साई रिसॉर्ट प्रकरणी उबाठा गटाचे नेते अनिल परब यांना अटक होणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. ते सोमवारी अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणाच्या कारवाईबाबत पाठपुरावा करण्यासाठी रत्नागिरीमध्ये होते. यावेळी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी अनिल परब यांना अटक होणार असल्याचे म्हटले आहे.
Read More
आम्ही मुलूंडचं मुंब्रा होऊ देणार नाही! PAP हटाव मुलूंड बचाव! मुलूंडकरांचा एकच नारा PAP ला नाही थारा, या आशयाचे फलक घेऊन नारेबाजी करत काही नागरिक रविवार, दि. १० डिसेंबर रोजी मुलूंड, पूर्व येथे जमले होते. मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकारने २२ मार्च २०२२ रोजी ईस्ट पुणे रियालिटी एलएलपी कंपनीचे चोरडिया आणि स्वास कन्स्ट्रक्शन या कंपनीला मुलुंड येथील केळकर कॉलेजच्या जवळ असणाऱ्या एका जागेवर ७४३९ सदनिका बांधण्याचे कंत्राट देण्यात आलं. मात्र या प्रकल्पातून एक मोठा घोटाळा घडल्याचे आरोप तिथल्या स्थानिक नागरीकांनी, रहिवा
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने ३ डिसेंबर २०२१ रोजी दिले होते. मात्र, त्यावर स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता ते रिसॉर्ट पाडण्याचं काम या सरकारमध्ये होणार असल्याचं सोमय्यानी म्हटलंय. अनिल परब यांनी हे रिसॉर्ट नियमांचे उल्लंघन करून बांधल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर हे तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आले. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सोमय्यांनी केली होती.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात असलेले साई रिसॉर्ट प्रकरण चर्चेत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमंक काय घडतं? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातच आता एकीकडे दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश अनिल परब यांना सत्र न्यायालयाने दिले आहेत. तर दुसरीकडे खिचडी घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलायं.तसेच रवींद्र वायकरांवर ही ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे या तिन्ही घटनांचा वेध घेत आज आपण साई रिसॉर्ट प्रकरण, खिचडी घोटाळा, पंचतारींकित हॉट
साई रिसॉर्ट (Sai Resort) प्रकरणी ब्रेकींग अपडेट; किरीट सोमय्यांनी केली अनिल परबांची पोलखोल!
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपी सदानंद कदम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सदानंद कदम हे माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्ती आहेत. कदम हे सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये कैद आहेत.
दापोलीतील साई रिसॉर्ट आणि तेथील अनधिकृत बांधकामावरून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा समोर आले आहेत. सोमय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर नव्याने आरोप केले असून परबांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून हे रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला आहे.
साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. सोमवारपर्यंत परब यांना अटक करू नका, असे आदेश कोर्टाने ईडीला दिले आहेत. दोनदिवसांपूर्वी दापोलीतील साई रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर परब यांनी कोर्टात धाव घेतली होती. काही तासांपूर्वीच, जयराम देशपांडे अटक करण्यात आली आहे.
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांचे सहकारी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले. यानंतर परब यांनी प्रतिक्रीया देत माजी खासदार किरीट सोमय्यांच्या विरोधात हक्कभंगाची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषद उपसभापती यांच्याकडे ही मागणी केली आहे.
बांधकाम व्यावसायिक आणि अधिकारी यांच्या संगनमताने उभे राहिलेले भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेले ट्वीन टॉवर्स रविवारी दुपारी जमीनदोस्त करण्यात आले
निवडून येण्याची क्षमता नसून देखील केवळ उद्धव ठाकरेंच्या गुडबुक्समध्ये असल्याने मागच्या दाराने विधानभवनात दाखल झालेले अनिल परब आज आहेत कुठे? कधीकाळी शिवसेनेतर्फे कायद्याचा किल्ला लढवणारे परब स्वतःच कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने तोंडात मिठाची गुळणी भरून गप्प राहिलेत का? हे सगळे प्रश्न उपस्थित होतात कारण संजय राऊतांना अटक झाली तेव्हा परब गप्प राहिले. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत ते कुठेही दिसले नाहीत. हाल्ली उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला देखील अनिल परब दिसत नाहीत तिथे राष्ट्रवादीतून सेनेत आयात केलेले सचिन
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांनी सोमवारी (दि. ३० मे) ईडी कार्यालयात हजेरी लावली. अनिल परब यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर शुक्रवार, दि. २७ मे रोजी संजय कदम यांच्याही मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याचे समन्स ईडीने कदम यांना बजावले होते. या पार्श्वभूमीवर कदम हे ईडी कार्यालयात पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार? असा प्रश्न सध्या उद्भवतो आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर तीन दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत काही कागदपत्रे ताब्यात घेतले होते. मुंबईसह पुणे आणि मुरुड येथेही ईडीने धाडी टाकल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी ईडीचे पथक दापोलीत दुसऱ्यांदा पोहोचले आहे. यावेळी ईडीने मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.