मराठी रंगभूमीवरील दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण नाटकांचा सोहळा रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी दि. ६ मे पासून १६ मे पर्यंत दादरच्या छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे पार पडणार आहे.
Read More
(Inspection in Vasai under the leadership of local MLA Sneha Dubey Pandit) वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार तसेच विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई विधानसभा क्षेत्रातील नाल्यांची व विविध विकासकामांची पाहणी केली.
विशेष मुलांच्या आयुष्यात आनंद खुलवण्यासाठी झटणार्या निर्वाणा स्कूलमधील लक्ष्मी विनायक लेले यांच्याविषयी...
( Stratospheric airship test successful ) ‘भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटने’ने (डीआरडीओ) शनिवार, दि. 3 मे रोजी मध्य प्रदेशातील श्योपूर चाचणीस्थळावरून ’स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्म’ची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली. हे एअरशिप ‘डीआरडीओ’च्या आग्रा येथील ‘एरियल डिलिव्हरी रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ (एडीआरडीई)ने विकसित केले आहे. हे एअरशिप 17 किमी उंचीवर इंस्ट्रुमेंटल पेलोडसह प्रक्षेपित करण्यात आले. हे विमान 62 मिनिटे उडाले. यानंतर टीमने सिस्टम यशस्वीरित्या पुनर्प्राप्त केली.
‘अधारणीय शारीरिक वेग’ या लेखमालेच्या श्रृंखलेतील पुढील वेग हा उद्गार आहे. उद्गार याचा अर्थ ढेकर. ढेकर जेव्हा येते, तेव्हा ते थांबवू नये. आजच्या लेखातून ढेकर या संवेदनेबद्दल अधिक जाणून घेऊया.
(Pakistani ISI Spy Arrested) पाकिस्तानच्या 'आयएसआय' (ISI) साठी हेरगिरी करणाऱ्या पठाण खानला राजस्थानच्या जैसलमेरमधून अटक करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर वाढलेल्या हालचाली आणि पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. अशातच आता भारतीय गुप्तचर विभागाच्या प्रयत्नांना यश आले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
(Create in India Challenge - CreatoSphere at WAVES 2025) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आज म्हणजेच गुरुवार दि. १ मे पासून सुरू झालेल्या चार दिवसीय जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (WAVES 2025) अंतर्गत प्रमुख उपक्रम म्हणून सुरु करण्यात आलेल्या 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'च्या (सीआयसी) पहिल्या पर्वाची अंतिम फेरी होणार आहे. 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'साठी जवळपास एक लाख सहभागींच्या नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. या चॅलेंजसाठी साठहून अधिक देशांमधून प्रवेशिका आल्या आहेत. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ७५० स्पर्धक
अक्षय्य तृतीया, हिंदु धर्मातील एक पवित्र आणि शुभ सण मानला जातो. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करुन संपूर्ण घर स्वच्छ केले जाते. देवाची पूजाही केली जाते. दाराला सुंदर तोरण घराबाहेर सुबक रांगोळी काढली जाते.
prosperity journey of Nashik उद्योग आणि कृषी क्षेत्राचा उत्तम मिलाफ साधत मुंबई, पुण्यानंतर नाशिक वेगाने आपला विकास साधत आहे. इथल्या ग्रामीण भागानेही चांगलीच कात टाकायला सुरुवात केली असून द्राक्षे, टोमॅटो आणि कांदा पिकाने शेतकरी वर्गाला आर्थिक समृद्ध केले, तर मधल्या काळात आलेल्या अनेक उद्योगांनी नाशिकच्या विकासाची चाके गतिमान केली.
India towards prosperity
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
Publication of 3 volumes of Dr. Babasaheb Ambedkar Janata newspaper मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या जनता वृत्तपत्राच्या खंड७,८,९ सह इंग्रजी खंड 4चे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड २ च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन केले.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्पायवेअर वापरण्यात काहीही गैर नाही, परंतु खाजगी व्यक्तींविरुद्ध त्याचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी केली जाईल; असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले आहे.
(Governor inaugurates refurbished Aditya Jyot Eye Hospital) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी वडाळा, मुंबई येथील नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यावेळी आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. एस. नटराजन, डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अग्रवाल, मुख्य धोरण अधिकारी डॉ. वंदना जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे डॉ
( Special precautions in Mumbai after Pahalgam attack ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. “मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे,” अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे.
( mumbai public transport concluded ) मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘बेस्ट’ उपक्रमाची आढावा बैठक पार पडली.
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये लहान मुले विविध क्रीडाप्रकारांचा आनंद घेत असतात. एकाचवेळी अनेक खेळ खेळण्याचा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळला जातो, तो म्हणजे ‘डायव्हिंग बुद्धिबळ!’ या खेळात अनेक विक्रम आजमितीला झाले आहेत. बुद्धिबळाच्या विविध प्रकारांतील विक्रमांचा घेतलेला आढावा...
Birdev Done has achieved success in the UPSC exam which is very inspiring नुकताच युपीएससीचा निकाल लागला आणि त्यात अनेक तरुणांनी यश मिळविले. यावेळी या यशाची तशी दखल घेण्याचे विशेष कारण म्हणजे, आपल्या देशात शिक्षण आणि कौशल्य याचा उपयोग करून, आपल्या देशातील बुद्धिमत्तेला जगात मागणी वाढत असल्याचे, गेल्या दोन दशकांत आढळून आले आहे. ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब असली, तरी अशा कौशल्याला आणि या उद्याचे भविष्य असणार्या तरुणाईला, राष्ट्रहितासाठी उपयोगात आणायचे सोडून बहुतांशरित्या त्यांची दिशा भरकटविली जाते. असेच
(KEM Hospital) मुंबईतील केईएम रुग्णालयात ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ (MJPJAY) आणि ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’(AB-PMJAY)अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा नोंदणी कक्षाचे उद्घाटन मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी करण्यात आले. या कक्षामार्फत रुग्णांना शासकीय योजनेंतर्गत अधिक दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने सोमवारी सांगितले की, “महानगरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकासाठी सुमारे ७५ टक्के उत्खनन काम पूर्ण झाले आहे.”
Terrorists attack tourists at tourist spot in Pahalgam kashmir पहलगाम येथील पर्यटनस्थळावर दहशतवाद्यांकडून पर्यटकावर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिल
Inconceivable physical speed शारीरिक संवेदना, वेग यांचे जेव्हा प्रकटीकरण होते, तेव्हा ते वेग शरीरातून बाहेर उत्सर्जित होणे गरजेचे असते. मागील पाच लेखांमधून विविध अधारणीय शारीरिक वेगांबद्दल आपण वाचले. या श्रृंखलेतील पुढील वेग म्हणजे छर्दि. याला बोली भाषेत उलटी असे म्हणतात. आज उलटी ही संवेदना उत्पन्न होण्याची कारणे व तो वेग रोखला, थांबविला, तर होणारे अपाय यांबद्दल विस्तर जाणून घेऊया...
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, २१ एप्रिल रोजी याबद्दलचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याद्वारे धर्मादाय रुग्णालयांना ८ महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात उभारण्यात येत असलेल्या पालघर येथील वाढवण बंदरासाठी ५ हजार, ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
Sports Day खेळ कोणताही असो त्याचे असणारे फायदे असंख्य असतात. खेळ माणसाला विविध गोष्टी शिकवतो. त्यामुळेच खेळाचा उपयोग जगभरात सद्भावना वृद्धीसाठी करण्यात येऊ लागला होता. त्याच अनुषंगाने आता जागतिक क्रीडा दिनही साजरा केला जातो. यावर्षीच्या क्रीडा दिनाचे औचित्य साधून शांततेच्या प्रसारात खेळाचे महत्त्व काय याचा घेतलेला आढावा...
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार धरत त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Pakistan मधील फैसलाबादमध्ये दहशतवाद विरोधी न्यायालयाने शुक्रवारी दंगलीतील एका आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. अनेक चर्च आणि ख्रिश्चनांची घरे जाळली गेली, तसेच १० वर्षांचा तुरूंगवास आणि एकूण ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. १६ ऑगस्ट २०२३ रोजी, पवित्र कुराणाच्या कथित अपवित्रतेच्या मुद्द्यावरून जरनवालात दंगल उसळली आणि जमावाने अनेक चर्च आणि ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी घरे जाळली आहेत.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात दुर्मीळ अल्बिनो चिमणीचे दर्शन झाले आहे (albino sparrow). राजुरा घाटे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बुधवार दि. ९ एप्रिल रोजी या पांढऱ्या चिमणीची नोंद केली (albino sparrow). महत्त्वाचे म्हणजे गेल्या चार वर्षापासून या शाळेत निसर्गकट्टा संस्थेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्य काम होत आहे. (albino sparrow)
लंडनच्या ऑयस्टर कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुलभ आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बस प्रवासासाठी वापरता येणार आहे. लंडनचे ऑयस्टर कार्ड नेमकं कस वापरात येत? मुंबई वन कार्डमुळे नेमक्या कोणत्या सुविधा मिळतील?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात साजरी होत असताना, मुंबईतील एल्फिन्स्टन विभागातील ‘समता क्रीडा मंडळ’ या सामाजिक संस्थेने यावर्षीही आपल्या परंपरेला साजेसे आयोजन करत, बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. ‘बाबासाहेबांना डोक्यावर न घेता, त्यांच्या विचारांना डोक्यात घ्या,’ हा प्रभावी संदेश यावर्षीच्या कार्यक्रमांतून पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला.
यापुढे तनिषा भिसे प्रकरण घडू नये यासाठी कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात मृत्यू अन्वेषण समितीचा चौकशी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणातील तिन्ही अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आले असून यापुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Vijay Vadettiwar काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका, ही याच प्रवृत्तीचे उदाहरण. वडेट्टीवार म्हणाले की, “गाण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान काय?” आपल्या देशात जेव्हा एखाद्या कुटुंबाने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेच्या सुरांमध्ये गुंफले, तेव्हा त्यांच्या नावावर आज प्रश्न उपस्थित करणारी वृत्ती ही उलट्या काळजाचे प्रतीकच मानावी.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीबांसाठी असलेला ३० कोटी रुपयांचा निधी वापरलाच नसल्याची धक्कादायक माहिती धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातून पुढे आली आहे. तसेच गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय दोषी असल्याचेही या अहवालात स्पष्ट झाले आहे.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत सर्वत्र संतापाचे वातावरण असताना आता धर्मादाय रुग्णालयांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
अटल सेतूची जोडणी थेट वरळीपर्यंत मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल मार्ग दोन वर्षांसाठी बंद केला जाणार आहे. त्यानुसार वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवसेनेकडून भिसे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली होती. परंतू, भिसे कुटुंबियांनी ती मदत नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये उबाठा गटाची भूमिका मांडण्यासाठी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली असून यात दोन जणांची मुख्य प्रवक्तेपदी तर सहा जणांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. थकीत कर भरण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली असून हा कर तात्काळ भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्या दोन्ही मुलींचे पालकत्व स्विकारण्याची मागणी करण्यात येत आहे.
(MNS News) मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मनसैनिक आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन प्रकल्पा'तील अजून एका वाघाटीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे (rusty spotted cat kitten died). पिल्लू अवस्थेतील या वाघाटीचा अस्थिभंग झाला होता. या मृत्युमुळे राष्ट्रीय उद्यानातील वाघाटीच्या पिल्लांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून आता केंद्रात केवळ तीन वाघाटी शिल्लक राहिल्या आहेत (rusty spotted cat kitten died). त्यामुळे प्रशासन वाघाटी प्रजनन केंद्रातील उपचार पद्धतींविषयी गंभीर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (rusty spotted cat kitten
(Tanisha Bhise Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. भिसे कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांना पाच तास थांबवून ठेवले आणि त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या घटनेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुढे आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या अहवालाती ठळक बाबींवर भाष्य केले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.