जयंतरावांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. काही महिन्यांपासून त्याची दुर्दैवी चाहूल लागतच होती, परंतु ते मनाला पटत नव्हते. ईश्वरेच्छा. पण, लवकरात लवकर भारतमातेच्या सेवेसाठी ते परत येणार व हिंदूराष्ट्र (अखंड) करूनच दाखवणार, हा विश्वास आहे.
Read More
एक दूरदुष्टी असलेला नेता आणि संयोजक जयंत सहस्रबुद्धे यांचे निधन झाल्यामुळे अतिशय दुःख होत आहे. ‘विज्ञान भारती‘चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, या नात्याने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले आणि आपल्या समाजाची बांधणी मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. दोन दशकांहून अधिक काळ त्यांच्या अनुकरणीय नेतृत्वाचा साक्षीदार म्हणून, मी जयंतराव यांना परिभाषित करणार्या काही अपवादात्मक गुणांवर प्रकाश टाकू इच्छितो.
जयंतरावांच्या निधनाची धक्कादायक बातमी ऐकली आणि त्यांच्या सोबतचे प्रसंग आणि आठवणी मनासमोर उभ्या राहिल्या. १९९३-९४ मध्ये काही वेळ नाशिक विभाग प्रचारक, नंतर कोकण प्रांत प्रचारक आणि अन्य वेळी प्रांत प्रचारक बैठकीत आणि संघ शिक्षा वर्ग आदी अन्य कार्यक्रमांतून सतत भेटी होतच असत. मुंबईत परळ विभाग प्रचारक असल्यापासून घराशीही जवळचा संबंध आला.
स्वयंसेवकांचे प्रेरणास्थान, मृदू स्वभाव, कुशल संघटक, विचारक, कोकण प्रांत प्रचारक असताना अथक प्रवास करणारे जयंतराव सहस्रबुद्धे. दि. २ जून रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी विज्ञान क्षेत्रात उभे केलेले कार्य सर्वस्वी अद्भुतच. वैज्ञानिकांच्या सहज संवादातून हृदयस्थ संबंधांचे रुपांतर त्यांनी ‘विज्ञान भारती’शी जोडण्यात केले. जयंतरावांचा स्वभाव धीरगंभीर. मोजकेच पण परिणामकारक बोलणारे. असा हा भारतमातेचा नररत्न गमावल्याची खंत आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असेल.
केवळ संघटनेपुरते मर्यादित न राहता, देशहितासाठी आवश्यक विज्ञान क्षेत्रातील सर्वच घडामोडींवर जयंत सहस्रबुद्धे यांचे लक्ष होते व प्रत्येक कार्यकर्त्याला तशी दृष्टी असण्यावर त्यांचा आग्रह होता. ते स्वत: सर्व स्तरातल्या वैज्ञानिकांशी मोकळेपणाने अनेक विषयांवर चर्चा करीत व संपूर्ण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करीत असायचे. अर्थात, जे राष्ट्राच्या हिताचे असेल ते स्पष्टपणे सांगणे, हा त्यांचा मूळ स्वभाव होता.
ज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक जयंतराव सहस्रबुद्धे यांचे नुकतेच देहावसान झाले. आपल्या सर्वांना त्यांचा परिचय आहेच! जयंतराव यांचा सहवास लाभलेले महाराष्ट्रात अनेक संघ स्वयंसेवक तथा ’विज्ञान भारती’चे कार्यकर्ते आहेत, अशा सर्वांची जयंतराव यांच्याशी असलेली आपुलकी, प्रेम व जिव्हाळा नेहमीच संस्मरणीय राहील.
‘विज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले जयंतराव सहस्रबुद्धे. त्यांचे आपल्यात नसणे, ही संघटनेबरोबरच राष्ट्राचीसुद्धा अपरिमित हानी होय!
‘विज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक जयंत सहस्रबुद्धे यांचे दि. २ जून रोजी निधन झाले. त्यांची श्रद्धांजली सभा आज, सोमवार, दि. १२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतील राजा शिवाजी विद्यालय, बी. एन वैद्य सभागृह, गेट क्रमांक १२, हिंदू कॉलनी, दादर (पू) येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने ‘विज्ञान भारती’तर्फे प्रकाशित ‘विज्ञान क्षेत्रातील स्वातंत्र्यलढ्याची अज्ञात गाथा’ या पुस्तकातील जयंत सहस्रबुद्धे यांनी या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेल्या लेखाचा संपा