महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई, प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, व्ही. मुरलीधरन, नारायण राणे आणि श्रीमती वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ 02 एप्रिल 2024 रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत.
Read More
केरळच्या डाव्या आघाडीच्या सरकारची उधळपट्टी आणि चैन यामुळेच राज्यावर आर्थिक संकट आले आहे, असा टोला केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लगाविला आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी केरळमधील पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले, केरळ राज्यावर आलेल्या आर्थिक संकटास केंद्र नव्हे तर राज्य सरकारचा कारभार जबाबदार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा नववा वर्धापन दिन दि. ३० मे रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनाची जय्यत तयारी केंद्र सरकारकडून केली जात असून, मोदी सरकारच्या काळात करण्यात येत असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा या निमित्त मांडण्यात येणार आहे.