(MP Naresh Mhaske instructions to thane railway officials) ठाणे रेल्वे स्थानकाचा नुतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होत आहे. फलाटांवर नव्याने छतांची उभारणी, पंखे, वाढीव आरक्षण खिडक्या, वातानुकूलीत प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे. नियमित स्वच्छतेवर भर द्या, युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा, पावसाळ्यापूर्वी सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशा महत्वपूर्ण सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
Read More
संधीचे सोने कसे करावे हे ज्यांच्याकडे पाहून प्रत्येकाने शिकले पाहिजे, अशा सुप्रसिद्ध निवेदिका साधना योगेश कारंडे-जोशी यांच्याविषयी...
( Ravindra Prabhudesai thane satkar ) उद्योग क्षेत्रासह समाजकारण व अध्यात्मामध्ये विशेष योगदान देणार्या रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ‘डी.लिट’ पदवी देऊन सन्मानित केले आहे. ठाणेकर प्रभुदेसाई यांचा सन्मान हा आपल्या ठाण्याचा गौरव आहे. ठाण्याची प्रतिष्ठा वाढवून उद्योजकतेच्या बहुमानानिमित्त डॉ. प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार आयोजित केला आहे. या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Thane Fire कडाक्याचा उन्हाळा सुरू असताना बुधवारी आगीच्या घटनांनी 'ठाणे' अक्षरशः धगधगले. मंगळवारी रात्री गायमुख जकात नाका येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीने घोडबंदर भागात धुराचे लोट बुधवारी दुपारपर्यत दिसत होते. मंगळवारी रात्री लागलेली ही आग तब्बल १२ ते १३ तासानंतर अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.
( traffic on Ghodbunder Road ) माजिवडा मेट्रो स्थानकावर छत उभारणीच्या कामामुळे माजिवडा उड्डाणपुलावरून मुंबईहून नाशिक, घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक १५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत. त्यामुळे घोडबंदर रोडवर रविवार, दि. 20 एप्रिल रोजीपर्यंत वाहतुककोंडीचा सामना करावा लागणार आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे.
( BJP meeting thane ) भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व खा. अरुण सिंह व राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी ठाण्यात येऊन भाजपच्या संघटन पर्वाबाबत बैठक घेऊन आढावा घेतला. बैठकीत आतापर्यंत झालेल्या संघटनात्मक निवडणुकीच्या कामांबरोबरच पक्षाच्या पुढील कार्यक्रमांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
( MLA sanjay kelkar on hukka parlour in thane ) “ठाणे शहरात ‘हुक्का पार्लर’ चालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल होत नाहीत,” अशी खंत आ. संजय केळकर यांनी अधिवेशनात व्यक्त केली. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शहरात शोध मोहीम सुरू करून ठोस कारवाई करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील, असे स्पष्ट केले.
( Ganga Aarti at Upvan Lake thane )‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’ आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा रौप्य (25वे) महोत्सवी वर्ष आहे. न्यासच्यावतीने नववर्षानिमित्त दि. ३० मार्च रोजी काढण्यात येणार्या स्वागतयात्रेत यंदा संस्कृतीचा महाकुंभ अवतरणार आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून शुक्रवार, दि. २८ मार्च रोजी सायंकाळी उपवन तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगाआरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता आली.
( Mahakumbh culture in the Hindu New Year welcome in thane ) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या विश्वातील सर्वात पुरातन पाली भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला. याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यासाठी गुढीपाडव्यादिनी ठाण्यात निघणार्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत शांती व समतेची पाली भाषेची पालखी काढून बौद्ध बांधव व भिक्खु संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’चे कार्याध्यक्ष संजीव ब्रम्हे यांनी दिली.
ठाणे येथील बाळकुम ते गायमुख या १३.४५ कि.मी. लांबीच्या खाडी किनारा मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेले असून या कामाची एकूण किमंत रू.३,३६४.६२ कोटी इतकी आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.४५ कि.मी. असून यातील ६.६४ कि.मी. लांबी करिता पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे या लांबीकरिता काम सुरु करण्यास कोणताही अडथळा नाही, अशी माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आपल्या स्वप्नांच्या दिशेने गरुडझेप घेणार्या सावित्रीच्या लेकीची कथा..."संघर्ष हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग आहे, त्यावर फक्त बोलून उपयोग नाही. आपल्यासमोर येणार्या प्रत्येक अडचणींवर आपण विचारपूर्वक काम करायला हवे.” रेश्मा आरोटे यांचे हे वाक्य त्यांच्या संघर्षसंचितातून आलेले.
( Glaucoma Week at Thane Civil Hospital ) आरोग्य तपासणी करतेवेळी अनेकजण डोळ्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करत असले तरी याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळ्यांना काचबिंदू झाल्यास प्रथम दर्शनी कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र दुर्लक्ष झाल्यास कायमच अंधत्व येण्याचा धोका उद्भवतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हील रुग्णालयात नुकताच काचबिंदू सप्ताहात नऊ टक्के रुग्णांना काचबिंदूची कमी अधिक लक्षणे दिसून आली आहेत.
( come on top in the final round of the 'Mission 100 Days' initiative Thane Municipal Corporation ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन आकाराला आलेल्या ‘मिशन १०० दिवस’ या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महापालिकेला पहिला क्रमांक मिळाला. आता पुढील महिन्यात अंतिम मुल्यमापन फेरी होणार असल्याने पुन्हा अव्वल राहण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह प्रशासनाने कंबर कसली आहे.
( on work of the new Thane railway station MP Mhaske draws the attention of the Railway Minister ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडले आहेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा, कल्याण-पुणे लोकल करावी, दिवा-वसई लोकल स
( UBT group in thane ) शिवसेना उबाठा गटाच्या कळवा येथील शाखाप्रमुख ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली कामगार मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राकेश चौघुले यांनी पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला होता.
ठाणे जिल्ह्यात साजरा होणाऱ्या होळी आणि धुलीवंदनाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणावरील झाडे, लाकडे तोडणे तसेच जाळण्यास मनाई करण्यात आली आहे.
Thane Municipal Corporation यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी ठाणे महापालिकेने आरक्षित केलेला भूखंड शिक्षणाच्या उद्देशाने वापरण्याऐवजी अन्य व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. या भूखंडावर व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने, हा भूखंडाच्या उद्देशाविरुद्ध गैरवापर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बंदिस्त व्यायामशाळा किंवा जिममध्ये सायकल चालवणे आणि मोकळ्या वातावरणात सायकल चालवणे यात फरक आहे. मोकळ्या वातावरणात सायकल चालवणे ही एक प्रकारची ध्यानधारणाच असल्याचे प्रतिपादन प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन यांनी रविवारी रणरागिणी सायकल फेरीचे आयोजन केले होते.
Cyber crime गुन्हेगारी क्षेत्रातही आता गुन्हेगार नवनवे तंत्रज्ञान वापरून गुन्हे करीत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत असले तरी, विविध तांत्रिक फंडे वापरून मागील वर्षभरात नागरीकांची तब्बल १६२ कोटींची फसवणुक केल्याचे समोर आले आहे. वाढते गुन्हे आणि कोट्यवधींची फसवणुक यामुळे सायबर चोरटयांनी एक प्रकारे ठाणे पोलिसांना आव्हान दिले आहे. मात्र ठाणे पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष सायबर सुरक्षा पथक त
उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस) आणि वन विभागाच्या 'कांदळवन प्रतिष्ठान'मध्ये सामंजस्य करार झाला आहे. (thane creek mudflat)
ठाणे : ठाणे महापालिकेचा ( Municipal Corporation ) आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तब्बल ५४१.०८ कोटी मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. दि. २३ डिसेंबर रोजीपर्यंतच्या या वसुलीत अव्वल ठरलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीने १८७.४५ कोटी वसूल केले असून, सर्वात कमी म्हणजेच १८.४८ कोटींची वसुली मुंब्रा येथे झाली आहे. तरी थकबाकीदारांनी कर भरावा, यासाठी ठाणे पालिकेने फोन, ‘एसएमएस’द्वारे थकबाकी भरण्यासाठी केलेल्या आवाहनाचा सका
ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जवाहर बाग वैकुंठभूमीत त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी इहलोकीचा प्रवास संपवला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निध
ठाणे : ठाणे शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कागदोपत्री कारवाई करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने ( High Court ) चांगलेच फटकारले. दंड ठोठावूनही कार्यवाही करण्यात महापालिका अकार्यक्षम आहे किंवा होर्डींग व्यवसायात भागीदार आहे, असे कडक ताशेरे ओढत पुढील सुनावणी (दि.२९ जाने.) आधी शपथपत्र सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले.
Thane polluted मुंबईच्या तुलनेत ठाणे शहरातील हवा मध्यम प्रदुषित असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. १७ डिसेंबर रोजीच्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ठाणे शहरात सरासरी १२० हवा गुणवत्ता निर्देशांक नोंद झाला आहे. असे असले तरी हवेतील प्रदुषण रोखण्याचे मोठे आव्हान ठाणे महापालिकेसमोर आहे. दरम्यान, मुंबई - ठाण्यापेक्षा पुणे, चिंचवड, नाशिक, नांदेड, कोल्हापुर, अहमदनगर आदी शहरातील हवेची गुणवत्ता रेड झोनमध्ये असल्याने श्वास घेण्यासही त्रासदायक असल्याचे अहवालात नमुद आहे.
ठाणे : दिव्यातील एका अनधिकृत शाळेमध्ये झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी करून कारवाई व्हावी, तसेच दिवा भागात असलेल्या अनधिकृत शाळा ( School ) बंद कराव्यात, अशी मागणी मेस्टा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे दिव्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ठाणे : बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणार्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे. या दुरूस्तीच्या कामामुळे बंधार्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणार्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. एकूण ३० टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे पालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा ( Water supply ) बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे.
ठाणे : ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास’ (एमआयडीसी) महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, या काळात ‘ठाणे महापालिका’ क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा ( Water Supply ) पूर्ववत
(Thane) ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेने संजय केळकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत केळकर यांचा घरोघरी प्रचार करुन भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मदत करणार असल्याचे वृत्तपत्र विक्रेता सेनेने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
ठाणे : ठाणे शहर तलावांचे शहर असून या शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. मी याच मातीतला असून माझ्या चार पिढ्या या शहरात आहेत. त्यामुळे शहरातील जो ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा आहे, त्याची जपणूक आपणच नाही केली, तर पुढच्या पिढीला शहराचे वैशिष्ट्य कसे कळणार? या हेतूने पहिल्यांदा आमदार झाल्यावर अक्षरशः डम्पिंग बनलेल्या ठाण्याच्या टाऊन हॉलचे नूतनीकरण केले, असे महायुतीचे उमेदवार व ठाण्याचे विद्यमान आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) म्हणाले. केळकर यांचा विधानसभेसाठी निवडणूक अजेंडा काय आहे, याबाबत दै.‘मुंबई तरुण
(Sharmila Thackeray) ठाणे विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील गोकुळनगर भागात आयोजित केलेल्या प्रचारसभेला मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी शर्मिला ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला .
Thane Municipal नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणुक आणि आता विधानसभा निवडणुकीच्या कामात पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने ठाणे महापालिकेची पाणीपट्टी वसुली रखडली आहे. पाणी पुरवठा विभागाला यावर्षी दिलेल्या २२५ कोटी उद्दीष्टापैकी ४७ कोटीची वसुली झाली आहे.दरम्यान, निवडणुक संपताच वसुली करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं या महायुतीचे उमेदवार संजय केळकर (Sanjay Kelkar ) यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानेही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह नुकतीच केळकर यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.
ठाणे : ( Thane weather ) ठाणे शहरात दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक १९० वर पोहचला आहे तर, आवाजाची पातळी ८४ डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली आहे. मात्र, हरित फटाके फोडण्याकडे ठाणेकरांचा कल वाढल्याने गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हवा आणि ध्वनी प्रदुषण तुलनेने कमी झाल्याचा तसेच धुलीकणांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे यंदा ठाण्याची हवा मध्यम प्रदुषित वर्गवारीत असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये रू. ३ लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा मुद्देमाल विनातपशील आढळला असून ज्यात चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंची बिले तपासणीदरम्यान सादर न केल्याने भरारी पथकाने हा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Diwali Festival भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सुख-समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंग असा फराळ...लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या आणि बरंच काही..! आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो. परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना मात्र आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला मुकावे लागते. आता मात्र या विदेशातील भारती
Narendra Modi आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून येथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे १४,१२० कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन - ३ च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. या विभागात १० स्थानके असून त्यापैकी ९ स्थानके भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो लाइन - ३ हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प असून तो ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल. लाईन-३ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर याद्वारे दररोज सुमारे १२ लाख प्रवासी
( Thane Zilla Parishad ) ठाणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हयात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण काम हाती घेण्यात आले असून आरोग्य विभागाच्या वतीने ३ हजार २६१ पाण्याचे स्त्रोत तपासले जाणार आहेत. ही मोहीम महिनाभर सुरू राहणार असून त्यानंतर ग्रामपंचायतींचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
( Thane ring metro )ठाणे शहर परिसरातील आजूबाजूची वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने २९ किलोमीटर लांबीच्या एकीकृत ठाणे मेट्रो रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे ठाणेकरांची सततच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया काय आहे नेमका हा प्रकल्प?
केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेंतर्गत ठाणे जिह्यातील प्रोलेट्स ब्रँडला दि. २५ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथील पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पॅकेजिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फूड व बिवरेज क्षेत्रात देशस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फूड प्रोसेसिंग कंपन्यांना 'Informa Markets'द्वारे 'Fi India Award' देऊन गौरविण्यात येते.
(Jitendra awhad) बंगल्यावर अभियंत्याला नेऊन बेदम मारणे, चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बदडणे, महिलेचा विनयभंग करणे, असे नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 22 जणांवर खोट्या गुन्ह्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी आ. आव्हाडांची अक्षरशः पळापळ सुरू आहे. अटक टाळण्यासाठी आव्हाडांनी ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी न्यायालयात झालेल्या सुनावणीत दि. 3 ऑक्टोबर ही
(Thane) महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील 58 महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
(Thane Civil Hospital) ठाणे सिव्हील रुग्णालय मूत्रपिंड (किडनी) रुग्णांसाठी आधारवड ठरताना दिसून येत आहे. सिव्हील रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये गेल्या सहा महिन्यात रुग्णांचे एक हजार सेशन्स पूर्ण झाली आहेत. तरी सध्या दोन सत्रात सुरू झालेल्या या डायलिसिस सेंटरचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(Thane)ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा - मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास (एमआयडिसी) महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. एमआयडिसीच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी, ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शुकवार दि.२० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
(TMC) तलाव आणि खाडीत आत्महत्या करणारे तसेच मान्सून काळात खाडीत बुडणे व अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या घटना रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून शहरातील तलाव, खाडीवर १५ तरणपटू २४ तास ल्रक्ष ठेवणार आहेत. ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ताफ्यात नव्याने पोहणाऱ्यांची भरती करण्यात येणार असून बुडत्यांना आता महापालिकेचा आधार मिळणार आहे.
जनसामान्यांना खादी वस्त्र उपलब्ध व्हावे, यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या खादी वस्त्र विक्रीच्या स्टॉलला ठाणेकर नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, ठाणे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खादी वस्त्र विक्रीचा स्टॉल लावण्यात आला होता.
केंद्र व राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेच्या प्रयत्नामुळे मनोरुग्णालयाच्या सुमारे १४ एकर जागेवर ठाणे आणि मुलुंड दरम्यान होत असलेल्या विस्तारीत नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रकल्पाचा खर्च ६४ कोटींनी वाढला आहे.
ओव्हर हेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि लोकल जागच्या जागी थांबल्याची घटना डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे मार्गावर घडली.
ठाण्यातील अत्रे कट्ट्याच्या निर्मितीची आणि लेखिका, उत्तम वक्त्या संपदा वागळे यांच्या यशाच्या प्रवासाची रंजक कहाणी सांगणारा प्रवास...
लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालया’तून महाराष्ट्रात आणलेल्या छत्रपती शिवरायांच्या वाघनखांबाबत उपलब्ध असलेल्या अनेक समकालीन पुराव्यांची जंत्रीच लंडनस्थित संकेत कुलकर्णी आणि इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी मांडली. ठाण्यात आयोजित ‘लंडनमधील वाघनखांचा मागोवा’ या व्याख्यानात या द्वयीने वाघनखे आणि शिवरायांचा इतिहास उलगडला.
ठाणे शहरात गेले काही दिवस लपंडाव खेळणाऱ्या पर्जन्यराजाने शुक्रवारी रात्रीपासुन संततधार धरली. मात्र, मध्ये मध्ये विराम घेत धुवाँधार बरसणाऱ्या पावसाने सखल भाग वगळता कुठेही पाणी तुंबण्याच्या घटना झाल्या नसल्या तरी घोडबंदर रोड तसेच मुंबई - नाशिक महामार्गावर वाहनांची वाट अडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शुक्रवार सकाळी ८:३० ते शनिवारी सकाळी ८:३० पर्यंत ५० मि.मीटर पावसाची नोंद झाली.तर शनिवारी दिवसभरात सायंकाळी साडेपाच पर्यंत सुमारे ८० मि.मीटर पावसाची नोंद झाली आहे. अशी माहिती ठाणे महापालिका आपत्कालीन कक्षाकडून देण