बाबरी मशिदीचे पुनर्निमाणाचे काँग्रेसचे दिवास्वप्न पूर्ण न होऊ देण्यासाठी मतदानाद्वारे राष्ट्रविरोधी षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा श्रीराम मंदिराचा निकाल फिरविण्याचा मनसुबा आहे, असा दावा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. त्यावर विहिंपचे आंतरराष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी काँग्रेसवर टिका केली आहे.
Read More
अयोध्येच्या धरतीवर श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य पुर्णत्वास येऊ लागले आहे. दि. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून या दिवशी श्रीरामलला मंदिरात विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक दिनी भारतभर उत्सव साजरा करण्याचे आवाहन श्रीराम जन्मभूमी न्यासकडून करण्यात आले आहे.
श्रीराम जन्मभूमी अयोध्येत २२ लाख २३ हजार लाख दिव्यांना प्रज्वलित करून गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ३० लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळून निघाली आहे. दीपोत्सव २०२३ द्वारे नवा विक्रम करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात प्रमाणपत्र स्वीकारले आहे.
भारतीय समाज रामनामाच्या माळेत गुंफला गेला आहे. भारतीय समाजाला धर्मश्रद्धा, नीती आणि संस्कृतीच्या एकतेमध्ये संमेलित करणार्या प्रभू श्रीरामचंद्राबाबत देशविघातक समाजद्वेष्ट्या लोकांना आकस असणारच. प्रभू श्रीरामचंद्रांचे माहात्म्य कमी करता येत नाही, म्हणून मग रावणाला महात्मा ठरवण्याचे उद्योग काही जण करतात. कामानिमित्त देशभर फिरताना असले उद्योग निधर्मी, डावे आणि मुख्यतः नक्षल समर्थकांकडून होताना पाहिले आहेत. रावण दहनानिमित्त, त्या सगळ्याचा घेतलेला हा आढावा...
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी अयोध्येत विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. “प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरास विरोध करणारे राज्यात यापूर्वी सत्तेत होते. मात्र, आज राम मंदिराचे बांधकाम थांबवून दाखविण्याची हिंमत कोणाचीही नाही,” असा टोला त्यांनी सपा, बसपा आणि काँग्रेसला लगाविला.
पुन्हा एकदा कारसेवा झाल्यास गोळीबार नव्हे, तर राम आणि कृष्ण भक्तांवर पुष्पवृष्टी होईल
प्रभू श्रीराम मंदिरावर टीका केल्याच्या निषेधार्थ मोर्चा
एखाद्या पवित्र धर्मकार्यात मुद्दाम विघ्न आणणं ही पुरातनकाळापासूनची असुरनीती. पण, सध्या अशाच काही विघ्नसंतोषी राजकारण्यांनी थेट श्रीराम मंदिर ज्या पवित्र भूमीवर उभे राहणार आहे, त्या जमिनीच्या व्यवहारांवरुन केलेले तथ्यहीन आरोप हे या कलियुगातील असुरी वृत्तीचीच साक्ष देणारे आहेत.
बदलापूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनिल पालये यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि दोन बहिणी, असा परिवार आहे.
कोरोना महामारीचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. परिस्थिती नियंत्रणात असली, तरी अद्यापही समाजजीवन पूर्वीसारखे १०० टक्के पूर्ववत झालेले नाही. अशा परिस्थितीत दि. १५ जानेवारीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान सुरू झाले. या अभियानाबद्दल सांगण्यापुरते हे निधी संकलन अभियान असले, तरी प्रत्यक्षात मात्र ते श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्राचा व्यापक विषय समाजात रुजवण्यासाठीचे जनसंपर्क अभियान होते. श्रीराम मंदिराचा विषय समाजातील प्रत्येक घटकापर्यंत
विश्व हिंदू परिषदेचा कल्याणमधील बैठकीत निर्धार
नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पाहता, त्यांच्या प्रत्येक देशहितैषी पावलाला मागे खेचण्याचे, अपशकुन करण्याचे प्रयत्न विरोधकांनी केले. आताच्या शेतकर्यांविषयक तीन विधेयकांबाबतही काँग्रेससह विरोधकांकडून अफवा पसरवण्याचेच काम सुरु आहे, पण शेतकरी लुटमार करणार्यांना साथ देणार्यांच्या नव्हे तर मोदींच्याच पाठीशी उभे ठाकतील, हे नक्की.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांच्याशिवाय ते अन्य विश्वस्तांशी राममंदिर बांधण्याबाबत चर्चा करू शकतात.
श्रीराम मंदिर संस्थान, रथोत्सव समिती आणि केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे २८ नोव्हेंबर रोजी कुस्त्यांची भव्य दंगल अभूतपूर्व जल्लोषात सागर पार्कवर दुपारी ३ ते रात्री ९ वाजेदरम्यान पार पडली.