नाशिक : आयाम, नाशिक आयोजित ‘गोदावरी ( Godavari ) संवाद २०२४’ गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड येथे रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. कर्णिक यांनी त्यांच्या मनोगतात डीप स्टेट आणि इतर विषय किती महत्त्वाचे आहेत, हे सांगितले. ते म्हणाले, “आपला समाज, संस्कृती, आर्थिक व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आयाम नाशिक असे कार्यक्रम घेऊन हा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. यानंतर ‘डीप स्टेट अॅण्ड वर्ल्ड ऑर्डर’
Read More
"मी २५ देशांत जाऊन आले पण त्या देशांतील त्यांच्या सगळ्या संस्कृती मृत बनल्या आहेत. त्यांना त्यांच्या संस्कृतीविषयी अजिबात जिव्हाळा उरलेला नाही. याउलट आपल्याकडे इतकी आक्रमणं झालेली असतानाही आपण आपल्या संस्कृतीला घट्ट चिकटून आहोत आणि ती संस्कृती आपण जिवंत ठेवली आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी त्याग केला असून तो जिवंत ठेवण्यासाठी मी हा यज्ञ पुढे नेत आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर शेफाली वैद्य यांनी केले आहे. शनिवार, २९ जून रोजी ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन सप्तरंग आयोजित 'सरस्वती पुरस्कार
‘हमास’च्या हल्ल्यापासून प्रेरणा घेत काही कट्टरतावादी पुन्हा एकदा ’काश्मीर हे मुस्लिमांचेच आहे,’ असे दाखवत इतर धर्मीयांना येथे स्थान नाही, असे दर्शविण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने अधिकृतपणे इस्रायलला पाठिंबा दिला असतानाही काही कट्टरतावादी ‘हमास’च्या प्रवृत्तीचे समर्थन करत आहेत. त्यात काँग्रेसची भूमिका ही पुन्हा एकदा विचार करण्यास्पद आहे. त्यातच आता काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील हिंदू आणि शीख बांधवांच्या घरावर ‘घर सोडून चालते व्हा, अन्यथा परिणामांना सामोरे जा’ असा धमकीवजा इशारा कट्टरतावाद्यांनी दिल्याचे समोर
मुंबई : संजय राऊतांच्या खालच्या पातळीवरील टीकेला सर्वच स्तरावरुन टीकेची झोड उठविली गेली. राजकीय नेत्यांनीदेखील त्यांच्या वकतव्याचा समाचार घेतला. लेखिका शेफाली वैद्य यांनी एक विडंबन कविता पोस्ट केली आहे. त्यांनी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या वकतव्याचा समाचार कवितेच्या माध्यमातून घेतला आहे. त्यांनी एका राजकीय पक्षाचा थूंक टँक म्हणत राऊतांवर एक वात्रटटिका केली आहे. दरम्यान, लेखिका शेफाली वैद्य या राजकीय प्रश्नांवर नेहमीच भाष्य करतात.
मुंबई : कालच्या त्या दिल्लीच्या विडीयोने हादरून गेलेय मी. अजून ते दृश्य नजरेसमोरून हटत नाही. तीस-चाळीस वेळा साहिल सर्फराझ नावाचा नराधम साक्षी नावाच्या फक्त सोळा वर्षांच्या मुलीला भोसकतो, भर रस्त्यात. त्यानंतर तिला लाथेने तुडवतो आणि इतके करूनही समाधान झाले नाही म्हणून एक मोठा दगड उचलून तिच्या डोक्यात हाणतो, एकदा नाही, दोनदा, तीनदा.
‘चितरंगी रे’ आणि ‘नित्य नूतन हिंडावे’ या दोन्ही पुस्तकातील सगळे लेख अशा वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेले आहेत. दोन्ही पुस्तकं एकत्र वाचताना एक अंतरंगाचा प्रवास करणारा आणि एक बहिरंगाच्या प्रवासाची अनुभूती देणारे पुस्तक अशीच याची ओळख सार्थ होईल. वाचनाची आवड असणार्या प्रत्येकाने वाचायला हवीत अशीच ही पुस्तकं आहेत.
’‘समाजमाध्यमांमुळे पत्रकारिता क्षेत्रातील काही माध्यमांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. बातमी कुठली द्यायची आणि कशाप्रकारे द्यायची, हा ‘नॅरेटिव्ह’ ‘सेट’ करण्याचा या माध्यमांचा प्रयत्न समाजमाध्यमाने उघडा पाडला आहे. तुम्ही कुणाच्या बाबतीत बोलला नाहीत, तर मग तुमच्या बाबतीत कोण बोलणार? त्यामुळे आपल्याला जे वाटतं त्यासाठी भूमिका घेतलीच पाहिजे,” असे आवाहन लेखिका शेफाली वैद्य यांनी उपस्थितांना केले. ‘लोकमान्य सेवा संघा’च्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विलेपार्ले येथील ‘लोकमान्य सेवा संघ’ येथे शनिवार, दि. 3 डिसेंबर
नवभारताच्या निर्मितीसाठी युवकांनी इतिहासाच्या बरोबरीने साहित्य, लोककला, वास्तुशिल्प यासारख्या आदि बाबींचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याची गरज आहे, असे मत लेखक आणि इतिहासकार डॉ. विक्रम संपथ यांनी आज येथे व्यक्त केले. डॉ. संपथ यांच्या ब्रेव्हहार्टस ऑफ भारत व्हीग्नीटीज फ्रॉम इंडियन हिस्ट्री या पुस्तकाचे प्रकाशन चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक संचालक आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांना अश्लील आणि अभद्र भाषा वापरून धमकावणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या मुसक्या सोलापूर पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी आवळल्या.
मी स्पष्ट बोलते. स्पष्ट लिहीते. टीकेला कधीच घाबरत नाही. सभ्य शब्दात प्रतिवाद करणाऱ्या कुणालाही मी आजवर ब्लॉक केलेलं नाही की अश्या कॉमेंट डिलीट केलेल्या नाहीत हे माझी वॉल फॉलो करणारी कुणीही व्यक्ती सांगेल. स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पाईक समजणाऱ्या काही तथाकथित विचारजंत लोकांसारखे मी कॉमेंटसही कधी ऑफ करून बंद दाराआड तलवारी फिरवत नाही. ही विचारांची लढाई मी जाणीवपूर्वक लढतेय आणि लढाई म्हटली की दोन घाव देणे आले, घेणे आले, त्याला कधीच माझी ना नव्हती.
कर्नाटकमधील एका महाविद्यालयाने काही विद्यार्थिनींना हिजाब घातल्यामुळे काही दिवसांपूर्वी प्रवेश नाकारला होता.खरेतर महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही धर्माचे प्रतिनिधीत्व करणारे वस्त्र धारण करू नये असे सांगितले होते. कारण यावरून महाविद्यालयाच्या आवारात हा निर्णय घेण्यापूर्वी याचसंदर्भातील वाद विद्यार्थ्यांमध्ये झाले होते.हिंदू विद्यार्थ्यांना 'भगवे स्कार्फ ' घालण्यासाठीही नकार दिला होता. परंतु काही विद्यार्थिनींना हि बाब आवडली नाही आणि त्यांनी 'हिजाब' घालणे हा आमचा मौलिक अधिकार आहे असे म्हणत न्
"प्रसन्न जोशी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल काय वाटतं?"
"दै. मुंबई तरुण भारत" आणि "साप्ताहिक विवेक" आयोजित 'पश्चिम बंगाल ते पंढरपूर : मराठी वेबपोर्टलवरील पहिली मॅरेथॉन महाचर्चा!'मध्ये व्यक्त केली भीती
'तनिष्क'या टाटा उद्योगसमूहाच्या दागिनेविक्री व्यवसायाची 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देणारी जाहिरात वादाचा विषय ठरते आहे. देशभरातील हिंदूंनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यावर तनिष्कने ही जाहिरात मागे घेतली. परंतु त्यानंतर हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्यांनी हिंदुत्ववादयांना खिजवण्यासाठी 'ट्विटर'-'फेसबुक'वर फेक बातम्या प्रसारित करण्याची सुरवात केली होती. मात्र, वस्तुस्थिती समोर आणून कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर आता हिंदुत्वविरोधक स्वतःच्या पोस्ट-ट्विट डिलीट करू लागले आहेत.
ट्विटरवर सुनावले खडेबोल
ईदच्या दिवशी शाहकारी बना असे बॅनर लावून दाखवा !
सोशल मीडियावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या शेफाली वैद्य यांनी या कुटुंबासाठी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून निधी उभारण्याचे ठरविले आणि त्यांना प्रतिसाद देणाऱ्यांनी ३० लाखाहून अधिक रक्कम क्राउड कॅशच्या माध्यमातून उभी केली.
स्वरा भास्कर ही अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे तर जगप्रसिद्ध आहेच मात्र त्याहीपेक्षा जास्त वादग्रस्त विधानांमुळे चर्चित आहेत. दरम्यान भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर निवडणुकीत महा पनौती हा पुरस्कार कोणी जिंकला असा प्रश्न पुण्यातील सुप्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.
प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नाही. प्रश्न संघाचे निमंत्रण आदरपूर्वक स्वीकारणाऱ्या पण वेगळ्या विचारधारेच्या लोकांच्या संघकार्याच्या आकलनाचाही नाही.
पहा, गोवा आणि त्याची समीक्षा शेफाली यांच्या अनुभवातून...
आज आपण जे शिल्प बघणार आहोत ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर आहे. हे शिल्प आहे भिक्षाटन शिवमूर्तीचे.
मुळात श्रीलक्ष्मीची लक्ष्मी-नारायण किंवा गजलक्ष्मी ह्या स्वरूपात अंकन केलेली शिल्पे खूप ठिकाणी आढळतात, पण नृत्यमग्न लक्ष्मी त्यामानाने दुर्मिळ.
काश्मीरमध्ये एप्रिल महिन्यात भारतीय सैन्याचे अधिकारी मेजर लिथुल गोगोई यांनी आपल्या एका मिशनचा भाग म्हणून एका काश्मिरी दगडफेक्याला आपल्या जीपच्या बॉनेटवर बांधून फिरवले आणि १२०० लोकांच्या हिंसक जमावाने वेढलेल्या एका पोलिंग बूथमध्ये शिरकाव करून तिथे अत्यंत