बुलढाणा : बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, काठोरा, कालवड या गावांमध्ये केवळ तीन दिवसांतच नागरिकांना टक्कल ( Buldhana Takkal ) पडत असल्याचा प्रकार समोर आला होता. याचे कारण आता समोर आले आहे. केस गळती होत असलेल्या बाधीत गावांतील पाणी पिण्यास, वापरण्यास अयोग्य असल्यामुळे हा प्रकार घडून आला.
Read More
सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
भारतात दिवसागणिक म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’मध्ये लक्षणीय वाढ होत असून, हा आलेख भविष्यातही असाच उंचावत जाणार आहे. पण, ‘एसआयपी’ करताना गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे तंत्र समजून घेण्याबरोबरच, विविध योजना, त्यांचे फायदे-तोटे यांचे वस्तुनिष्ठ आकलन करणेही तितकेच गरजेचे. तेव्हा, ‘एसआयपी’चा निर्णय घेताना, गुंतवणूकदारांनी नेमकी काय काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ या संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकट्या जून महिन्यात भारतीयांनी म्युच्युअल फंडच्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (sip) मध्ये 21,262 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली. त्यानिमित्ताने मागील एका दशकात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांच्या वाढत्या कलाचे केलेले आकलन...
व्यस्त माणसाला गुंतवणूक करायची असल्यास म्युच्युअल फंड शिवाय दुसरा संयुक्तिक पर्याय नाही. धकाधकीच्या जीवनात अनेकदा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अनेकदा योजनाबद्ध गुंतवणूक नसल्यास अनेकदा महत्वाच्या अथवा संकटाच्या प्रसंगात निधी कमी पडतो व पंचाईत येते. मात्र कालानुरूप गुंतवणूक कशी करावी याची योजना आखल्यास पुढील गोष्टी सोप्या होतात त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे म्युच्युअल फंड…
मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात मोठी वाढ झाली आहे. मैं महिन्यात म्युच्युअल फंडाने नवा विक्रम करत एसआयपी गुंतवणूकीत देखील मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यात ही वाढ ३४६९७ कोटींची नवीन गुंतवणूकीची आकडेवारी समोर आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियाच्या नव्या आकडेवारीनुसार, मागच्या महिन्यातील गुंतवणूकीपेक्षा ८३.४२ टक्क्यांनी ही वाढ झाल्याचे म्हटले गेले आहे. हा इंडस्ट्रीतील नवा उच्चांक गुंतवणूकीने गाठला आहे.
म्युचल फंड एसआयपी (SIP) गुंतवणूकीत मोठी वाढ झाल्याचे असोसिएशन ऑफ म्युचल फंड ऑफ इंडिया (AMFI) ने आपल्या आकडेवारीत स्पष्ट केले आहे. भारतातील एसआयपी गुंतवणूकीत १९२७१ कोटींवरून वाढ होत २०३७१ कोटींवर गुंतवणूक पोहोचली आहे मागील वर्षाच्या तुलनेत ही मोठी वाढ एसआयपी गुंतवणूकीत झालेली आहे.
एसआयपी (Systematical Investment Plan) गुंतवणूकीत गेल्या आठ वर्षांत सहावेळा वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या १० महिन्यात स्मॉलकॅप निधीत ९४ कोटींचा निधी बाहेर गेला आहे तर लार्जकॅप कंपनीतील २१२७ कोटींचा निधी बाहेरून गुंतवणूकीत आला. बदललेल्या परिस्थितीत इक्विटी गुंतवणूकीत गुंतवणूकदारांनी दिशा बदललेली आहे. तरीदेखील यावेळी इक्विटी गुंतवणूकीत येणारा पैसा कमी होऊन २६७०३ कोटींच्या तुलनेत २२६९१ कोटींवर आला आहे.
जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या २०व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ पासून सुरुवात झाली. याप्रसंगी ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘लाईफ ऑन मिसिसिपी’ प्रकाशन वर्ष - १८८३ हे मार्क ट्वेनचं पुस्तक म्हणजे पाण्यावरच्या भ्रमंतीच्या विलक्षण वेडाची कहाणीच आहे. लेखक जणू त्या नदीच्या प्रेमातच पडला आहे. तिला सोडून जमिनीवर पाय ठेवावा, असं त्याला मुळी वाटतच नाही. आज १४० वर्षांनंतरही लेखकाच्या शब्दांमधलं ते पाण्याचं वेड वाचकाला झपाटून टाकतं.
मागील काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांचा कल हा म्युच्युअल फंडाकडे वाढलेला दिसतो. विविध अॅप्सच्या माध्यमातून अशाप्रकारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे तर अगदी सहजसोपे झाले आहे. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना बरेचदा परदेशातील विविध फंडांमध्येही गुंतवणुकीचे अनेक आकर्षक पर्याय ऐकीवात येतात किंवा त्यांच्या जाहिरातीही पाहायला मिळतात. पण, खरंच अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय फंडांमध्ये गुंतवणूक कशी करावी? त्याचे नियम-अटी नेमक्या काय असतात? अशी गुंतवणूक कितपत सुरक्षित असते? यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला एक चित्रपट म्हणजे ‘शोले’. १९७५ साली आलेल्या या चित्रपटाची जादु आजही कायम आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे, आणि त्यांचे प्रत्येक संवाद हे प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. त्यापैकीच एक पात्र म्हणजे ‘गब्बर’. या पात्राचे नाव आणि त्यासाठी कलाकाराची निवड कसी झाली याचा खास किस्सा संगीतकार जावेद अख्तर आणि लेखक सलीम खान यांनी सांगितला. मनसेतर्फे आयोजित दीपोत्सव २०२३ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज
आर्थिक बचत ही भविष्यातील आर्थिक तरतूद असते. सुरूवातीला योग्य नियोजन केल्यास बचत हीच पूंजी गुंतवणूक ठरू शकते.वर्ल्ड फायनान्शिअल डे च्या निमित्ताने.....
आरे ते कफ परेड अर्थात कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो मार्गिकेची प्रत्येक मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असून या भूमिगत अर्थात अंडरग्राउंड मेट्रोतून प्रवास करताना मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येण्याच्या मुंबईकरांच्या समस्येवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात एमएमआरसीने उपाय शोधला आहे.
गणरायांचे आगमन झाले आहे!तब्बल 10 दिवसांचा हा सण आनंद, उत्सव आणि सर्वांना एकत्र येण्याचे एक शुभपर्व आहे. लोकांच्या घरात, सोसायट्यांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात आणि अतिशय धुमधडाक्यात साजरा होतो.‘गणपती बाप्पा मोरया!’चा गजर आणि ‘मोदका ’चा गोड प्रसाद या उत्सवाचा आणि मंगलमय वातावरणाचा आणखी उत्साह वाढवतो.हिंदू परंपरेत गणरायांना विशेष स्थान आहे.त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणजेच भक्तांवरील संकट अथवा अडथळे दूर करणारे बाप्पा म्हणून ओळखले जातात.
दीर्घकालीन गुंतवणुकीच्या चांगल्या परिणामांसाठी आधी जगण्याची खात्री करणं गरजेचं आहे. जेव्हा बाजार शिगेला पोहोचतो, तेव्हा बहुतेक गुंतवणूकदार अधिक गुंतवणूक करून भावनिक प्रतिक्रिया देतात किंवा जेव्हा बाजार खाली जातो तेव्हा बरेच लोक बाहेर पडतात. त्यांना पैशांची गरज नसते. जगण्यासाठी संरचनेची गरज असते.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना बर्याच निकषांचा खरं तर काळजीपूर्वक विचार करावा लागतो. तेव्हा, गुंतवणूदारांनी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताना या लेखात दिलेल्या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास गुंतवणुकीचा निर्णय घेणे अधिक सोयीस्कर...
दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाची मदत लोक घेत असतात. मग ते गृह कर्ज, वाहन कर्ज,खाजगी कर्ज व कुठलेही कर्ज, कर्जाचा बोजा कसा निपटावा हा प्रश्न मनात येणे सहाजिकच आहे. योग्य नियोजनातून समस्या सुटू शकतात तसे कर्ज देखील वेळेत फेडता येऊ शकते. नियोजन अंतिमतः मानसशास्त्रीय कारणांमुळे शक्य होते. कर्ज कुठल्या उद्देशाने घेतले व त्याचा परतावा कसा करणार हा विचार नेमकेपणाने केल्यास भविष्यात अर्थ व कर्ज डोईजड होत नाही.
“ये हाथ मुझे दे दे ठाकूर”, हे संवाद आजही प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. १९७५ साली दिग्दर्शक राजेश सिप्पी यांनी एक माईल्ड स्टोन चित्रपट 'शोले' प्रेक्षकांना दिला होता. आज ४८ वर्षांनंतर देखील शोल चित्रपटातील प्रत्येक संवाद, व्यक्तिरेखा, सीन आपल्याला लक्षात आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की चित्रपटातील एक महत्वाचा सीन हा हॉलिवूडमधील एका चित्रपटाच्या सीनसोबत अतिशय तंतोतंत जुळतो.
’इनकम टॅक्स अॅक्ट १९६१’च्या ‘सेक्शन ८०सी’ नुसार गुंतवणूकदारांना ‘टॅक्स सेव्हिंग’साठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ‘इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम’ हा पर्याय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होताना दिसतो. खासकरून गुंतवणूक करताना ’इक्विटी’मध्ये होणार्या वाढीसोबत ‘टॅक्स सेव्हिंग’चाही विचार प्रामुख्याने करतात. मागील दोन वर्षांत ’इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम’ श्रेणीमध्ये २२ लाख ‘फोलिओ’ जोडले आहेत. या श्रेणीतील ‘फोलिओ’मध्ये डिसेंबर २०२० पासून डिसेंबर २०२२ पर्यंत १.२३ कोटींवरुन १.४६ कोटींपर्यंत वाढ झाली.
एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडाची योजना, मात्र एसआयपीहि शेयर बाजारातील अस्थिरतेचे जोखीम कमी करून शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. ह्या सुविधे द्वारे आपण म्युच्युअल फंडाच्या निरनिराळ्या प्रकारच्या योजने मध्ये आपल्या आर्थिक नियोजनानुसार एसआयपीचालू करू शकतो. आपली एसआयपीही उद्दिष्टाला धरून असावी.
अतुल कुलकर्णी यांचे काम पाहिलेल्यांना कलेवरील निष्ठेबाबत आणि भूमिकेला सर्वोत्तम पद्धतीने सादर करण्याच्या त्यांच्या क्षमतेबाबत कल्पना आहेच. परंतु त्यांनी आतापर्यंत विनोदीशैली साकारलेली नाही. पण त्यांच्या इतर भूमिकांसाठी प्रेक्षकांनी कायमच त्यांची प्रशंसा केली आहे. पण आता सोनी लिव्ह या वाहिनीच्या 'सँडविच फॉरेव्हर'मध्ये या ओरिजिनल सिरीजमध्ये त्यांची प्रेक्षकांना हसवण्याची क्षमता पाहायला मिळणार आहे.
म्युच्युअल फंड - एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन )
स्वरंग मराठीचा नवा उपक्रम "किस्से बहाद्दर"
हलगर्जीपणे गुंतवणूक करणे हा सर्वात मोठा धोका व जोखीम मानली जाते. मुद्दल व व्याज हे दोन्ही गमावण्याची भीती यात असते. अनेक कंपन्या, खासगी वित्तीय संस्था या कमी दिवसांत जादा व्याज दराची प्रलोभने दाखवितात. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना जाहीर करतात. याला गुंतवणूकदार भरीस पडतो. परिणामी त्याचे पैसे अडकतात, बुडतात. मार्केटचा व्याजाचा जो ‘ट्रेण्ड’ आहे, त्यातून जर अधिक व्याज देणारी योजना असेल, तर त्यात धोका आहे. हे समजून अशा योजनांमध्ये गुंतवणूक करू नये. अशा योजनांमध्ये बुडालेले पैसे मिळण्यासाठी न्य
मार्च २०२० आर्थिक वर्ष सरले आणि गुंतवणूक विश्वाचे मागील वर्षाचा आढावा घेणारे अहवाल आता येऊ लागलेत. म्युच्युअल फंड क्षेत्राशी निगडित आकडेवारीचा आपण येथे आढावा घेऊ.
मार्च २०२० सरते शेवटी फक्त एसआयपी मार्फत गुंतवणूक करणाऱ्यांचा निधी वाढून साधारण रु ३.२० लाख कोटी होईल. एसआयपी मार्फत गुंतवणूक केल्यास आपण जोखीम कमी करू शकतो. मात्र त्या जोडीला चांगला परतावा मिळविण्यासाठी आणखी काय करता येईल ते आपण पाहू. एसआयपी मार्फत म्युच्युअल फंडात जोडल्या गेलेल्या नवनवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाबद्दल विश्वास आणखी कसा वाढेल हा ह्या लेखामागचा उद्देश.
मुंबईच्या भूगर्भातून मार्गस्थ होणार्या ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या ‘मेट्रो-३’ या प्रकल्पातील आता केवळ नऊ भुयारे खणण्याची शिल्लक राहिली आहेत.
सिनेमॅटोग्राफर आणि ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲण्ड सायन्सेसचे माजी अध्यक्ष जॉन बेली ५० व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या प्रमुख पदी असतील.
नवरात्रीतील ९ दिवस म्हणजे Spiritual Investment Program (SIP). या नऊ दिवसांत नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन उदया येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने नविन सुरुवात करणाऱ्या सर्व महाMTBच्या वाचकांना शुभेच्छा. या लेखमालेचा हेतू सर्व वाचकांना म्युच्युअल फंड नक्की कसे काम करते ? हा आहे. परंतु विषय तसा क्लिष्ट असल्यामुळे वाचकांना चांगला परतावा देणाऱ्या योजनांची नावे किंवा माझा फंड का चालत नाही? याबाबत जाणून घेण्यात उत्सुकता आहे, असे आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते.
अभाविपने डाव्या आणि तृणमूल कॉंग्रेसच्या राजकारणाचा हिंसक चेहरा उघड करण्यासाठी हा देशव्यापी संपर्क कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर केले.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठी कारवाई करत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पुलवामा येथील लस्सीपोरा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गिकेतील आतापर्यंतचे सर्वात मोठे भुयार शुक्रवारी खणून पूर्ण झाले. विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळापर्यंतचे २.९ किमी लांबीचे हे भुयार आहे.
अंतर्गत असो वा सीमेवरील, सुरक्षा हा कोणत्याही देशासाठी कायमच कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे या विषयाकडे कोणतेही देश दुर्लक्ष करीत नाहीत, मुख्यत: लष्करावर अवलंबून असणारे देश. कारण, शेवटी सुरक्षा अबाधित राहिली तरच आर्थिक प्रगती होईल.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीचा भारताचा सर्वात मोठा मंच पेटीएम मनी ने आज “एसआयपी ची नोंदणी आत्ता करा, पैसे मागाहून द्या” ही नवीन सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू करीत असल्याचे जाहीर केले.
भांडवली बाजारात मोठे उतारचढाव असतानाही गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकीवर विश्वास दाखवत ३ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे.
भारतात जलपर्णी सर्वप्रथम १८ व्या शतकात बंगालमध्ये आणली गेली, असं मानलं जातं. इथलं उष्ण-दमट हवामान तिला अनुकूल असल्याने आसेतुहिमाचल तिने आपला साम्राज्यविस्तार केला आहे. केरळमधील अनेक सरोवरं जलपर्णीची शिकार बनली आहेत. जिथे जिथे जलपर्णी फोफावलेली आहे तिथे तिथे ती हटवण्यासाठी खूप पैसे मोजावे लागत आहेत...
अनंत औषधी उपयोग असलेली, वातावरण शुद्ध ठेवणारी ‘तुळस’ आज जवळजवळ प्रत्येक भारतीय माणसाच्या घरी दिसते, ती तिच्या धार्मिक पावित्र्यामुळेच.
असंख्य रेकॉर्ड्स, असंख्य चित्रपट, अगणित लाईव्ह शोज यात प्रिस्ले आकंठ बुडाला होता. लोकप्रियता इतकी अफाट होती की, प्रिस्ले रंगमंचावर नुसता दिसला तरी लोक बेभान होत होते.
युरोपात फ्रान्स, इंग्लंड, स्पेन यांच्या आपापसात मारामाऱ्या सतत चालूच असायच्या, अशाच एका लढाईत फ्रान्स आणि स्पेन यांच्यात तह झाला आणि फ्रान्सने लुईझियाना प्रदेश स्पेनला देऊन टाकला.