केंद्र सरकारने खलिस्तान्यांशी संबंधित १० हजार ५०० हून अधिक युआरएल ब्लॉक केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजमाध्यमे आणि इंटरनेटवर पसरवलेला खलिस्तानी प्रचार रोखण्यासाठी गेल्या ३ वर्षांत ही कारवाई केली आहे.
Read More
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) पदाधिकारी रुद्रेश यांच्या हत्येचा आरोपी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) दहशतवादी मोहम्मद गौज नियाझी यास दक्षिण आफ्रिकेतून अटक केली आहे.
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या पक्षकारांपैकी एक असलेले आशुतोष पांडे यांना पाकीस्तानातून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. आशुतोष पांडे यांनी असा आरोप केला आहे की, त्यांचा फेसबुक आयडी हॅक करण्यात आला आहे व त्यांना पाकीस्तानकडून धमक्याही देण्यात येत आहेत.
ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने बंदी घातलेल्या इस्लामिक संघटना PFI (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) च्या ५ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना संघटनेत वेगवेगळ्या पदांवर बसवण्यात आले. हवालाच्या माध्यमातून परदेशातून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी देशविरोधी कारवायांमध्ये वापरण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. डिसेंबर २०२० मध्ये पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी करताना सापडलेल्या तपशीलांच्या आधारे त्याची चौकशी करण्यात येत होती. हे सर्व आरोपी पीएफआयच्या बँक खात्यांवर सह्या करायचे.
कार्यशाळेच्या बहाण्याने विद्यार्थ्यांना मशिदीत नेणाऱ्या गोव्यातील एका खासगी शाळेच्या प्राचार्याला निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मशिदीत नमाज पठण करायला लावल्याचा आणि इतर इस्लामिक कृत्ये करायला लावल्याचा आरोप प्राचार्यावर आहे. मशिदीतील कार्यक्रमामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घातलेल्या कट्टरतावादी संघटनेचा हात असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेवर राज्याच्या शिक्षण विभागानेही शाळा व्यवस्थापनाकडून उत्तर मागितले आहे.
मध्य प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) नुकतेच हिज्ब-उत-तहरीर (HUT) कारवाई केली आहे. मध्य प्रदेश आणि तेलंगणामधील १६ लोकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. हिजबुल-उल-तहरीरमधील १६ जणांच्या अटकेबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जी माहिती समोर आली त्या माहितीच्या आधारे आरोपींची चौकशी केली जात आहे. तसेच आम्ही लव्ह जिहाद, धर्मांतर आणि त्यानंतर दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याच्या विरोधात आहोत. असे ही शिवराज सिंह चौहान म्हणाले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने १५ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. त्यातील नऊ विजयी झाले. पण, जनता दल (धर्मनिरपेक्ष) ने २२ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. पण, त्यातील एकही उमेदवार जिंकला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी मुस्लीम उमेदवार देऊनही असे नेमके काय घडले, हे यानिमित्ताने समजून घ्यायला हवे.
नुकतेच ‘एनआयए’ने पुण्यातील कोंढवा भागातील ‘ब्लू बेल’ शाळेतील दोन मजल्यांना ‘सील’ केले. या शाळेचा गैरवापर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेने युवकांना दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी केल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्यावर्षी दि. २२ सप्टेंबरला ‘एनआयए’ने या मजल्यांची तपासणी केली होती. आक्षेपार्ह कागदपत्रे, भारत सरकारविरोधी कारवाया, तसेच प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून युवकांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी या जागेचा वापर केला गेला. त्यानिमित्ताने...
केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट सरकारने अखेर उच्च न्यायालयाच्या बडग्यानंतर बंदी घातलेल्या मुस्लीम कट्टरतावादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कट्टरतावादी सदस्यांची संपत्ती जप्त केली आहे.
२०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र रचल्याचा खुलासा पाटण्यातून पर्दाफाश केलेल्या ‘दहशतवादी नेटवर्क’मधून उघड झाला आहे.
कोणताही मुस्लीम पुरुष तीन स्त्रियांशी ‘निकाह’ करू शकत नाही, असे सुनावतानाच आसामी मुस्लीम आपल्या म्हणण्याला पाठिंबा देत असल्याचे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केले आहे.
काशीमधील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील शाही ईदगाहविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका प्रार्थनास्थळ कायद्याचा भंग करणार्या आहेत. त्याविषयी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अतिशय निराशाजनक असून देशभरातील मुस्लिमांनी त्याचा निषेध करावा; अशा शब्दात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या मुस्लीम कट्टरतवादी संघटनेने चिथावणी दिली आहे.
वाराणसी येथील ज्ञानवापी ढाचा, मथुरा येथील शाही ईदगाह यांसारख्या हिंदू मंदिरे पडून उभारलेल्या मशिदीच्या विरोधात हिंदू संघटनानांनी न्यायालयीन मार्गाने आवाज उठवला आहे
केरळच्या पलक्कड जिल्ह्यात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एसके श्रीनिवासन (४५) या स्वयंसेवकाची शनिवारी (दि. १६ एप्रिल) रोजी हत्या करण्यात आली होती. त्याच्याशी संबंधित ७ आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून सोमावार, दि. २५ एप्रिल रोजी आणखी दोन आरोपींना अटक केल्याचे उघड झाले आहे. यातले बहुतांश आरोपी हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याची राजकीय शाखा असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चे कार्यकर्ते असल्याचे स्थानिक पोलिसांयाकडून सांगण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या या विजययात्रेमुळे केरळचे राजकारण ढवळून निघणार आहे. अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणार्यांनी, हिंदू समाजाची उपेक्षा करणार्या राजकीय पक्षांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जहाल धर्मांध संघटनेने भाजपच्या या विजययात्रेचा धसका घेतल्याचे दिसून येऊ लागले आहे.
‘पीएफआय’ संघटनेच्या देशविघातक कारवाया लक्षात घेता, त्या संघटनेचे कंबरडे वेळीच मोडून टाकण्याची आवश्यकता आहे. देशात अराजक माजविण्याचा प्रयत्न करणार्या अशा देशद्रोही संघटनेचे मनसुबे राष्ट्रवादी विचारांच्या जनतेने उधळून टाकायला हवेत.
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करण्याचा आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आज एका निवेदनाद्वारे सूफी उलेमांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आज केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन आपले निवेदन देणार असल्याची माहिती सकाळी ‘ऑल इंडिया तंज़ीम उलेमा ए इस्लाम’ या सूफी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष मुफ्ती अशफाक हुसैन कादरी यांनी दिली होती.