Ratan Tata भारताचे सुपुत्र उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर नुकतेच त्यांचे इच्छापत्रही समोर आले. टाटांनी आपल्या इच्छापत्रातून त्यांची सर्वोपरी सेवा केलेल्या अगदी छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला आर्थिक राशी देऊन, कर्जमाफी करुन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या उक्तीचे वास्तववादी दर्शन घडविणार्या रतन टाटा यांच्या इच्छापत्राच्या निमित्ताने...
Read More
( Give Bharat Ratna to industrialist Ratan Tata MLC uma khapre to CM ) उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या, अशा मागणीचे पत्र आ. उमा खापरे यांनी मंगळवार, 25 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
Narendra Modi-Ratan Tata भारताच्या उद्योगविश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजे रतन टाटा होय! ज्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळवा झाला होता. मीठ ते गाडी असे अनेक रुपांनी प्रत्येकाशी त्यांचे ऋणानुबंध जुळले होते. रतन टाटा यांच्या निधनाला एक महिना झाला. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या भावना....
टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या नफ्यात ४७ टक्के तर महसुलात ३९ टक्के वाढ झाली आहे. बाजाराच्या अपेक्षेपेक्षा परिणाम कमकुवत असून समभागात मोठी घसरण झाली. शेअर दिवसभरात जवळपास ९ टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळाले. तथापि, यंदाच्या वर्षात समभागाने भागधारकांना सुमारे ११५ टक्के परतावा दिला आहे.
देशातील प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाची सुत्रे नोएल टाटा यांच्याकडे सोपविण्यात आली. नोएल टाटा यांनी टाटा समूहाच्या नेतृत्वात नवा महत्त्वपूर्ण बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. दि. ०१ नोव्हेंबर रोजी नोएल टाटा यांचा टाटा सन्सच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.
आपल्या आयुष्यात कोण येणार, हे नियती ठरवत असते. नियतीचे फासे फिरले की, अशक्य गोष्टी शक्य होतात असं वाटतं. शंतनू नायडू या तरुणाबद्दल ऐकलं आणि वाटलं, जगात चांगला विचार करून काम केलं की, आपल्याला सहज न वाटणारी गोष्टही सहज भेटून जाते. मग सगळं आयुष्य स्वप्नवत वाटावं, असंच पुढे घडत जातं. खरंतर आपल्याकडे दैनंदिनी लिहिण्याची सवय अनेकांना होती. तीच ही दैनंदिनी आणि त्यातीलच हे प्रसंग आहेत. आठवणीच्या गावी माणूस रमतो आणि त्यातून त्याला जे गवसतं, त्यात सच्चेपणा आणि साधेपणा असतो. असच काहीसं हे पुस्तक, शंतनू नायडू याने लिह
मृत्यूनंतर झालेली गर्दी हीच माणसाने कमावलेली खरी संपत्ती असते. रतन टाटांच्या अमाप ‘संपत्ती’चे दर्शनच त्यांच्या मृत्यूनंतर जगाला झाले. व्यवसाय व्यवस्थापनात जपलेल्या मानवी मूल्यांचा परिपाक म्हणजेच, अंत्यदर्शनासाठी झालेली टाटा समूहाच्या कर्मचार्यांची गर्दी होती. व्यवसाय करताना माणुसकी जपण्याचा वस्तुपाठच रतन टाटांनी घालून दिला त्याविषयी...
टाटा समूह येत्या काळात बंपर रोजगारनिर्मिती करेल, असा दावा अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी केला आहे. टाटा समूह येत्या काळात ५ लाख रोजगार निर्माण करणार असून आम्ही अनेक प्लांट्स उभारत आहोत, असेही चंद्रशेखरन यांनी सांगितले. आसाममधील समूहाच्या आगामी सेमीकंडक्टर प्लांट तसेच इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीसाठी इतर नवीन उत्पादन युनिट्सचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाला प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांचे नाव देण्यात येणार आहे. सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबद्दलची माहिती दिली.
भारताचे थोर उद्योगमहर्षी रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. टाटा उद्योग समूहाने मिठापासून ते अगदी गाड्यांपर्यंत जवळपास सर्वच क्षेत्रांत आपल्या सर्वोच्च कामगिरीने ग्राहकांचा विश्वास संपादित केला. त्याचबरोबर सामाजिक, आरोग्य क्षेत्रातील टाटा समूहाचे सेवाकार्य हे अवर्णनीय. पण, याबरोबरच टाटांनी फार पूर्वीपासून क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठीही भरीव योगदान दिले आहे. त्याचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...
रतन टाटा यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. उद्यमशीलता आणि या नैतिकता यांचा संगम घडवून आणत, रतन टाटा यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक नवीन अध्याय रचले आहेत.
Ratan Tata हे टाटा परिवारातील अनमोल रत्न होते. त्यांनी ३० वर्षे उद्योग समूहाचे नेतृत्त्व केले, एवढ्या एकाच कारणावरुन ते महान ठरत नाहीत किंवा टाटा उद्योग समूहाची त्यांनी प्रचंड भरभराट केली, या दुसर्या कारणामुळेही त्यांना महान म्हणता येणार नाही. व्यक्तीला मोठेपणा देणारी ही कारणे जरुर आहेत. परंतु, रतन टाटा यांचे अलौकिक मोठेपण टाटा समूहाने स्वीकारलेली मूल्ये जगण्याचे आहे.
( Ratan Tata ) प्रसिद्घ उद्योगपती रतन टाटा यांचे दोन दिवसांपूर्वी बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी देहावसान झाले. त्यांच्या निधनामुळे साऱ्या उद्योगविश्वाला धक्का बसला. रतन टाटा हे मोठे उद्योजक जरी असले तरी इतर उद्योजकांपेक्षा ते वेगळे आहेत हे त्यांनी पदोपदी दाखवून दिले. त्यामुळेच जगभरातील अनेक दिग्गजांकडून त्यांच्या कार्यकर्तृत्वास आदरांजली वाहण्यात आली. अशातच एका मोठ्या उद्योजकाने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. पेटीएम चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करणारी एक पोस
Ratan Tata Death भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योजगपती रतन चाचा यांचे निधन झाले आहे. रविवारी ६ ऑक्टोंबर रोजी रात्री त्यांना उशिरा साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांना रूग्णालय़ात दाखल केले होते. त्यांनी बुधवारी रात्री ९ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
भारताचे ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रात्री उशीरा वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती आणि अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांच्या निधनाने देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मराठी अभिनेता कुशल बद्रिके यानेही रतन टाटा यांच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन गुरुवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता, चर्नी मार्ग येथील नियोजित मराठी भाषा भवन परिसरात करण्यात येणार होते.
देशाचे दिग्गज उद्योगपती आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८६व्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री उशीरा निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून विविध क्षेत्रातील मंडळी शोक व्यक्त करत आहेत. अगदी सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते, कलाकार, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू देखील आपल्या सोशल मिडियावरुन रतन टाटा यांना भावपूर्ण आदरांजली वाहात आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवार, ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीचकँडी रूग्णालयात निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, रतन टाटा यांची जागा कोणीही भरू शकत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
देशातील प्रसिध्द उद्योजक, टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योग विश्वासह सबंध देशावर शोककळा पसरली असून देशातील नामवंत व्यक्तींकडून यावेळी शोक व्यक्त करण्यात येत आहे.
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँण्डी रुग्णालयात वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येणार असून ते केंद्र सरकारतर्फे रतन टाटांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांचे बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनावर राजकीय नेते, सर्वसामान्य नागरिक ते अगदी हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देशाला आकार देणारे, लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या या महान व्यक्तीला बॉलिवूडकरही श्रद्धांजली वाहात आहेत.
प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचे श्वानप्रेम कधीच लपून राहिले नाही. त्यांनी चक्क ब्रिटनचे राजे प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून मिळणारा पुरस्कार केवळ श्वानप्रेमापोटी नाकारला होता. विशेष म्हणजे टाटांच्या श्वान प्रेमाचा अनुभव चक्क ब्रिटिश राजघराण्याला थक्क करणारा होता. रतन टाटा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यासाठी राजघराण्याने बकिंगहम पॅलेसमध्ये पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.
भारताचा कोहिनूर हरपला, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
(Ratan Tata) भारतीय उद्योगजगताचे ज्येष्ठ कर्मी आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष श्री. रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले आहे. भाजपाचे प्रवक्ता म्हणून ते बोलत होते. रतन टाटा यांचे भारतीय उद्योग, शिक्षण आणि सामाजिक सेवांमध्ये दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. टाटा समूहाच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोठा वाटा उचलणाऱ्या रतन टाटा यांच्या कार्याला सन्मान देण्यासाठी भारतरत्न देणे उचित ठरेल, असे गोरखे यांनी नमूद केले.
रतन टाटांबद्दल विचार करताना, 'श्रीमंत योगी' ही उपमा तंतोतंत पटते, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत रतन टाटांच्या आठवणींना उजाळा दिला.
टाटा समूहातील सर्वात तरुण जनरल मॅनेजर आणि रतन टाटा यांचा विश्वासू सहाय्यक शंतनू नायडू यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, भावूक पोस्ट शेअर केली आहे.
ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांचे बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनावर राजकीय नेते, सर्वसामान्य नागरिक ते अगदी हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा यांना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
(Ratan Tata) ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीसुद्धा रतन टाटांचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांचे बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनावर राजकीय नेते, सर्वसामान्य नागरिक ते अगदी हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहात खरे रत्न आज हरपले असे म्हटले आहे.
देशाचे महान सुपुत्र रतनजी टाटा यांच्या निधनाची वार्ता कळल्यावर मी स्तब्ध झालो आहे.
भारतातल्या औद्योगीक क्षेत्रातल्या प्रगतीसोबत, टाटा हे नाव जोडले गेले आहे.
इंग्रजीतलं आद्यक्षर टी म्हणजे टाटा नव्हे तर 'ट्रस्ट'. उद्योग विश्वात विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे टाटा उद्योगसमूह. टाटा समूहाने आजवर ग्राहकांचे हित जपत आपल्या उद्योगविस्तारासह जगभरातील असंख्य लोकांच्या मनावर राज्य केले आहे. देशाच्या आर्थिक विकासात भरीव योगदान देणाऱ्या उद्योजकांच्या यादीत रतन टाटांचे नाव अग्रणी राहील.
(Ratan Tata) ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. देशाभरांतील सर्व स्तरांमधून त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
( Ratan Tata )उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यात एक दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत महायुतीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या रास दांडिया आणि गरब्याचा कार्यक्रम गुरूवारी रद्द करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी पारंपारिक पध्दतीने देवीची आरती करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
असे म्हणतात की, मैत्रीला वयाचे बंधन नसते.
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती.
देशातील आदर्शवत उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या रतन टाटांनंतर टाटा समूहाचे उत्तराधिकारी कोण, यावर चर्चा घडताना दिसून येत आहे. अविवाहित रतन टाटा यांच्या नावे तब्बल ३,८०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
वयाच्या ८६व्या रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने केवळ उद्योग विश्वातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Tata Company Share प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांच्या निधन वार्तानंतरही १० ऑक्टोंबर रोजी टाटा समुहाच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. टाटा ग्रुप कंपनीच्या समभागात झालेली वाढ ही टाटा समूहाच्या विश्वासार्हतेची हमी देणारी आहे. यामुळे टाटा कंपनीच्या विश्वासार्हतेची चर्चा होत आहे. रतन टाटा नसूनही देशांतील गुंतवणूकदारांनी टाटा समुहाच्या विश्वसार्हतेला तडा जाऊ दिलेला नाही. ते आजच्या टाटा समुहाच्या शेअर्सच्या माध्यमातून दिसून आले.
श्रीनिवास खळेंनी संगीतबद्ध केलेल्या वरील काव्यपंक्ती आज रतन टाटा यांच्या निधनानंतर आपसुकच स्मृतिपटलावर विसावल्या. एक दूरदर्शी आणि द्रष्टे उद्योजक म्हणून देशासह जगभरात टाटा ख्यातकीर्तच! पण, टाटांच्या अवघ्या आयुष्याकडे केवळ एक दिग्गज भारतीय उद्योजकाच्या चष्म्याने पाहिले, तर ते त्यांच्या कमावलेल्या लौकिकाचे अवमूल्यन ठरावे. कारण, हे उद्योग‘रत्न’ व्यवसाय आणि व्यवहारजगाच्याही पलीकडचेच रसायन. रतन टाटा हे प्रत्येक भारतीयासाठी, देशासाठी जणू दीपस्तंभच होते. तरुण उद्योजकांसाठी देदिप्यमान आदर्श, तर सामाजिक क्षेत्रातील
देशातील मोठा उद्योगसमूह म्हणजेच टाटा उद्योगसमूहातील उपकंपनी असलेल्या टाटा स्टीलने देशांतर्गत बाजारपेठेत आपले वर्चस्व राखण्याकरिता नवनवीन स्टॅट्रेजी अमलात आणत आहेत.
"आज माझे मार्गदर्शक रतन टाटा सरांचा वाढदिवस आहे. आज माझ्या आयुष्यात मी जे काही आहे ते त्यांच्याच मुळे आहे. मी फक्त १८ वर्षांचा होतो तेव्हा रतन टाटा सरांनी माझ्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवला. त्यांनी माझ्या कच्च्या घड्याला आपल्या हाताने सावरले. त्यांनी आपल्या अनुभवातून मला दिशा दाखवली. त्यांचा आशीर्वाद मला संबल देतो. रतन टाटा यांते स्वप्न होते की, सर्व भारतीयांना स्वस्त दरात औषधे मिळावीत. जेनेरिक आधाराद्वारे आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहोत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वचन देतो की, जेन
घोषणेपासूनच चर्चेत असलेला टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची आज शेयर बाजारामध्ये विक्रमी लिस्टिंग झाली. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची लिस्टिंग होताच, एका तासातच शेयरने गुंतवणूकदारांना दुपटीहून अधिक कमाई करुन दिली. टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेयरने एनएसई आणि बीएसईमध्ये पहिल्या तासातच १४० टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला.
सिंगूर-नॅनो प्रकल्प प्रकरणात ममता बनर्जी सरकारला मोठा धक्का बसला आहे. टाटा मोटर्सने पश्चिम बंगाल सरकारकडून नुकसानभरपाईचा खटला जिंकला आहे. टाटा मोटर्स लि.ने सांगितले की, "सिंगूर-नॅनो प्रकल्प प्रकरणात पश्चिम बंगाल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून व्याजासह ७६६ कोटी रुपये वसूल करण्यासाठी लवादाने आमच्या बाजूने निर्णय दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने यंदापासून सुरु करण्यात आलेले ’महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. यावेळी ’उद्योग रोजगार मित्र’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम नवउद्योजकांसाठी वरदान ठरणार आहे.
ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना उद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आज महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देण्यात आला आहे. २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टाटा हे राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रुपये २५ लाख, एक सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची बुधवारी (दि. २७ जुलै) त्यांचा कुलाबा इथल्या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री तिथे गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.
भारतीय स्पर्धा आयोगाने मंगळवारी एअर इंडियाच्या नो-फ्रिल वाहक एअर आशिया मध्ये संपूर्ण शेअरहोल्डिंग घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिले असल्याचे सांगितले.