विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील ११ पॅकेजमधील कामांसाठी सात अभियांत्रिकी कंपन्यांनी आर्थिक बोली जिंकली आहे. मुंबई रस्ते विकास महामंडळातर्फे मंगळवार दि.२२ मे रोजी सात स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे
Read More
मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या तीन महामार्गांच्या २६ पॅकेजमधील कामांसाठी मागविलेल्या निविदांना कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून या निविदा दाखल करण्यात आल्या आहेत.
विरार-अलिबाग बहुउद्देशिय मार्गिकेच्या निविदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता कंत्राटदारांना १२ मार्चपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा(एमएसआरडीसी)तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. विरार ते अलिबाग दरम्यान १२८ किलोमीटर लांबीचा बहुउद्देशिय वाहतुक मार्ग एमएसआरडीसी उभारणार आहे