Khokya Bhosale बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणाचा व्हि़डिओ काही दिवसांआधी व्हायरल झाला. त्यानंतर फोटोच दिसणाऱ्या आरोपींची माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा विश्वासू असलेल्या वाल्मिक कराडला मुख्य गुन्हेगार ठरवले आहे. यानंतर आता बीडमधील गुन्हेगारांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे खोक्या भोसलेच्या पोलिसांनी प्रयागराजमध्ये मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्याचे अनधिकृत बा
Read More
(Bajrang Sonwane Press Beed ) बीडमध्ये दिवंगत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देत ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला. त्यावेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख यांची हत्या होत असताना लाईव्ह पाहिली जात होती, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच आरोपींच्या मोबाईल फोन्सची सिडिआर चौकशी व्हावी अशी देखी
(Suresh Dhas Massajog ) बीडमधील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. मात्र आता आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी जाऊन भेट दिल्यानंतर मस्साजोग मधील ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
(Suresh Dhas) आमदार सुरेश धस यांनी शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी बीड येथील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. याचदरम्यान सुरेश धस यांनी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. मस्साजोग ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यानंतर त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
(Beed Case ) बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड प्रकरणात आता पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी करण्यात आली आहे.
(Santosh Deshmukh) संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सहा संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. परंतु न्यायालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यांना न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित करण्यात येण्याची शक्यता आहे.
(Beed Case) बीड प्रकरणात सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सरकारी वकिलांकडून आरोपींच्या एसआयटी कोठडीची मागणी करण्यात आली होती. या मागणीला आरोपींच्या वकीलांनी जोरदार विरोध केला. अखेर न्यायमूर्तींनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
: (Walmik Karad) बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणांमधील संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणीच्या तपासासाठी १ जानेवारीला स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे.
(Saundana Sarpanch Accident) बीडच्या केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहे. अशातच आता बीडमधीलच परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका सरपंचाला उडवल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्देवी घटनेत सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या भीषण अपघातात क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
(Vishnu Chate) बीड सरपंच संतोष देशमुख ह्त्या आणि अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणांमध्ये अटकेत असणाऱ्या संशयित आरोपी विष्णू चाटेला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ जानेवारी रोजी त्याला केज न्यायालयाकडून २ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. दोन दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपल्याने आरोपी विष्णू चाटेला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
(Vishnu Chate) बीड हत्येप्रकरणी विष्णू चाटेला शुक्रवार दि. १० डिसेंबर रोजी खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती. मात्र विष्णू चाटेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणी ताबा मिळवण्यासाठी एसआयटीने रीतसर अर्ज केला होता. त्यासंदर्भातील सुनावणीकरिता आज त्याला पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी वकीलांकडून विष्णू चाटेच्या सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली असून विष्णू चाटेला २ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
(Vishnu Chate) विष्णू चाटेची ४ दिवसांची वाढीव कोठडी संपली असून आता त्याला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात संशयित आरोपी विष्णू चाटे याला केज न्यायालयात दाखल करण्यात आले होते. केज न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केलेली आहे.
(Krishna Andhale) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. याचदरम्यान संतोष देशमुखांच्या भावाकडून लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी तसेच सरपंच देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अश्या मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात येत आहेत. आज आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच देशमुखांच्या हत्येविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोठा जनसमुदाय एकवटलेला दिसून आला.
( Beed Case ) बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असताना आता बीड पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हवेत गोळीबार करून त्याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोळीबार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत ७४ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यामध्ये कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली आहे.
(Dhananjay Munde) अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात हजर झालेले आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यांची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. अशातच मंत्रिमंडळ बैठकीआधी त्यांनी प्रसारमाध्यमांना राजीनाम्यावरून प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, "मी काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही", असे त्यांनी स्पष्ट केले.
(Dhananjay Munde) बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी व सत्ताधारी आमदारांकडून केली जात आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप करण्यात येत आहेत. यासंदर्भात आमदार धसांकडून होणाऱ्या आरोपांवर मंत्री मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी सिद्धार्थ सोनवणे याला मुंबई येथून अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना केज येथील न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १८ जानेवारीपर्यंत 'सीआयडी' कोठडी सुनावली आहे.
(Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी ३१ डिसेंबरला पुणे सीआयडी मुख्यालयात शरण आला. शरणागतीनंतर सायंकाळी त्याला पुणे पोलिसांनी केज पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर रात्री उशिरा कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयातील युक्तिवादानंतर त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
(Sudarshan Ghule) सीआयडीच्या कारवाईनंतर खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना मंगळवारी ३१डिसेंबरला सीआयडीच्या पुणे मुख्यालयात शरण आला. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याची सीआयडी चौकशी सुरू आहे. मात्र मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुदर्शन घुले हा शरण येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(Walmik Karad) खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता, अशी माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे.
(MLA Suresh Dhas) अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. "प्राजक्ता माळींबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. कुणाचेही मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो", असे सुरेश धस म्हणाले.