण लवकरच "झापुक झुपूक" ह्या त्याच्या पहिल्या मराठी सिनेमात दिसणार आहे आणि आज जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" चा धमाकेदार टिझर प्रदर्शित झालाय.
केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'पीएम गतिशक्ती' अंतर्गत 'नेटवर्क प्लॅनिंग गटा'च्या '89व्या' बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून या निर्णयासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले.
Dr. Ishwar Nandapure हे समरसतेसाठी काम करणारे अत्यंत संवेदनशील आणि साहित्यिक विचारवंत. महाराष्ट्रातील साहित्य चळवळीचा वारसा समरसताशील बनवण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या ‘माय अनटोल्ड स्टोरी’ (स्वकथन) ग्रंथाचे प्रकाशन दि. 15 मार्च रोजी नागपूर येथे संपन्न झाले. या सोहळ्यामध्ये अनेक मान्यवरांनी ‘माय अनटोल्ड स्टेारी’ या पुस्तकाबद्दल भाष्य केले. यानिमित्ताने या पुस्तकाचा परिचय करून देणारा हा लेख...
स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक त्यांच्या बलिदानस्थळी मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे उभारण्यात येणार असून, सदर स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी केली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५ -२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
विधानसभा निवडणूकीनंतर उबाठा गटाला लागलेली गळती अजूनही कायम असून आता कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराने त्यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला.
(Jalna ) राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. एकीकडे कॅापीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॅापीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तर दुसरीकडे दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर येथे एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरु झाल्यावर अवघ्या पंधरा मिनिटांत या पेपरच्या प्रती झेरॅाक्स सेंटरवर मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राजन साळवी यांच्यानंतर आता विदर्भातील उबाठा गटाच्या बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला असून उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
विरोधकांना चितपट करत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाची कुस्ती जिंकले, असे प्रतिपादन भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ७ जानेवारीला एका नवीन गाण्याची घोषणा केली होती. ज्यासाठी त्यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटलेले, ‘मी पुन्हा येत आहे.. आपली संस्कृती आणि धरोहर तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी.. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमीत्ताने एक गीत घेऊन.. संपर्कात रहा’. या पोस्टनंतर ८ जानेवारीला ‘मारो देव बापू सेवालाल’ हे गाणे रिलीज करण्यात आले.
Indian temples ‘कुतूहल’ ही एक अशी गोष्ट आहे, जी एखाद्या व्यक्तीला सतत नवीन काहीतरी विचार करायला प्रवृत्त करत असते. अशाच काही गोष्टींचे कुतूहल सतत वाटत होते, भक्ती म्हणजे नक्की काय? एखादी बाई जिचे वर्षभर गुडघे दुखत असतात, ती अनेक किलोमीटर वारीमधून चालत माऊलीपर्यंत कशी पोहोचते? दुखण्यावर औषध घेणारी मंडळी तब्येतीची कुठलीही तक्रार न येता अखंड गिरनार कसा चढून जातात? साधा पंख्याचा वारा सहन न होणारी माणसे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अमरनाथाचे दर्शन घ्यायला कसे जातात? असे काय आहे की, जे या सगळ्या भक्तांना आपल्या दे
(Pranit More Assault Case) स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याला सोलापूरात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सोलापूरात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहाडियावर विनोद केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटाने कार्यक्रम संपल्यावर त्याच्यावर हल्ला करत मारहाण केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरेच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्टद्वारे देण्यात आली होती. अशातच आता याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेता अली फजल आगामी प्रोजेक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे. त्याच्या बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये अनुराग बासूचा 'मेट्रो इन दिनो', 'मिर्झापूर: द मूव्ही' आणि मणिरत्नमचा 'ठग लाईफ' यांचा समावेश आहे. 'मेट्रो इन दिनो'मध्ये अली फजल एक गहन भूमिकेत दिसेल, ज्यात त्याच्या अभिनयाच्या विविध बाजू उलगडल्या जातील. त्याचप्रमाणे, 'मिर्झापूर'च्या यशानंतर, 'मिर्झापूर: द फिल्म' सुद्धा प्रेक्षकांच्या खूप अपेक्षांसह येत आहे, ज्यात अली फजलची भूमिका कशी विकसित होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
अखिल भारतीय साहित्य महामंडळ व सरहद यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ९८ कार्यक्रमांच्या अंतर्गत सरहद महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे 'मराठी साहित्यात महानुभाव साहित्याचे योगदान' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिद्धपूर अमरावती मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रिद्धपूर हे मराठी संस्कृतीच्या उदयाचे केंद्र असल्यामुळे मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाची तिथे स्थापना झाल
'नो एंट्री पुढे धोका आहे' या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि 'जपून जपून जा रे' या गाण्याने तर अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली होती. आता लवकरच सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी याने स्वतः 'नो एंट्री पुढे धोका आहे २ - कॉमेडी ऑफ टेरर्स' ची सोशल मीडियावर घोषणा केली आहे.
मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयकौशल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि ‘स्टाईल आयकॅान’ म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित 'पी.एस.आय.अर्जुन'चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.
महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीचे काही लोक कोर्टात गेले, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शनिवार, २५ जानेवारी रोजी त्यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
कोल्हापूरमधील वन्यजीवांच्या संरक्षणाचा वसा उचलून त्यांच्यासाठी खर्या अर्थाने रक्षक ठरलेले प्रदीप अशोक सुतार यांच्याविषयी...
Ram Janaki temple उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राम जानकी मंदिरातून (Ram Janaki temple) ३० कोटी रुपयांच्या मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. ही घटना १३ जानेवारी रोजी घडली असल्याचे वृत्त आहे. चोरी झालेली मूर्ती अष्टधातूची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणात पोलिसांना चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी आता यश आले आहे. समाजवादी पक्षाच्या ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने नक्षलवादाच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईला वेग आला असून, १६ जानेवारी रोजी सुरक्षा दलाने बिजापूर येथे १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. बिजापूरच्या दक्षिण भागातील जंगलामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार माओवादी गटाचे अनेक म्होरके या परिसरात तैनात असल्याची माहिती त्यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. गुरूवारी सकाळी ९ वाजता सुरक्षा दलाने या कारवाईला सुरूवात केली.
जंगलात बांबू तोडण्याचे काम करणाऱ्या कामगारावर वाघाने हल्ला करुन त्याला ठार केल्याची घटना मंगळवार दि. १४ जानेवारी, २०२५ रोजी बल्हारशाह वनपरिक्षेत्रात घडली tiger attack in chandrapur. कामगाराला ठार केल्यानंतर वाघ त्याच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला tiger attack in chandrapur. तो मृतदेहाजवळून हटत नसल्याने प्रसंगी वन विभागाने त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेतले. (tiger attack in chandrapur)
(Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड हे नाव गेला महिनाभर राज्यात चर्चेत आहे. मात्र वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन व्रतस्थ जीवन जगलेले द्रष्टे नेते म्हणजे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शुक्रवार, १० जानेवारी रोजी चंद्रपूर येथे आयोजित लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा सोलापूर प्रकल्प आता वीज निर्मितीसाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार आहे. शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत पन्नास वर्षांसाठी प्रारंभिक करार केले जातील.
रेल्वे मार्गाचे अपग्रेडेशन झाल्यानंतर पुणे-दौंड नंतर आता सोलापूर-दौंडदरम्यानच्या मार्गावरही रेल्वे गाड्या ताशी १३० कि.मी. वेगाने येत्या काही दिवसांत धावतील. लवकरच याची अंमलबजावणी होणार असून पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी १३० धावणार आहे. दौंड-सोलापूर-वाडी विभागांत एकूण ४४ जोड्या रेल्वे (LHB रेकसह ८८ट्रेन सेवा) सध्याच्या ११० किमी प्रतितास वरून १३० किमी प्रतितास वेगाने धावतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात सोमवार दिनांक ६ जानेवारीच्या दुपारी नक्षलवाद्यांचा एका गटाने पोलिसांच्या गाडीला लक्ष्य केलं. दांतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर इथली नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाई पूर्ण करून परतत असताना बेदरे कुटरू रस्त्यावर पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य केलं गेलं. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आयईडी स्फोटकांचा वापर करत हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे.
सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघे एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहेत.
मराठी 'बिग बॉस’ सीझन ५ चा विजेता सुरज चव्हाण सध्या प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे त्याच्या हक्काच्या घराचं स्वप्न पुर्ण झालं. तर दुसरीकडे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरजला चित्रपटात काम करण्याची संधी देणार हा दिलेला शब्द पुर्ण केला आहे. ‘झापुक झुपूक हा सुरज चव्हाणचा नवा चित्रपट लवकरच येणार असून चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे.
नागपूर : शिवसेना ही एका परिवाराप्रमाणे असून पक्षात कुणीही नाराज नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी दिले. एखादे पद मिळाले नाही तर माणूस म्हणून वाईट वाटणे साहजिक आहे, काहीजणांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या, मात्र याचा अर्थ कुणी नाराज आहे असे नाही. आज नाराजी व्यक्त केलेले तिन्ही आमदार माझ्या सोबत असून त्यांच्यापैकी कुणीही नाराज नाही. यापुढेही सगळेजण मिळून शिवसेनेमध्ये एकत्र राहून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.
Muslims उत्तर प्रदेशातून लखमापूर येथील एका गावातील विधवा महिलेने भीतीपोटी आपले राहते घर सोडून पलायन करावे लागल्याची घटना घडली आहे. तिने त्या पोस्टरवर कट्टरपंथींमुळे त्रास होत असून मला नाविलाजाने घर सोडायचे आहे. हे घर विक्रीसाठी असल्याचे डीएमकडे तक्रार केली होती. यावेळी काही कट्टरपंथींनी तिच्या मोठ्या मुलीचे एक दोनदा नाहीतर तब्बल तीन वेळा अपहरण केले आणि लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केले असून तिला धमकीही देण्यात आली आहे.
गुणवत्ता, पर्यावरण, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याच्या निकषावर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मेट्रो परिचालन सेवेला आयएसओ ९००१, आयएसओ १४००१ आणि आयएसओ ४५००१ मानांकने प्राप्त झाली आहेत. अशा प्रकारची तिनही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी नवी मुंबई मेट्रो ही राज्यातील एकमेव मेट्रो सेवा ठरली आहे.
(Gopichand Padalkar) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील मारकडवाडी गावात १० डिसेंबर रोजी महायुतीची सभा होत आहे. या सभेत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
ठाणे : बदलापूर ( Badlapur ) येथील शालेय अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्ह्यातील शाळांनी बालकांच्या संरक्षणासाठी कोणत्या खबरदारी घेतल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी ‘ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’चे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. श्रीनिवास अग्रवाल यांच्या आदेशाने व ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’चे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
हा ९० वर्षे जुना विमान कायदा, १९३४च्या जागी भारतीय वायुयान विधेयक (BVV), २०२४ गुरूवार, ६ डिसेंबर रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या वर्षी ऑगस्टमध्ये लोकसभेत मंजूर झालेल्या या विधेयकामुळे विमान वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणे सुलभतेसाठी हा कायदा फायदेशीर ठरेल. भारतीय वायुयान विधायक, २०२४ नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांच्या प्रतिसादानंतर मंजूर करण्यात आले, लोकसभेने या विधेयकाला आधीच मंजुरी दिली आहे.
"समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा विकास झाला. जालना, संभाजीनगरचे चित्र बदलले आहे. महाराष्ट्राचे औद्योगिक केंद्र आता पुण्याप्रमाणेच संभाजीनगर आणि जालनाकडे विस्तारताना दिसेल. त्यामुळेच शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचे चित्र बदलेल. मात्र शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग उभारण्यात येईल ", असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Harshavardhan Patil : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय विठोबा भरणे यांचा विजय झाला. कधी स्वतंत्र तर कधी काँग्रेसच्या सोबत जाणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव नेमका का झाला ? एकेकाळी मुख्यमंत्री पदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा झाली होती, त्यांची आता पिछेहाट का झाली ? सत्तेची समीकरणं इंदापुर मध्ये नेमकी कशी बदलली ? हेच जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून.
(Markadwadi) माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतला. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन जानकरांनी आपला निर्णय माध्यमांसमोर मांडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात. यावेळी भक्तांकडून देवीला अनेक दान अर्पण केले जाते. परभणी येथील जयश्री रमेशराव देशमुख यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी ११ तोळे सोन्याची मोहनमाळ अर्पण केली आहे. यावेळी मंदिर संस्थानच्या ( Tulajapur ) वतीने देशमुख कुटुंबियांना देवीची प्रतिमा आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला.
लिएंडर पेस स्थापित 'फ्लाइंग मॅन व्हेंचर्स'च्या सीईओपदी अपूर्वा सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंधन बँकेच्या विपणन प्रमुखपदी असलेल्या अपूर्वा सरकार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामासंदर्भात सरकार यांनी लिंक्डइन या उद्योग व वाणिज्य क्षेत्राशी निगडीत वेब पोर्टलवर एक पोस्ट केली आहे.
(Lakshmi Mittal Group) चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे लक्ष्मी मित्तल समुहाच्या प्रस्तावित पोलाद कारखान्याच्या स्थापनेचा मार्ग अधिक प्रशस्त झाला असून कारखाना प्रशासनासमोरच्या अडचणी वेगाने सोडवून हा कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी वेगाने पावले उचलण्याचे निर्देश दि. २८ नोव्हेंबर रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाच्या विविध विभागांना दिले आहेत. लक्ष्मी मित्तल समुहाचा हा प्रस्तावित पोलाद कारखाना आशियातील सर्वात मोठा पोलाद प्रकल्प ठरणार असून पोंभुर्ण्यातील पाच हजार एकर जमिनीवर या पोलाद प्रकल्पाची उ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघात महायुतीने धमाकेदार विजय मिळवला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची अवस्थादेखील काही वेगळी नाही. करवीर निवासिनी अंबाबाई जिथे वास्तव्य करते अशा कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सुनेचा अपमान कोल्हापूरवासियांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि थेट मतपेटीतूनच अद्दल घडवत मतदारांनी महाविकास आघडीला कोल्हापुरातून हद्दपार केलं.
(Gokul) कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे सत्ता आणि आर्थिक केंद्र म्हणून प्रचलित असणारा गोकुळ दूध उत्पादक संघ. राज्यात निवडणूक पार पडताच 'गोकुळ'कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गोकुळ दूध उत्पादक संघातर्फे गायीच्या दूध खरेदी दरात तब्बल ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे.