(WAQF Amendment Bill Passed In Rajya Sabha) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर गुरुवार, दि. ३ एप्रिल रोजी राज्यसभेत सादर करण्यात आले. प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर मध्यरात्री हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे रुपांतर कायद्यात होईल.
Read More
नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत.
(Waqf Amendment Bill in Rajya Sabha) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे. या सुधारित विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते मिळाली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर झाले. आज म्हणजे गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी हे सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे.
( Waqf Amendment Bill to be introduced in Lok Sabha ) केंद्र सरकारतर्फे २ एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. विधेयकावर सुमारे ८ तासांचा वेळ चर्चेसाठी निश्चित करण्यात आला असून लोकसभेतील संख्याबळ पाहता हे विधेयक सहज मंजुर होणार आहे. दरम्यान, भाजपने आपल्या सर्व सदस्यांना तीन ओळींचा पक्षादेश अर्थात व्हिपही जारी केला आहे.
( amit shah on Immigration and Foreign Nationals Bill passed in Lok Sabha ) “भारत देश ही काही धर्मशाळा नाही. बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी ही पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारची देण आहे. त्यांच्यामुळेच देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर पसरले आहेत. मात्र, आता बंगालमध्ये २०२६ मध्ये भाजपची सत्ता येणार असून त्यानंतर घुसखोरी संपेल,” असा घणाघात केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी गुरुवार, दि. २७ मार्च रोजी लोकसभेत केला.
( Palghar Lok Sabha MP Hemant Sawra In Parliment ) पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. हेमंत सवरा यांनी लोकसभेत गरीब, ग्रामीण व आदिवासी बांधवांसाठी केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचे कौतुक करत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला.
पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर येथील कबर नष्ट करा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. तसेच ही वारसा स्थळे केवळ आपल्या गुलामगिरीची आठवण करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जगातील गरीब देशांना दारिद्-यनिर्मूलनासाठी आणि तेथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आर्थिक मदत देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या ‘युएसएड’ या संस्थेचे कामकाज अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठप्प केले. मानवतावादी कार्य करणार्या या संस्थेकडून गेल्या काही वर्षांत संशयास्पद कार्यासाठी अमेरिकी निधी वापरला जात असल्याचा आरोप होत होता. जागतिक डाव्या इकोसिस्टिमच्या घातक अजेंड्याचा फटका फक्त भारतालाच नव्हे, तर अमेरिकेतील उजव्या संघटनांनाही बसत होता. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी या संस्थेच्या भारतातील अजेंड्याचा का
(Waqf Amendment Bill Report) वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. यावेळी जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल आणि समिती सदस्य निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्या, संजय जयस्वाल व अन्य उपस्थित होते. अहवाल सादर करताना विरोधी पक्षाचे कोणतेही सदस्य उपस्थित नव्हते.
काँग्रेसचे ( Congress ) युवराज राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ’जितनी आबादी उतना हक’चा नारा दिला आहे. एके काळी जातीपातीविरोधात घोषणा देत लोकसभा निवडणूक लढवणार्या काँग्रेसची पुढची पिढी सत्तेसाठी जातींचे राजकरण करत आहे, यावरूनच काँग्रेसचे कोणतेही धोरण स्वार्थकेंद्रित असते, हे स्पष्ट होते. आज राहुल गांधी रोजगाराच्या मुद्द्याची शिडी करून जातीनिहाय आरक्षणाचा डाव मांडत आहेत. देशाच्या प्रगतीचे विभाजन करण्याचा हा डाव आहे. भारताच्या प्रगतीसाठी आसवे वाहणार्या काँग्रेसने, गेली कित्येक वर्षे देशातील शैक्षणिक धोरण बदलण्
वर्ष २०२४ संपण्यास आता अवघ्या चार दिवसांचा कालावधी उरला आहे. हे वर्ष विशेषतः राजकीयदृष्ट्या धक्कादायक वर्ष म्हणून लक्षात राहील. लोकसभा निवडणुकीपासून विविध विधानसभा निवडणुकांपर्यंत जनतेने असा जनादेश ( Results ) दिला, ज्याचा अंदाज मोठ्या राजकीय विश्लेषकांनाही आला नाही.
मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर ( Ravindra Waikar ) यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे रवींद्र वायकर यांची खासदारकी अबाधित राहणार आहे.
नवी दिल्ली : देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या तरतूदीच्या विधेयकावर विचार करण्यासाठी संसदेने शुक्रवारी ३९ सदस्यीय संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) ( JPC Members ) स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्षपद माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार पी. पी. चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सदस्यांनी मतदान केल्यानंतर संविधान (एकशे एकविसावी सुधारणा) विधेयक, २०२४ आणि 'केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) विधेयक, २०२४' औपचारिकपणे लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकात 'एक राष्ट्र, एक निवडणूक' ( One Nation One Election ) अर्थात लोकसभा आणि राज्य विधानसभा दोन्हीच्या एकाच वेळी निवडणुकांचा प्रस्ताव आहे. हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठविण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी, १६ डिसेंबर रोजी लोकसभेत ( Loksabha ) 'संविधान (एकशे एकविसावी सुधारणा) विधेयक, २०२४' सादर करतील. ही घटनादुरुस्ती एकत्रित निवडणुकांशी (वन नेशन वन इलेक्शन) संबंधित आहे.
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शनिवारी लोकसभेत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी आज लोकसभेत चर्चेत भाग घेतला. राहुल गांधी यांनी लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना केंद्र सरकारवर राज्यघटनेवर हल्ला केल्याचा आरोप केला.
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेवरील नियोजित चर्चेदरम्यान दि. १३ डिसेंबर आणि दि. १४ डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्या सर्व लोकसभा ( Loksabha ) सदस्यांना तीन ओळींचा ‘व्हिप’ जारी केला आहे.
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) यांनी मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी संसद संकुलात काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या निषेधाच्या पद्धती अशोभनीय असल्याचे सांगितले. विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे वर्तन संसदीय परंपरेच्या विरुद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वावर खुश असलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनाही आता राहुल गांधी नकोसे झाले आहेत. ‘इंडी’ आघाडीचे ( Indi Aghadi ) नेतृत्व ममता बॅनर्जी यांना देण्यास आपली हरकत नसल्याचे वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.
लोकसभेत यशस्वी ठरलेल्या शरद पवारांचा ( Sharad Pawar ) विधानसभेत डाव का उलटा पडला?
नवी दिल्ली : वारंवार स्थगन प्रस्तावांद्वारे लोकसभेचे कामकाज चालू दिले नाही तर रविवारीदेखील कामकाज चालवण्यात येईल, असा इशारा लोकसभा ( Loksabha ) अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांना दिला.
अगदी काही महिन्यांपूर्वीच गुलाल उधळणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र निलेश लंके यांचा लोकसभेचा विजयी गुलाल उतरलाही नसताना मतदारांनी निवडणूक रिंगणात उतरलेल्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना सपशेल नाकारले. लंके यांच्याविरोधात अजित पवार गटाचे काशिनाथ दाते निवडणूक लढवत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जोरदार पीआर केल्याने आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या जोरावर विजयी झालेल्या खासदार नील
(Social Media) सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करणारे सध्याचे कायदे मजबूत करण्याची नितांत गरज आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेतील एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.
मुंबई : भाजपचा ( BJP ) बालेकिल्ला असलेला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप आणि मालाड या सहापैकी पाच मतदारसंघांत शिवसेना-भाजप महायुतीने विजय मिळविला आहे. केवळ मालाड पश्चिम या मतदारसंघातून काँग्रेसचे अस्लम शेख चौथ्यांदा विजयी झाले असून, भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, त्याशिवाय उर्वरित पाच जागांमध्ये महायुतीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे दहिसर, मागाठाणे आणि कांदिवली पूर्व या तीन मतदार
नाशिक : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशाला भ्रमित केले. आता विधानसभा निवडणुकीतदेखील महाराष्ट्राच्या जनतेला भ्रमित करण्याचे काम सुरू आहे. राज्यात महायुती सरकारने केलेल्या विकासकामांच्या झंझावातामुळे काँग्रेस राज्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच शहरी नक्षलवादाला खतपाणी घालण्याचे काम काँग्रेसकडून सुरू करण्यात आले आहे. शहरी नक्षलवादाच्या आडून काँग्रेस देशाला आणि त्यासोबत महाराष्ट्रालाही तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू ( Kiren Rijij
मुंबई : यंदाच्या लोकसभा ( Lokasabha ) निवडणुकीत जिहादचा एक नवीन प्रकार मुंबई आणि महाराष्ट्राने अनुभवला. ‘व्होट जिहाद’चा नारा मुंबादेवी, भेंडी बाजार, बेहरामपाडा, नागपाडा, मुंब्रा, मीरा रोड येथील नयानगर, मालेगाव अशा विभिन्न वस्त्यांमध्ये दिला गेला. मोठमोठ्या सभा, मशिदी आणि मदरशांमध्ये संमेलने, मेळाव्यांतून ‘व्होट जिहाद’चे नारे दिले गेले. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जनमत बदलण्यासाठी ‘व्होट जिहाद’चे कारस्थान महाविकास आघाडीकडून रचले जात आहे. त्यामुळे भविष्यात भारत एकसंध ठेवायचा असेल, तर जागरूक राहून मतदान
नाशिक : ( Pravin Darekar ) “लोकसभा निवडणुकीत जसा देशात काँग्रेसने आणि राज्यात महाविकास आघाडीने संविधानाचा अपप्रचार केला, तसाच आता विधानसभेलाही अपप्रचार करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत संविधानाचा खोटा ‘नॅरेटिव्ह’ सेट करून राहुल गांधी यांनी जनतेला भ्रमित करण्याचे काम केले. आताही ते हातात संविधानाची प्रत घेऊन त्याचा अपमान करत आहेत. संविधान भाजपसाठी सर्वोच्च पवित्र राष्ट्रीय धर्मग्रंथ आहे,” असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या प्
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसने नुकताच आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली आहे. दरम्यान, त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
“मुस्लीम महिला आणि मुस्लिमांतील मागास समुदायांना न्याय देणे आणि ‘वक्फ’ मंडळे माफियांच्या कब्जातून सोडविण्यासाठी मोदी सरकारने ‘वक्फ’ कायदा सुधारणा विधेयक, 2024 सादर केले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवार, दि. 8 ऑगस्ट रोजी लोकसभेत केले. केंद्र सरकारने लोकसभेत बहुप्रतीक्षित ‘वक्फ’ सुधारणा विधेयक सादर केले.
लोकसभा निवडणुकीनंतर येत्या दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत सर्वच विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्र काँग्रेसने आघाडीत लोकसभा निवडणूकीत मोठा भाऊ होण्याचा मान मिळवला. पंरतु आता काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. प्रदेश कमिटी उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीचे यासंदर्भातील पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ते पत्र तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष न
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणातील चुकीच्या आणि खोट्या माहितीवर कारवाई करण्यासाठी सत्ताधारी भाजपने लोकसभा अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे. राहुल गांधींविरोधात पाठवण्यात आलेल्या नोटिशीची माहिती देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, "सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारा कोणताही सदस्य सहजासहजी सुटणार नाही."
भारतातील उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागात बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी व्यवहार्यता अभ्यास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि. २७ जून रोजी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले. सद्यस्थतीमध्ये मुंबई-अहमदाबाद या मार्गावर ५०० किमी अंतराच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. याच पार्श्वभूमीवर आता देशातील इतर मार्गांवर या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात भारतात मेट्रो बरोबरच आता बुलेट ट्रेनचे जाळेही विस्तारण्याची चिन्ह
भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. भाजप्रणित एनडीएने राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर, इंडी आघाडीने सुद्धा के सुरेश यांना उमेदवारी दिली. दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून या राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात बेरोजगारीचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेच्या केंद्रस्थानी होता. विरोधी पक्षांकडूनही त्यांच्या जाहीरनाम्यात तरुणांना रोजगारासंबंधीची विविध आश्वासने देण्यात आली. तेव्हा, सद्यस्थितीत औपचारिक रोजगाराच्या जोडीलाच स्वयंरोजगार, असंघटित क्षेत्रातील रोजगार यांसारख्या मुद्द्यांची मीमांसा करणारा हा लेख...
लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण पूर्णत: निवळत नाही, तोवर आता पुणेकरांच्या समस्यांसाठी आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून लोकप्रतिनिधींनी कंबर कसलेली दिसते.पुणे महानगराची एकीकडे विकासाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे चित्र असताना, अलीकडील काळातील काही अप्रिय घटनांनी मात्र या चित्रावर नेमकी फुली मारली गेली.
"आदित्य ठाकरे यांनी आता नवीन मतदारसंघाचा शोध सुरु केला आहे. राहुल गांधी पराभूत झाल्यानंतर जसे वायनाडच्या शोधात निघाले होते, तसंच आता आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील आपला वायनाड शोधण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे आता वरळीतून लढणार नाहीत," असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केलंय. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाने बाजी मारली. पण उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत मात्र आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा वाजली. दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी विजय मिळवला
आपल्याला ज्यांच्याशी लढायचे आहे, ते मायावी लोकं आहेत. ७५ वर्षे खोटा प्रचार करण्याची कला आणि शक्ती त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्यांच्याशी आपल्याला लढायचे आहे आणि ही लढाई सर्वांची लढाई आहे. संविधानाविषयी जर खोटा प्रचार करून आपल्या समाजबांधवांची दिशाभूल ते करू शकतात, तर, सत्याचा पक्ष घेऊन आणि सत्याचं नाणं खणखणीत वाजवून त्याचा प्रतिकार आपणही करू शकतो. फक्त त्यासाठी राजकीय अंगाने का होईना, पण संविधान साक्षर होणं ही काळाची नितांत गरज आहे.
आपण काय मिळवलं? आणि आपल्या हाताशी काय लागलं याबाबत उद्धवजींनीही आत्मपरिक्षण केलं पाहिजे, असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच २०१९ ला ते एकत्र राहिले असते तर आज झालेली वाताहत झाली नसती, असेही ते म्हणाले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
जम्मू-काश्मीर मधील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न अशा दहशतवादी हल्ल्यांद्वारे केला जात आहे, हे स्पष्ट आहे. पण, सलग तिसर्यांदा सत्तेवर आलेले मोदी सरकार इस्लामी अतिरेक्यांचे असे मनसुबे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.
केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पहिल्यांदा विजय झाला. ज्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत दि. ७ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारले. मुळात पराभवाचे खापर एकमेंकावर फोडल्यामुळे ही हाणामारी झाले.
देवेंद्र फडणवीस पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. शनिवारी दादर येथील भाजपच्या कार्यालयात विधिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
आपली लढाई तीन नाही तर चार पक्षांशी होती. तो चौथा पक्ष म्हणजे खोटा नरेटिव्ह हा होता. पण हा नरेटिव्ह फक्त एखाद्या निवडणूकीत चालतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शनिवारी दादर येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित विधिमंडळ बैठकीत ते बोलत होते.
नुकताच लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आणि एनडीएने २९४ जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा बहुमत प्राप्त केलं. तर महाराष्ट्रात यावेळी महायूतीला १७ जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीने ३० जागांवर विजय मिळवत सरशी केली. मात्र, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या लढाईत शिंदेंची शिवसेनाच सरस ठरल्याचं चित्र आहे. शिवसेनेतील फुटीनंतर झालेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती आणि राज्यातील अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध उबाठा असा थेट सामना होता. परंतू, निकालात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने जरी जास्त जागांवर विजय मिळवला असला तरी शिंदेंच
लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यात उबाठा गटाला अपेक्षेपेक्षा जास्त जागाही मिळाल्यात. पण या निकालात मात्र, उबाठा गटाला आपला बालेकिल्ला असलेल्या एका जागेवर जोरदार फटका बसला. ती जागा होती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी दारूण पराभव केलाय. परंतू, चंद्रकांत खैरेंनी मात्र आपल्या पराभवाचं खापर त्यांच्याच पक्षातील नेते अंबादास दानवे यांच्यावर फोडलंय. एवढंच नाही तर त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे याबाबत तक्रार करणार असल्याचंही म्ह
बुधवार, ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीच्या निकालाचं पडघम वाजलं आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झालं. तब्बल २९४ जागांवर एनडीएने आपला विजय निश्चित केला. तर राज्यात महायूतीने १७ आणि महाविकास आघाडीने ३० जागा मिळवत सरशी केलीये. मात्र, महायूतीच्या एका जागेची सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा. या लोकसभा मतदारसंघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन टर्म खासदार असलेल्या उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा दारूण पराभव केला
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी भेट घेतली आहे. लोकसभेत मिळालेल्या विजयाकरिता राज ठाकरेंचे आभार मानन्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
बारामती लोकसभेचा कौल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युगेंद्र पवार यांची बारामती कुस्तीगीर परिषदेवरून हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. युगेंद्र हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र आहेत.अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर बारामतीत लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पेटला. या संघर्षात दादांचे बंधू श्रीनिवास यांनी शरद पवार आणि सुप्रिया यांची साथ दिली. त्यांचे पूत्र युगेंद्र या सर्वात आघाडीवर होते. त्यांनी बारामती विधानसभेचा कोपरान् कोपरा पिंजून काढत सुप्रिया सुळें
लोकसभा निवडणुकीत राज्यात देवेंद्र फडणवीस या एकमेव नेत्याने २०० हून अधिक सभा घेतल्या. त्यांच्यात प्रचंड क्षमता आहे, ते सरकार सांभाळून पक्षाचे काम करू शकतात. त्यामुळे आमच्या कोअर कमिटीने निर्णय घेतलाय, की आम्ही त्यांना सरकारमधून बाहेर पडायला देणार नाही. वरिष्ठ नेत्यांनाही आम्ही तशी विनंती करणार आहोत, अशी माहिती भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवार, दि. ६ जून रोजी दिली.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणूक काळातील देशभरातील प्रचाराचा धुरळा आणि त्यानंतरचे कवित्व यावर सर्वदूर मंथन होत आहे. आधी दैनिकांमधून ते होत होते, मग इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आली, आता तर सोशल मीडियावर देखील याची धूम आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करीत आहे.