बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर कट्टरपंथींचा उन्माद मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला. हिंदू अल्पसंख्याक आणि विशेषतः हसीना समर्थक तसेच, अवामी लिगच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यास कट्टरपंथींनी सुरुवात केली. एखाद्या हॉलीवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटाची कथा चोरून आपला नवीन चित्रपट तयार करायचा, ही ‘टेक्निक’ तशी चित्रपटसृष्टीत जुनीच. अशाच पद्धतीने बांगलादेशातील स्टोरी एकाअर्थी चोरण्याचा प्रकार सीरियातही झाल्याचे दिसते.
Read More
‘भिकीस्तान’ ही उपाधी मिळालेला पाकिस्तान आता अधिकृतरित्या ‘आतंकीस्तान’ बनला आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर इकोनॉमिक्स अॅण्ड पीस’ या संस्थेने नुकतेच ‘ग्लोबल टेरेरिझम इंडेक्स, २०२५’ अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, दहशतवादाने प्रभावित झालेल्या ६५ देशांमध्ये बुर्किनो फासो हा देश पहिल्या क्रमांकावर, तर पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर आहे. दहशतवादी कृत्यांमध्ये पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर असला, तरी स्वतःचे नाक कापून अपशकून करण्यामध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे, हे नक्की!
सीरियामध्ये ( New Syria ) गेल्या महिनाभरात ११६ बालके मृत्युमुखी पडली. म्हणजे, दिवसाला सरासरी चार बालके! पण, या बालकांवर कुणीही हल्ला केला नव्हता. हळूहळू सीरिया गृहयुद्धातून बाहेर पडतो आहे. मात्र, या गृहयुद्धातील न वापरलेली किंवा न फुटलेली विस्फोटके अजूनही सीरियाच्या भूमीत विखुरलेली आहेत. परिसरातील सुप्त अवस्थेतील बॉम्ब, विस्फोटक शेल्स, ग्रेनेड किंवा क्लस्टर म्युनिशनच्या स्फोटाने ही बालके मुत्युमुखी पडली. ‘युनिसेफ’सह संपूर्ण जगाने याबाबत शोक आणि चिंता व्यक्त केली आहे. आधीच अनेक दशके सुरू असलेल्या सीरियामध्ये
सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या पलायनानंतर देशात हयात ‘तहरीर अल-शाम’ (एचटीएस) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. असे म्हणतात की, “सीरिया हा एकेकाळी ख्रिश्चनांचा बालेकिल्ला होता. मात्र, तोच सीरिया आज इस्लामिक केंद्र म्हणून तयार झाले आहे.”
कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांचा कर्दनकाळ असणाऱ्या इस्रायलने पहिल्यांदाच आपल्या कामाची कबुली दिली आहे. २३ डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधताना इस्रायलचे सुरक्षा मंत्री इस्रायल कर्झ म्हणाले की हमासचा म्हरोक्या इस्माईल हनीयेह याला संपवण्यात आमचाच हात होता. येमेनच्या हुथी बंडखोरांना इशारा देत कर्झ म्हणाले की त्यांच्या विरोधात देखील अशीत कठोर कारवाई केली जाईल.
( Syria ) सिरीयातील परिस्थितीबद्दल इस्त्रायली पत्रकारांना काय वाटतं? लेव अरान यांच्याशी गप्पा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक स्वाती तोरसेकर, चंद्रशेखर नेने आणि अनय जोगळेकर यांचे परखड विश्लेषण
नवी दिल्ली : बशर अल-असाद सरकारला बंडखोर सैन्याने पदच्युत केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने सीरियातून ( Syria ) ७५ भारतीय नागरिकांना बाहेर काढले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली आहे.
आज तुरुंगाच्या अमानवी चेहर्याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे, सीरियामधील सेडनाया हा तुरुंग होय! अत्यंत भयावह चेहरा असलेला हा तुरुंग, सीरियातील असद यांची सत्ता कोसळल्यानंतर चर्चेचाविषय ठरला आहे. सीरियामध्ये असद यांच्या कुटुंबाची गेल्या 50 वर्षांची सत्ता कोसळली. राष्ट्राध्यक्ष असद गेल्या 14 वर्षांत आपल्या विरोधात आवाज उठवणार्या लोकांना दमास्कसनजीक कुख्यात सेडनाया तुरुंगातील अंधार कोठडीत डांबले जात होते.
बशर अल असद यांची एकहाती राजवट संपुष्टात आली असून, सीरियाचे पुढे काय होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. पण, प्रश्न केवळ सीरियापुरता मर्यादित नसून संपूर्ण मध्य-पूर्वेत याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यानिमित्ताने सीरियातील संकटाचे परिणाम आणि भवितव्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
सीरीया मधील यादवी युद्धाने परमोच्च टोक गाठले आहे. सीरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी रशियाला पलायन केले असून, सीरीया आता पूर्णपणे बंडखोरांच्या हाती गेले आहे. रशियाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार असाद आणि त्यांच्या कुटुंबाला रशियाने आश्रय दिला आहे.१३ वर्ष सुरू असलेले यादवी युद्ध आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे.
दमास्कस : सीरियात ( Syria ) बंडखोरांनी सत्तापालट केला आहे. अध्यक्ष बशर अल-असद कुटुंबाची ५० वर्षांची हुकुमशाही राजवट आता संपुष्टात आल्याची घोषणा खुद्द सीरियाच्या लष्करप्रमुखांनी केली आहे. बंडखोर आता राजधानी दमास्कसपर्यंत पोहोचले असून राष्ट्राध्यक्ष असद यांनीही दमास्कसमधून पळ काढला आहे.
वर्ष सरता सरता मध्य-पूर्वेतील आणखीन एक देश - सीरिया हा अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलला गेला. आधीच गृहयुद्धामुळे उद्ध्वस्त झालेला आणि इराण-रशियाच्या कुबड्यांवर उभ्या असलेल्या सीरियातील असद राजवटीचा अस्त झाला आहे. तेव्हा, सीरियाचे भवितव्य आणि त्याचे एकूणच मध्य-पूर्वेमधील भूराजकीय परिणाम याचे आकलन करणारा हा लेख...
दमास्कस : सीरियातील बशर-अल-असद सरकारला देशातील बंडखोर गटांनी आव्हान दिले आहे. शनिवार, दि. ७ डिसेंबर रोजी दक्षिणेकडील दारा शहरावर त्यांनी ताबा मिळवला. मागील काही दिवसांमधील बंडखोरांनी कब्जा केलेले हे तिसरे शहर आहे. मध्य-पूर्वेतील देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे आता बशर-अल-असद यांच्यासाठी वाढता धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सीरियातील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल चिंतित भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांसाठी रात्री उशिरा एक सूचना जारी केली आहे. “पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांनी सीरियाला ( Syria ) जाणे पूर्णपणे टाळ
सीरिया मध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धाची धग आता तिथल्या नागरिकांच्या प्रवाशांना बसू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने आता तिथल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर भारतात परतण्याचे आवाहान केले आहे. त्याच बरोबर पुढील सूचना मिळेपर्यंत कोणीही सीरीयाला जाऊ नये असे आवाहन केले आहे.
सीरियामध्ये बशर अल असद यांची राजवट वाचवण्यासाठी इराण आणि रशिया कोणत्याही थराला जातील. दुसरीकडे ‘हयात अल तहरीर’ला यश मिळावे, म्हणून तुर्की प्रयत्नशील असून यात पाश्चिमात्य देशही मदत करु शकतात. गेल्या १४ वर्षांच्या यादवी युद्धामध्ये सीरिया होरपळला असला, तरी बशर अल असद स्वतःची खुर्ची सोडण्याची शक्यता तशी कमीच.
दमास्कस : सीरियामध्ये बंडखोरांनी पुन्हा डोके वर काढले असून, सीरियाची सुरक्षा दले आणि बंडखोरांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. गेल्या आठवड्यातच ‘तहरीर अल-शाम’ या ‘अल-कायदा’ या दहशतवादी गटांतून विभक्त झालेल्या गटाने सीरियाच्या अलेप्पोवर अचानक हल्ला करून या शहराचा ताबा घेतला होता. बंडखोर गटांच्या या हल्ल्यामुळे पुन्हा सीरियामध्ये युद्धसदृश ( Civil War ) परिस्थिती निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी या अतिशय गुंतागुंतीच्या असतात. इतिहासात घडलेल्या घटनांची सावली, वर्तमानातल्या घटनांवर पडलेली असते. अनेक देशांच्या उदाहरणातून हेच गृहितक सत्य असल्याचे प्रतीत होते. त्यातूनच निर्माण झालेल्या गुंतागुंतीतूनच संघर्षाची ठिणगी पडते. अशीच गुंतागुंत असलेल्या सायरसच्या सिलेंडरची माहिती या लेखातून घेऊया.
सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेला भारतीय समाज हा ‘इसिस-केपी’च्या रडारवर आहे. शिवाय, ‘इसिस-केपी’च्या इतर अतिरेकी गटांसोबतच्या युतीमुळे भारतीय हितसंबंधांवर हल्ले सुरू करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्याचबरोबर ‘आयएस-केपी’ प्रचार आणि भरतीसाठी करत असलेला सोशल मीडियाचा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे भारताला सायबर धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, ‘इसिस-केपी’द्वारे हिंदू समाजाविरुद्ध मुद्दाम पसरवण्यात येणारी चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांचा प्रसार सामाजिक विभाजन वाढवून आणि भारताच्या लोकशाही संस्थांस
युरोप, अमेरिकेसह जगभरातील देशांना बेकायदेशीर घुसखोरांच्या समस्येने ग्रासले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुणाकडेही ठोस योजना नाही. ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचे ठरवले, तर, युरोपियन युनियनने तुर्कियेला घुसखोर रोखण्यासाठी पैसे दिले. पण, याने काहीही साध्य झाले नाही. आता ब्रिटनने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रवांडा योजना आणली आहे. याच योजनेविषयीचे आकलन...
गायन, वाद्य यंत्रांचा आवाज अन् यावर थिरकणारा सहा हजार लोकांचा प्रेक्षक वर्ग. हे दृश्य होतं, मॉस्कोपासून अवघ्या २० किमी दूर असलेल्या क्रोकस सिटी हॉलचं. सर्वकाही सुरळीत चालू असताना अचानक क्रोकस सिटी हॉलमध्ये आगीचा आगडोंब उसळला. या आगीपासून वाचण्यासाठी हॉलमध्ये बसलेले लोकं बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतात. त्याचवेळी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला जातो. आपला जीव वाचवण्यासाठी लोकं मिळेल तो आसरा घेण्याचा प्रयत्न करतात. पण, चार हल्लेखोरांच्या बंदुकीपुढे त्यांचा निभाव लागणं कठीण. या हल्लेखोरांच्या गोळीबारात आतापर्य
फ्रान्सच्या नवीन कायद्यानुसार, परदेशातील इमामांना आता फ्रान्समध्ये धार्मिक शिक्षण देण्यासाठी प्रवेशबंदी असेल. इतकेच नाही, तर जे परदेशी इमाम आधीच फ्रान्समध्ये आहेत, त्या इमामांना परत त्यांच्या मायदेशी पाठविले जाईल किंवा देशातील छोट्या मशिदीमध्ये काही तरी काम दिले जाईल. पण, मुळात फ्रान्स सरकारला असा हा कायदा तयार करावासा वाटला, त्याचे कारणही जगजाहीर. ते म्हणजे, फ्रान्स हा युरोपमधील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो.
नुकतेच जॉर्डनच्या सैन्याने सीरियाच्या सीमेवर डझनभर ड्रग्ज माफियांना कंठस्नान घातले. सीरियामधून अमली पदार्थ घेऊन, जॉर्डनमार्गे ते आखाती देशात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यात जॉर्डनचा एक अधिकारी मृत पावला; पण हे पहिल्यांदाच घडले नाही. गेले दशकभर हे सुरूच आहे.
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून संपूर्ण जगाने सीरिया, लेबेनॉन आणि आफ्रिकेतील देशांमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. जागतिक राजकारणात खासकरून पाश्चिमात्य देश आपल्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधाला धक्का लागताच मानवाधिकाराच्या नावाखाली युद्धात उतरतात.
इस्रायल-हमास युद्धादरम्यान, अमेरिकन सैन्याने आज सकाळी पूर्व सीरियातील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डशी संबंधित दोन ठिकाणांवर हवाई हल्ले केले. याआधी गेल्या आठवड्यात सीरियामध्ये अमेरिकन सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि रॉकेट हल्ला झाला होता. त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने ही कारवाई केली.
अवघ्या ३२ किमीच्या या जोडणीमुळे एकीकडे तुर्कस्तान, सीरिया, रशिया, अझरबैजान, तर दुसरीकडे सौदी अरेबिया, कुवेत, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकस्तान एवढ्या विस्तृत प्रदेशातली अनेक व्यापारी शहरं बसरा आणि आबादानशी म्हणजेच इराणच्या आखाताशी किंवा पर्यायाने हिंदी महासागराशी जोडली जाणार आहेत.
२०११च्या सुमारास ट्यूनिशियापासून अरब क्रांतीचे वारे वाहू लागले. ट्यूनिशिया, सीरिया, लिबिया, इजिप्त, येमेन, बहारीन यांसारख्या अरब देशांत हुकूमशाही, भ्रष्टाचारी राष्ट्रप्रमुखांविरोधात आक्रोशित जनताच बहुसंख्येने रस्त्यावर उतरली. सत्ताधीशांना जनशक्तीने उलथवून लावत बर्याच देशांमध्ये सत्तांतरही झाले. या अरब क्रांतीला एक दशक उलटल्यानंतर सध्या आफ्रिकेतही अशीच एक क्रांती ठिणगीतून वणव्याचे स्वरूप घेताना दिसते. फक्त फरक एवढाच की, अरब क्रांती ही लोककेंद्री होती, तर आताची आफ्रिकन क्रांती ही त्या-त्या देशातील लष्कर प्रम
फ्रान्समध्ये लहान मुलांवर अज्ञातांकडून चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोर हा सीरियाचा निर्वासित असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना फ्रान्सच्या फ्रेंच आल्प्समधील अॅनेसी शहराची आहे. या हल्ल्यात ज्या मुलांना लक्ष्य करण्यात आले ते एका उद्यानात खेळत होते. दरम्यान मुलांवर उपचार सुरू आहेत. तसेच हल्लेखोराला ही अटक करण्यात आली आहे.
अरब देशांचा लाडका मानला जाणारा देश सीरिया आता पुन्हा अरब लीगमध्ये सामील झाला आहे. २०११ साली लोकशाही समर्थकांवर दडपशाही केल्याने सीरियाला अरब लीगमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. परंतु, एक दशकानंतर सीरियाची पुन्हा घरवापसी झाली आहे. शुक्रवार, दि. १९ मे रोजी सौदी अरेबियात अरब लीगची ३२वी बैठक पार पडली. त्यात सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांनी बैठकीत सहभाग घेत पश्चिमी राष्ट्रांवर प्रहार केले. अरब जगतातील या बदलांचे भविष्यात मात्र, अनेक दूरगामी परिणाम होतील. मध्य पूर्वेतील राजकारण वेगाने बदलत असताना अरब ल
क्रूरपणे हिंसा करून ‘इसिस’ने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. कारण, अशीच हिंसा पसरवून त्यांना त्यांचे इस्लामिक राज्य जगावर प्रस्थापित करायचे आहे. लोकशाही व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही. लहान मुले-स्त्रिया यांना बंदी बनवणे, ठार करणे, काफिरांचे गळे कापणे, लहान मुलांना दहशतवादाचे प्रशिक्षण देणे, त्यांना शस्त्रे देऊन त्यांना हत्या करायला लावणे, अशा अनेक राक्षसी बाबी ‘इसिस’शी जोडलेल्या आहेत. भारतात सुद्धा त्यांच्या छुप्या कारवाया काही प्रमाणात चालल्या होत्या. पण, सुरक्षा यंत्रणांनी वेळीच त्यावर कारवाई करुन त
चीन मात्र व्यापार आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून जगाला जवळ आणत आहे, हा चीनचा संदेश फसवा आहे. यात जगात शांतता नांदण्यापेक्षा अमेरिकेचे नाक कापून चीनच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याचा उद्देश आहे. शी जिनपिंग यांनी आपला शांततावादी हात पुढे केल्याने अमेरिकेच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
मानव हे आपल्या लाडक्या वसुंधरचे अपत्य आहे. पण आजवर याच मानवाने विकासाच्या गोंडस नावाखाली वारंवार आपल्याच जन्मदात्रीवर मात करण्याचा उन्मत्तपणा केला. त्याचा परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीला भोगावा लागत आहे. भूकंप, त्सुनामी, महापूर, दुष्काळ यासह येणार्या सर्व नैसर्गिक आपत्ती निसर्गाच्या व्यवस्थेत होत असलेल्या मानवी हस्तक्षेपाचा परिणाम आहे, त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप...
तुर्कस्तान आणि सीरिया हे दोन देश विनाशकारी भूकंपातून सावरत असतानाच भारतातही उत्तराखंडमध्ये मोठा भूकंप होऊ शकतो, असा इशारा राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन (एनजीआरआय) या संस्थेने दिला आहे.
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत तुर्कीमधील भूकंपग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) शेवटचे पथक भारतात परतले आहे.
भारताचा आत्मविश्वास बळावला असून, आता जगाच्या कोणत्याही कोपर्यात नैसर्गिक संकट आले असता सर्वांत पहिले मदत पाठवणार्या देशांमध्ये भारताचे नाव घेतले जाते. तुर्की आणि सीरियामधील भूकंपानंतर भारताच्या या ताकदीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात 50 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. या भूकंपात आतापर्यंत 28 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे तुर्कस्तान आणि सीरिया यांचे म्हणणे आहे.
गुजरात सूरतमध्ये ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाचे धक्के बसले आहेत. दि. १० फेब्रुवारी रोजी हे भूंकपाचे धक्के बसले. इन्स्टिटयूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च या संस्थेने ही माहिती दिली आहे. या भूंकपाचा केंद्रबिंदू सुरतच्या पश्चिम -नैऋत्येस सुमारे २७ किमी अंतरावर, भूपृष्ठापासून ५.२ किमी खोलीवर होता. यात शहर पुर्णपणे सुरक्षित असून शहराला कोणताही धोका नाही.तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
माध्यमांच्या वाढत्या स्पर्धेत सतत अग्रेसर राहण्याच्या प्रयत्नात बीबीसी या वृत्तसंस्थेकडून वारंवार आगळीक केली जात आहे. देशांतर्गत तसेच परदेशातही बीबीसीची झपाट्याने घसरत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याऐवजी बीबीसीने वादग्रस्त विषयांना मुद्दामच हाती घेतले आहे. त्यामुळे बीबीसीला तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे.
तुर्कस्तान, सिरियातील विनाशकारी भूकंप बळींची संख्या आता तब्बल २५ हजारांवर पोहोचली आहे. याशिवाय, जखमी झालेल्या नागरिकांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. तर, मृतांच्या संख्येतही आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जसजसे दिवस उलटत आहेत तसतशी ढिगार्याखाली जिवंत व्यक्ती सापडण्याची आशा मावळत चालली आहे. तुर्कस्तानशिवाय युद्धग्रस्त सीरियात ३,३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
तुर्की आणि सीरिया या दोन देशातच नव्हे, तर आसपासच्या मोठ्या क्षेत्रात दि. ६ फेब्रुवारीला सोमवारी भूकंपाचे दोन मोठे म्हणजे ७.८ आणि ७.५ रिश्टर तीव्रतेचे धक्के बसले. या भूकंपाचे केंद्र तुर्कीतील गाझियानटेप हे शहर होते. भूकंपाचा केंद्रबिंदू १८ किमी खोलवर होता. या मोठ्या धक्क्यांसह काही तासांतच अल्प तीव्रतेचे ७५ पेक्षा जास्त धक्के बसल्यामुळे दूर अंतरावरील सायप्रस (४५६ किमी), लेबेनॉन (८७४ किमी), इस्रायल (१३८१ किमी), इजिप्त (१४११ किमी) आदी देशांचाही परिसर हादरला. पण, तुर्की आणि सीरिया या देशात झालेली वित्त आणि जीवि
दोन दिवसांच्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या वगाचा ओझरता आढावा या लेखात घेतला आहे. वाचकांनी त्यावरून मुस्लीम मराठी साहित्याकारांच्या मनात डोकावण्याची संधी घ्यावी. मी तर म्हणेन की दोन समाजांमधील वैचारिक दुरी कमी करण्यासाठी हिंदूंनी मराठी मुस्लीम संमेलनांना उपस्थित राहावे.
तुर्कस्तान आणि सीरियात झालेल्या अत्यंत भीषण आणि विनाशकारी भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला. या भीषण भूकंपात तब्बल १६हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. जगभरातील देशांनी एकजुटतेचे दर्शन घडवत सीरिया आणि तुर्कीला मदत पाठवण्यास सुरूवात केली आहे. जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाल्यानंतर तुर्कीचा मित्र पाकिस्तान तरी मागे कसा राहील म्हणा. परंतु, पाकिस्तानने नेहमीप्रमाणे माती खात या संकटकाळातही संधी शोधण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली.
तुर्कस्तानला गेल्या २४ तासांत पाच वेळा भूकंपाचा धक्का बसला असून, त्यात सहा हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला, तर ढिगार्यांखाली अडकलेल्यांची संख्या हजारोंवर असल्याने मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरिया मध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आम्ही सीरियाच्या नागरिकांच्या दुःखात सहभागी आहोत आणि या कठीण परिस्थितीत सर्वतोपरी साहाय्य आणि पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
भारताकडून इस्रायलमधील हैफा बंदर विकत घेण्यामागे सामरिक नियोजन आहे, हे उघड आहे. इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. इस्रायलच्या हैफा बंदराशेजारीच असलेले कंटेनर टर्मिनल चिनी कंपनीच्या देखरेखीखाली आहे ही गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे.
दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीमध्ये ‘एकटी’ मुलगी अथवा मुलींच्या समुहास प्रवेशबंदीचा नवा फतवा मशिद व्यवस्थापनाने जाहिर केला आहे. दरम्यान, हा प्रकार म्हणजे भारताचा सिरिया बनविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केला आहे.
तुर्की समर्थित लढाऊ सैनिकांच्या ताब्यात असलेल्या उत्तर-पश्चिम सीरियातील अजाज शहरात मंगळवारी झालेल्या रॉकेट हल्ल्यात पाच नागरिक ठार आणि पाच जण जखमी झाले. यात एका बालकाचादेखील समावेश आहे. यापूर्वी रविवारीसुद्धा तुर्कीने सीरिया आणि इराकमधील काही भागांवर हवाई हल्ले केले होते. या हवाई हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. या हवाई हल्ल्यानंतर सीरिया आणि इराकमधील जवळपास 89 सैन्य ठिकाणे उद्ध्वस्त करण्याबरोबरच ‘YPG/PKK’च्या 184 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपा
राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा काही परस्पर संबंध आहे का? संविधानात हे शब्द शोभेसाठी आलेले नाहीत. या दोघांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे.
‘इसिस’चा प्रमुख अबू बकर हा २०१९ रोजी अमेरिकी कारवायांत असाच मेला. त्यानंतर ‘इसिस’ संपली, असे काही लोकांना वाटले. मात्र, त्याच काळात अबू इब्राहिमने ‘इसिस’च्या दहशतवादी कारवाया सुरू केल्या. सीरियाच्या सीमेवर नागरिकांवर हल्ले करणे, इस्लामिक राज्य आणू, अशा वल्गना करणे सुरू केले आणि मग अबू इब्राहिम ‘इसिस’चा स्वयंघोषित म्होरक्या झाला.
अफगाणिस्तानवर तालिबानच्या प्रतिकूल अधिग्रहणाबद्दल बरेच काही सांगितले आणि लिहिले गेले आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्या घाईघाईने बाहेर पडण्यापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबानच्या आक्रमणाच्या वेगाने ‘नाटो’च्या मित्रांना आश्चर्यचकित केले होते. काबूलच्या पराभवामुळे भू-राजकीय समीकरणांमध्ये ऐतिहासिक बदल झाला...
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ‘कलम 370’ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय भारताने घेतला आणि पाकिस्तानने थयथयाट सुरू केला. गेली दोन वर्षे पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे.